मी जेव्हा बालवाडीत होते... साधारण २०-२५ वर्षांपूर्वी...
तेव्हा १ लहान मुलांसाठीचे पुस्तक होते माझ्याकडे, पाठपुस्तक नव्हे!
त्यात लहान मुलांसाठी गोष्टी होत्या. पुसट पुसट आठवतायत. त्यान १ बदकाची गोष्ट होती. बदकाचे लाकडी घर - त्याला १ गोल खिडकी - त्यात ते पिवळे बदक - आणि पाऊस पडतो का काय अशी ती गोष्ट होती. नीट आठवत नाहीये. दुसर्या गोष्टीत बिस्किटे तयार करणार्या मुलीची होती. त्यात मुलीचे, तिच्या आईचे की मावशीचे, बिस्किटे की डोनट की त्यासदृश काहीतरी, गव्हांकूर यांचेही चित्र होते.
वेगळ्या प्रांतातील अनुवादीत कथा असतात तसे काहीसे होते.
मी त्या पुस्तकाच्या शोधात आहे.
कोणाला आठवतेय का हे पुस्तक? कुठे मिळेल माहितीये का?
एखादी जुनी वस्तू खूप वर्षांनी पाहिली की त्यावेळच्या सगळ्या स्मृती उजळून निघतात...
प्रतिक्रिया
16 May 2008 - 7:21 pm | स्वाती राजेश
तु आता कोठे आहेस हे माहित नाही, पण पुण्यामधे अत्रे सभागृहात पुस्तकांची वेगवेगळ्या प्रकाशनांची एक्झिबीशन असतात.
सकाळ मधे त्याची जाहिरात येते, साधारन २ आठवडे असतात, तिथे मिळतात काही जुनी पुस्तके...
मला तिथेच संस्कारभारती १,२,३ अशी जुनी लहान मुलांसाठीची पुस्तके तिथेच मिळाली होती....
16 May 2008 - 7:22 pm | कलंत्री
माझ्या महविद्यालयीन जीवनात शरद नावाचा एक मित्र होता. त्याच्याकडे बालवाडी पासून ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंतची सर्व पुस्तके त्याने जपून ठेवली होती. ( १९८०).
मी पण माझ्या मुलांना सांगितले आहे की त्यांनीही अशीच सवय लावावी. लहानपणाची पुस्तके म्हणजे मोलाचा ठेवा असतो.
16 May 2008 - 11:00 pm | अनिता
हे बद्काचे पुस्तक बहुधा सोविएत नारी / तत्सम पुस्तकावरुन घेतलेले असावे. मला आटवते असेच काही..