हेज्यायची कटकट...

भारी समर्थ's picture
भारी समर्थ in जे न देखे रवी...
29 Jun 2011 - 6:23 pm

बर्‍याच दिवसांनी काल माझी जात आठवली होती
सहज बोलता बोलता कोणीतरी तिची आठव काढली होती

आमची जात लागत नाही प्रवेशाला, फी माफीला की आंदोलनवाल्यांना
पैसा बक्कळ पडलाय, कोण विचारतोय आम्हा ओपनवाल्यांना

नाही, मान्य की देशाच्या गरीब जनतेचा उत्कर्ष झाला पाहिजे
पण मग आमच्याच शिटातला का बरं सगळ्यांना वाटा पाहिजे

आमचे शेजारचे सूचीतले गेल्याच महिन्यात फॉरेन ट्रीपवरून आले
पोराला फार शीण झालेला परीक्षेचा, त्याने चांगले ९०% की हो काढले

त्यांच्या सुपुत्राला मुंबईबाहेरील जागा नको होती म्हणून आग्रह धरला
आणि आरक्षण कोट्यातील जागेसाठी त्याने आपला फॉर्म भरला

आम्ही म्हटलं द्या ना काका सोडून ही जागा एखाद्या गरीबासाठी
च्यायचे काका डाफरले, म्हणाले काय बेणं बिनकामाचं लागलंय पाठी

दुसर्‍या किंवा फार-फारतर तिसर्‍या यादीत लागला असता क्रम
पण तेवढ्यासाठी राउंडावर जायचे कोण घेणार श्रम

आता, त्यांच्या भाव-बंदांसाठी ते स्वत:च नाहीत विचार करत
पण आम्ही मात्र उभे आहोत बी-कॉम-एस्सी-ए च्या कळा सोसत

आजकाल पैसेवाल्यांच्याच तोंडाला सगळे झोंबतात
गरीब साले लय शांतपणे आयुष्य जगत रहातात

जात जात म्हणणार्‍याच्या टिरीवर फटके हाणा
आणि आरक्षण फक्त गरीबाच्या पोरांसाठीच आणा

....कविता यथे संपते आहे....

ता.क.
यमक कसंबसं जुळवलंय पण कवितेचं तंत्र नाही राव जमलं
काही कळो ना कळो, कळा मात्र सोसा समजून काळीज आपलं (आवो, धडपडू नका. परत वाचा)

भारी समर्थ

हास्यकरुणशांतरससमाज

प्रतिक्रिया

परिकथेतील राजकुमार's picture

29 Jun 2011 - 6:41 pm | परिकथेतील राजकुमार

जात जात म्हणणार्‍याच्या टिरीवर फटके हाणा
आणि आरक्षण फक्त गरीबाच्या पोरांसाठीच आणा

हा हा हा !

आम्हाला प्रभूगुर्जींनी सांगितलेला 'घरी मार्बल फ्लोरींग असताना पोराच्या शिष्यवृत्तीसाठी खोटा उत्पन्न दाखला देणारा माणूस' आठवला ;)

आरक्षण म्हणजे 'नविन संधी उत्पन्न करुन देणे' हा अर्थ राहिला नसून 'ओपनवाल्यांची संधी कमी करुन यादीतल्यांना देणे' असा नवा अर्थ आला आहे.

भारी समर्थ's picture

29 Jun 2011 - 6:59 pm | भारी समर्थ

आमच्यातला वाटा द्यायला
आहोत ना यार तयार
पण ऐर्‍यागैर्‍याचा नाही
फक्त गरीबाचाच व्हावा उद्धार!!!

भारी समर्थ

प्रास's picture

29 Jun 2011 - 7:52 pm | प्रास

लई भारी....

:-)

पल्लवी's picture

29 Jun 2011 - 7:56 pm | पल्लवी

मुक्तछंद ओके.

नरेशकुमार's picture

30 Jun 2011 - 5:27 am | नरेशकुमार

बर्‍याच दिवसांनी काल माझी जात आठवली होती

जात म्हनजे काय ?

भारी समर्थ's picture

30 Jun 2011 - 10:34 am | भारी समर्थ

व्वाह! छान विनोदनिर्मिती.

भारी समर्थ

मस्त कविता आणि भावना पण योग्य पद्धतीनं व्यक्त झालेल्या आहेत.

किसन शिंदे's picture

30 Jun 2011 - 9:24 am | किसन शिंदे

जात जात म्हणणार्‍याच्या टिरीवर फटके हाणा
आणि आरक्षण फक्त गरीबाच्या पोरांसाठीच आणा
ह्ये एक नंबर....

माझी जात कोणी काढायची नाय
ती फकस्त अ‍ॅडमिशन साठी राखीव हाय
उगा काय म्हनाला तर अ‍ॅट्रोशिटी चा हवाला हाय

माझी जात कोणी काढायची नाय
ती फकस्त अ‍ॅडमिशन साठी राखीव हाय
उगा काय म्हनाला तर अ‍ॅट्रोशिटी चा हवाला हाय

तुझ्याच शोधात....'s picture

3 Jul 2011 - 3:19 pm | तुझ्याच शोधात....

मी कवीतेशी सहमत्....मस्तच राव..

पट्ल आम्हाला.. पण ज्याचा आतरजातीय आहे त्याची मजा आहे. त्याला दोन्ही दरवाजे उघडे...

पण ओपन शिवाय कोणी क॓पनीत जास्त काळ टिकु शकत नाही....