निओ-अद्वैती पसायदान

मूकवाचक's picture
मूकवाचक in जे न देखे रवी...
26 May 2011 - 8:09 pm

आता भासात्मके देवे। येणे वाग्यज्ञे कोपावे|
कोपोनी मज द्यावे। कसाबदान हे||

जे सुष्टांची वीरता सांडो। तया निराकारी रती वाढो|
दुष्टा अकस्मात जडो। प्रेम शांतीचे||

दुरिताचे जीवित जावो। विश्व अधर्म सूर्ये पाहो|
जो जे ढापील तो ते लाहो| प्राणिजात||

गर्जत विकल मंडळी| नश्वरनिष्ठांची मांदियाळी|
धडपडत भूमंडळी| भेटतू भूता||

करा हीनबुद्धीचे तांडव| वासनाविकृतींचा ठाव|
बोलती हे पुंगव| तर्कट्यांचे||

मानवास जे लांच्छन| मुखंड जे बुद्धिहीन|
ते सत्याचे सदा खंडन| करिते होतू||

किंबहुना सर्व सुखी| मत्त होवोनी तिन्ही लोकी|
त्याजिजो आदिपुरुषी| अखंडित||

आणि ग्रंथोपजीविये| विशेषी लोकी इये|
इष्टानिष्टनकळे| होआवेजी||

येथ म्हणे श्रीक्रौर्येश्वरावो| हा होईल दानपसावो|
येणे वरे हरिभक्त| दुखिया झाला||

(पुन:प्रकाशित)

अद्भुतरसकविता

प्रतिक्रिया

स्वानन्द's picture

26 May 2011 - 8:32 pm | स्वानन्द

:)

निओ-अद्वैती पसायदान
आवडले

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

27 May 2011 - 11:56 am | मिसळलेला काव्यप्रेमी

ॐ क्रांती: क्रांती: क्रांती:

धन्या's picture

27 May 2011 - 10:58 pm | धन्या

ज्ञानीयांचा राजासुद्धा विडंबनातून सुटला नाही तर...

विडंबन छान जमलं आहे तरीही आतून कुठेतरी वाटतंय की निदान पसायदानाचं तरी विडंबन व्हायला नको होतं. असो... आमच्या मनाचा हळवेपणा...

अक्षरे गाळून वाची । कां तें घाली पदरिचीं ॥
नीघा न करी पुस्तकाची । तो येक मूर्ख ॥

- दासबोध, दशक मूर्खलक्षणनाम, समास मूर्खलक्षण

अत्रुप्त आत्मा's picture

27 May 2011 - 11:43 pm | अत्रुप्त आत्मा

फार छान...अप्रतिम...

गोगोल's picture

28 May 2011 - 6:00 am | गोगोल

:)