तुम्ही नकळतपणे धर्मांतराला मदत करत आहात का?

आंसमा शख्स's picture
आंसमा शख्स in जनातलं, मनातलं
21 Jun 2011 - 11:32 am

वल्ड व्हिजनच्या लोभसवाण्या जाहिराती आपण सर्वजण पाहत असतो. त्या निरागस चेहेर्‍याच्या मुलांना मदत करण्याची इच्छा आपणा सर्वांनाच होते. यांच्या जाहिराती महत्त्वाची संकेतस्थळे, बरेचसे कॉर्पोरेट इव्हेंटस ते चक्क जेट एयरवेज मध्ये फिरणारा डोनेशनचा डबा येथ पर्यंत दिसतात. मी ही अशाच एका निरागस चेहेर्‍याच्या मीना नावाच्या मुलीला मदत देण्याच्या निर्णयावर येणार होतो.
पण पैसे देतांना आधी हात भाजले आहेत म्हणून जरा खात्री करण्यासाठी माहिती घ्यायला सुरुवात केली. मला मिळालेली माहिती तुमच्या पर्यंतही पोहोचावी म्हणून हे लेखन करतो आहे.

स्थापना

वल्ड व्हिजनची स्थापना १९७७ साली अमेरिकेत वॉल्टर मुन्याहेम यांनी केली. ही एक शिक्षण, दान व प्रगती या द्वारे इव्हॅंजलिकल(धर्म परिवर्तन करणारी) संस्था आहे. ही सर्व धर्म परिवर्तन करणार्‍या संस्थांची शिखर संस्थाही आहे. इ.स. २००८ मध्ये या संस्थेला सुमारे अडीच बिलियन डॉलर्सच्या देणग्या मिळाल्या. ही संस्था आपल्या प्रमुख मार्गदर्शक तत्त्वांनुसार (स्टेटमेंट ऑफ फेथ नुसार) कार्य करण्यास कटिबद्ध आहे.
वल्ड व्हिजन च्या वेबसाईटनुसार ही प्रमुख तत्त्वे पुढील प्रमाणे-

* बायबल हे जगात एकमेव अधिकारक ग्रंथ आहे ज्यावर आमचा विश्वास आहे.
* जगात फक्त एकच देव आहे तो पिता, मुलगा आणि आत्म्याच्या रुपात आहे.
* आमचा विश्वास फक्त येशूवर, त्याच्या चमत्कारांवर, त्याच्या कुमारी मातेच्या पोटातून झालेल्या जन्मावर, त्याच्या आयुष्यावर, येशूच्या शक्तीमान होणे आणि कीर्तीवान पुनरुत्थानावर आहे.
* मार्गापासून ढळलेल्यांना पाप्यांना मुक्ती देणे हे परम कर्तव्य आहे.
* ख्रिश्चन झालेल्या लोकांत आत्म्याच्या असण्याने आपल्याला दैवी आयुष्य प्राप्त होते यावर आमचा विश्वास आहे.
* मार्गावरून हरवलेले आणि सापडलेले या दोहोंचे पुनरुत्थान केले पाहिजे अन्यथा त्यांना नरकात जावे लागेल.
* आमचा फक्त प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास आहे.

ही मार्गदर्शक तत्त्वे ख्रिस्ती धर्मप्रसारकांची प्रमुख संस्था नॅशनल असोसिएशन ऑफ एव्हेंजलिकल्स यांच्या तत्त्वांशी सुसंगत आहेत.

नेतृत्त्व
वल्ड विजनचे शिक्षण देतांना एक ख्रिस्ती धर्मप्रसारक संस्था या नात्याने धोरण म्हणून समाजातील नेतृत्त्व करू शकतील अशी लोकं शोधून त्यांना ख्रिस्ती नेतृत्त्व म्हणून पुढे आणण्यासाठी झटत असते. त्यासाठी शिक्षण, प्रशिक्षण, सेमिनार्स आणि इतर विवीध मार्गांचा अवलंब केला जातो. वल्ड विजनच्या विश्वासाप्रमाणे मिशनरी कार्य हेच त्यांचे प्रमुख कार्य आहे आणि त्यासाठीच ते झटतात. भारतात सध्या अनेक ख्रिस्ती नेते आहेत त्या मध्ये या कार्याचे यश असू शकते*. Minister of Information and Broadcasting, Ministry of Social Justice and Empowerment, Ministry of Water Resources and Ministry of Minority Affairs, Ministry of Rural Development. सध्याच्या काळात ही संस्था सुमारे दोन लाख सत्तावीस हजार एकशे आठ (227,108) मुलांना तत्त्वांनुसार प्रशिक्षण देत आहे.

आरोप

दुर्दैवाने अनेक मोठ्या संस्थांवर काही आरोप होतात तसेच आरोप या भव्य संस्थेवरही झालेले आढळतात. जसे की ते जे मूल जाहिरातीत दाखवतात त्या मुलाला तुम्ही देत असलेले पैसे दिले जातीलच असे नाही. कारण त्यामुळे समाजात असंतुष्टता माजते असे ते मानतात. त्या ऐवजी सर्व पैसे एकत्र केले जातात व त्यातले काही योग्य त्या कारणासाठी योग्य त्याठिकाणी वापरले जातात. मात्र त्यातले काही पैसे त्या मुलाच्या कल्याणासाठी खर्च होतील असे पाहिले जाते. जसे की थंडीच्या काळात तुम्ही स्पॉन्सर केलेल्या मुलांना मोफत जॅकेट देणे वगैरे. मात्र हे त्या वेबसाईटवर डिक्लियर्ड आहे.
वल्ड विजन ही मिशनरी कार्यासाठी जगभरातून सर्वात जास्त पैसा भारतात आणणारी संस्था आहे.

विकिपेडिया वरील माहिती नुसार भारतातल्या वल्ड व्हिजन हिंसक कार्यात गुंतल्याचे आरोप आहेत. जसे की स्वामी लक्षमणानंद यांची हत्या. स्वामी लक्षमणानंद यांनी वल्ड व्हिजन पैशाने ख्रिस्ती धर्मांतर करवते असा आरोप केला होता. हे थांबावे म्हणून ते प्रयत्नशील होते मात्र त्यातच त्यांचा खून झाला.

तसेच या संस्थेवर ओरिसा राज्यातील कंधमाळ येथे ख्रिस्ती-हिंदु वांशिक दंगल घडवल्याचाही आरोप केला जातो. २००४ मध्ये आलेल्या सुनामीच्या काळात पैसे आणि जीवनावश्यक वस्तुंसाठी धर्मांतर करायला लावल्याचा आरोप केला जातो. तसेच या काळात आलेल्या मोठ्या देमोठ्याया संस्थेने गुलदस्त्यात ठेवल्या असा अजून एक आरोप दिसून येतो.

प्रकल्प
मात्र हे आरोप असले तरी शिक्षणाच्या कार्यात या संस्थेचे योगदान दुर्लक्ष्य करण्यासारखे नाही हे माहिती वरून लक्षात आले असेलच. भारतात सुमारे ४० मोठे प्रकल्प संस्था चालवत आहे. हे सर्व प्रकल्प भारतातून दान झालेल्या पैशानेच चालवले जात आहेत.

महाराष्ट्रात सध्या द विदर्भ लाईव्हलीहुड प्रमोशन प्रकल्प सुरु आहे. यानुसार अतिगरीब शेतकरी शोधून त्यांना योग्य ती मदत संस्थेच्या तत्वांनुसार दिली जाते आहे.

हे सर्व वाचल्यावर तुमच्या लक्षात आले असेल या संस्थेला जमेल तेव्हढी मदत करणे इतकेच आपल्या हातात आहे. तुमच्या पैकी कुणी मदत करण्यास उत्सुक असेल तर ही माहिती त्यांना जरूर द्या. हवे असेल तर हा लेख कॉपी पेस्ट करून मेल करू शकता.

अधिक माहिती साठी हे दुवे पाहा.
१. वल्ड व्हिजन http://www.worldvision.org/content.nsf/about/hr-faith आणि भारतीय पान - http://www.worldvision.in/About_Us
२. विकिपेडियाचे पान - http://en.wikipedia.org/wiki/World_Vision_International#cite_note-13
३. नॅशनल असोसिएशन ऑफ एव्हेंजलिकल्स http://www.nae.net/about-us/statement-of-faith
४. एक चौकशी http://www.globalpost.com/passport/correspondent-call/100127/inside-the-...
५. डेली पायोनियर - http://www.dailypioneer.com/61677/RSS-wing-blames-Cong-MP-for-triggering...
६. http://www.vigilonline.com/index.php?option=com_content&task=view&id=102...
७. परदेशात दिला जाणारा माहितीचा नमुना - http://www.worldvision.com.au/issues
/human_trafficking___slavery/where_is_it_happening_/YourPassageToIndia.aspx
८. परदेशातून केले जाणारे कार्य - https://worldvision.org.nz/WhereWeWork/India/Dumka/

नोंद - या लेखाचे सर्व प्रताधिकार सोडून दिलेले आहेत.
*नेतृत्त्वातील नावे या संबंधीत असतील असे नाही हा एक ढोबळ निष्कर्ष आहे. हा चुकीचा असू शकतो.

अर्थव्यवहारसमाजजीवनमानशिक्षण

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

21 Jun 2011 - 3:13 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

इतके गंभीर आरोप असण्यार्‍या संस्थेला देणगी देणे हे मला अजिबात पटत नाही.
मान्य आहे की संस्था मोठी झाली की असूयेतून देखिल असे आरोप होऊ शकतात, पण तरीही या आरोपांची शहानिशा होणे अत्यंत मह्त्वाचे आहे.
सगळ्यात जास्त तिडीक आणणारा प्रकार कुठला असेल तर जिवनावश्यक वस्तूंसाठी धर्मांतराची अट असणे.
असे होते की नाही? त्यावर अंकुश कसा ठेवला जातो? संस्थेचे उच्च पदाधिकारी याला कदाचीत अपवाद असू शकतील पण ग्रासरुट लेव्हल वरती असे होत नाही ह्याची खात्री कोण देणार?
असे प्रकार काही वर्षांपूर्वी गोव्यात झाल्याचे कानावर आले होते (चूभूद्याघ्या)
त्यांचे इतर कार्य कितीही कौतुकास्पद असले तरी जर असे प्रकार त्या देणगीतून मिळणार्‍या ०.००००१% पैशातून जरी होत असतील तर ते निंदनीय आहे. आणि असे असेल तर सत्यसाईबाबांच्या संस्थेलाही देणगी देणेही समर्थनीय ठरेल.
वल्ड विजन काय किंवा सत्यसाईबाबा काय, मिळणार्‍या देणगीचा वापर योग्य रितीने गरजूंपर्यंत पोहचवू शकत नसतील किंवा त्याचा संस्थेच्या प्रवर्तकांच्या अथवा कार्यकर्त्यांच्या वैयक्तीक प्रगतीसाठी दुरुपयोग करत असतील तर त्यांना देणगी देणे हा शुद्ध मुर्खपणा ठरतो.
अर्थात हे माझे वैयक्तीक मत!!

JAGOMOHANPYARE's picture

21 Jun 2011 - 3:51 pm | JAGOMOHANPYARE

तू 'इकडेही' आलास/आलीस काय रे? :)

'तिकडे' पहिलाच दिवस, पहिलीच पोस्ट तीही किरिस्ताव धर्म परिवर्तनाची !

निनाद's picture

21 Jun 2011 - 4:57 pm | निनाद

यांना मदत करू नका असे म्हणायचे आहे का? मग इतके आडून कशाला सांगता?

सहज's picture

21 Jun 2011 - 5:01 pm | सहज

बिचारी मीना

वर्ल्ड व्हिजन चे जाऊ द्या हो
त्या मीनाचे पुढे काय झाले ? तुम्ही तिला अशी नाही तर तशी म्हणजे डायरेक्ट तरी मदत करुच शकत होता .

आंसमा शख्स's picture

23 Jun 2011 - 11:12 am | आंसमा शख्स

वल्द विजनचे लोक तुम्हाला त्या मुलांना कधीच भेटू देत नाहीत हे तुम्हाला माहिती नाही का? इतकेच काय तुम्ही स्पॉन्सर केलेल्या मुलाचे पैसे त्याच मुलाला आणि तसेच्या तसे जातील असे नाही.
या प्रश्नावर चर्चा व्हावी म्हणून तर हे लिखाण केले.

विसुनाना's picture

23 Jun 2011 - 11:27 am | विसुनाना

नुकतेच अपघाती मृत्यु पावलेले मुख्यमंत्री चंद्रशेखर रेड्डी (?)

-तुम्हाला 'वाय. एस. राजशेखर रेड्डी' म्हणायचे आहे का?
बाकी चालू द्या.

आंसमा शख्स's picture

23 Jun 2011 - 11:41 am | आंसमा शख्स

काढलीच आहेत उगाच कशाला...?

मिसळपावने दिलेल्या संपादन सुविधेचा गैरवापर करून सदर लेखकाने चुकीची नावे आणि माहिती असलेला वरील लेखाचा काही भाग वगळला आहे याची कृपया सर्व वाचकांनी नोंद घ्यावी.

हा भाग 'नेतृत्त्व' या मुद्द्यात होता आणि त्यात चंद्रशेखर रेड्डी, अगाथा संगमा अशी काही नावे होती.

चूक केली तर ती मान्य करून दिलगिरी व्यक्त करण्याचा मोठेपणा लेखकाला दाखवता आला नाही काय?

बाकी चालू द्या.

आंसमा शख्स's picture

23 Jun 2011 - 12:05 pm | आंसमा शख्स

मला अचानक अपघाती मरायचे नाही, म्हणून काढली ती नावे.

राजशेखर रेड्डीच होते ते. त्यांनी तिरुपतीचा डोंगर चर्चच्या नावाने प्रसिद्ध व्हावा म्हणून आटापिटा चालवला होता असे म्हणतात - सच खुदा जाने.

शिल्पा ब's picture

23 Jun 2011 - 11:31 am | शिल्पा ब

पटत असेल तरच पैसे द्या. संस्थेची माहिती असल्याशिवाय मी अज्जिबात एक पै सुद्धा देत नाही. बाबा, आई वगैरे नाही अन मिशनरी तर त्याहून नाही. स्वतःचा निर्णय स्वतः विचारपूर्वक घ्या.

परिकथेतील राजकुमार's picture

23 Jun 2011 - 12:12 pm | परिकथेतील राजकुमार

मी तर कुणालाच पैसे देत नाही.

च्यायला इथे संध्याकाळच्या क्वार्टरची मारामार. आणि दान धर्म कसला करताय.

निनाद's picture

24 Jun 2011 - 9:53 am | निनाद

यातली काही माहिती मराठी विकीवर देऊ शकाल का?
किंवा तुम्हीच तेथे येऊन लिहिलीत फार उत्तम.
काही मदत लागल्यास जरूर विचारा.