आज पुन्हा आभाळ भरून आलं होतं
असं कित्तीदा तरी होतं..कित्तीदा तरी झालंय आणि होतंच राहलंय ...
का कुणास ठाऊक पण आज मात्र बरसेल असं वाटलं आणि तस्संच झालं ..
बरसून गेलं आणि सारा आसमंत कसा शांत झाला. गुलजारच्या इजाजत मधल्या "त्या" - बरस जायेगी तो अपनेआप थम जायेगी डायलॊगची आज पुन्हा आठवण झाली.
खरतर बरसत आत होतं बाहेर तर फ़क्त पाऊस पडत होता ..!! पण आजचा पाऊस जरा वेगळाच होता..मनातली जळमटं, काजळी धुवून काढणारा! नेहमीसारखा पुन:पुन्हा त्याची वाट पहायला लावणारा उकाडा आज पावसानंतर नव्हता.
ब-याच दिवसांच्या आत दाटलेल्या वेदनेला मोकळी वाट मिळाली ..हो डोळ्यांनीच ती करून दिली. अस्ं होतं खरं बरेचदा; आपल्या आत खूप काही ठसठसत असतं, टोचत असतं, बोचत असतं , कधी कधी उमलूनही येत असतं पण ते व्यक्त करण्याला एक तर वेळ नसतो किंवा आळस असतो. मग एखादी बंडखोर भावना बंड करून उठते आणि तिच्यापुढे आपलं काहिच चालत नाहि. सतत दुर्ल्क्षित राहिलेल्या एखाद्या समाजासारखं तिचं होतं. मनाला तर कायमचीच या अश्या गोष्टींकडे दुर्ल़क्ष करण्याची आपणच लावलेली सवय एक दिवस महागात पडते आणि भावना कागदावर उतरावाव्या तरी लागतात नाहितर आपणच मूक श्रोता होऊन त्या ऐकाव्या तरी लागतात. अश्या भावना कविच्या मनात उसळल्या की तो त्यांना कवितेचं रूप देतो, लेखक एखादा सुंदर लेख घडवतो तर चित्रकार त्याच्या कॆन्व्हास वर मन:स्पर्शी चित्र रेखाटतो. भावना त्याच; पण अभिव्यक्ती वेगळी!! अशीच एखादी कोंडलेली भावना जग हालवायलाही पुरेशी ठरते.
मनाचं मंथन वाटतं तितकं सोपं नसतं
कितीतरी जहाल उपसावं लागतं
कितीतरी सुखद नाकारावं लागतं
काहिहि कितीही कसंही असो आहे तसं कपाळावर कोरावं लागतं
खरंच फ़मुशिंदेंनी केलेलं मनाच्या मंथनाचं वर्णन किती सार्थक आहे नाही!
प्रतिक्रिया
1 Jul 2011 - 7:09 pm | अनामिक
छान आहे मुक्तक, परंतू अजुन मोठ्ठ असायला हवं होतं.
1 Jul 2011 - 7:40 pm | शुचि
>> मग एखादी बंडखोर भावना बंड करून उठते आणि तिच्यापुढे आपलं काहिच चालत नाहि. सतत दुर्ल्क्षित राहिलेल्या एखाद्या समाजासारखं तिचं होतं.>>
पुलेशु (पुनर्लेखनास शुभेच्छा)
1 Jul 2011 - 9:16 pm | अनिवासि
सुन्दर!
फमुन्ची कविता वाचायला आवडेल.
2 Jul 2011 - 12:08 pm | सन्दीप
छाण, हळुवार मुक्तक.
थोड आजुन मोठ करायला हव होत अस वाटत.
पुलेशु.
2 Jul 2011 - 1:19 pm | परिकथेतील राजकुमार
कानीकपाळी हेच ओरडून सांगत असतो हो मी लोकांना. पण ऐकतील तर शपथ.
असो..
खूप छान लिहिले आहेत तुम्ही. वाचताना खूप काही मनात दाटून आले पण आता ते कागदावरच उतरवायचे (म्हणजे लिहायचे ह्या अर्थी) ठरवले आहे.
9 Jul 2011 - 12:59 pm | स्वप्ना_तुषार
सगळ्यांना मनापासून धन्यवाद :) माझे हे मिसळ पाववरील पहिलेच लिखाण आहे . उत्तरोत्तर सुधारणा करण्याचा प्रयत्न करेन