अंक पहिला >>
निमीत्त होते मुंबईतील आझाद मैदानावर झालेल्या फेरीवाल्यांची सभा
या सभेत बी.जे.पी चे शहरअध्यक्ष पदावर असलेले "के राज पुरोहित" मुंबई इलाख्या मधुन जमलेल्या तमाम फेरीवाल्यांना (प्रामुख्याने भय्ये) यांना आपण किती हुशार/ शुर/ आणी अकलेचे कांदे आहोत हे आवेषात दाखवत होते...
(त्यानी त्यांची हुशारी आणी शुरपणा एक विद्यार्थी असलेल्या मुलीवर दाखवला)
मै राज पुरोहित, मै भारतीय जनता पार्टिका अध्यक्ष (छाती ठोकुन) मुंबे का प्रदेश अध्यक्ष यहा ये ऐलान करता हु की..जो कुछ उस सीडी मै दिखाया गया है वो सब झुट है !
ये गरीब हौकर्स के खिलाफ षडयंत्र है वो सीडी नकली है.
हे महाभाग महाराष्ट्रामध्ये राहून, महाराष्ट्रीयन लोकांची धिंड काढतायत,
त्या ठाण्यातील पाणीपुरीवाल्याच्या घटनेचा संदर्भ देताना ते म्हणाले, की एक गरीब बिचारा ७०/८० वर्षाचा म्हातारा मेहनत मजदुरी करीत आहे त्याला यात नाहक गोवल गेलं आहे "एखादी चांगली मुलगी एवढ्या मोठ्या माणसाला लघुशंका करताना पाहिल का ? अगदी रेड लाइट एरियातील बाईही एवढ्या मोठ्या माणसाला लघवी करताना बघणार नाही...इथे धडधडीत शिवी दिलीय( तेरि मा की ***) आणि ही पोरगी फोटो काढते... तिला काही लाज-शरम आहे की नाही ? असे शब्द पुरोहित यांनी वापरले आहेत या मुलीने नुसते पाहिले नाही, तर त्याचे शुटिंगही केले. हे करताना तिला शरम नाही का वाटली? यावरूनच तिच्या चारित्र्याची कल्पना येते. हे शुटिंग म्हणजे मुंबईत मेहनत करणा-यांविरुद्धचा डाव आहे.
हुशारी संपली आता अंक दुसरा>>
वरील प्रकारे आपली अक्कल पाजळवल्या नंतर साहजीकच कु.अंकिता राणे आणी तिचे कुटुंबिय यांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात पुरोहित यांच्याविरूद्ध लेखी तक्रार दाखल केलि यात मनसे ने सुद्धा सपोर्ट केला आहे.
म न से ने पुरोहित यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत अशी बेताल वक्तव्य करणा-या राज पुरोहित यांना अटक करावी, अशी मागणी लावून धरली आहे,
पोलीस ठाण्यात पुरोहित यांच्याविरूद्ध लेखी तक्रार केल्यानंतर राज पुरोहिताना उपरती झाली.
( उपरती कसली घाबरला)
संध्याकाळी वृत्तवाहिन्यांशी बोलताना त्यांनी सपशेल लोटांगण घालत माफीनाम्या ची भाषा केली. अंकिता राणे हिच्याबद्दल आपण जे काही बोललो ते भावनेच्या भरात बोललो, हे गैरसमजुतीतून घडले बऱ्याच दिवसा पासुन कुणीतरी माझे विरुद षडयंत्र करत आहे (हा घाणेरड्या राजकारण्याचा कळसच).
त्या भय्याला मी ओळखत सुद्धा नाही ना मी कधी अंकीता राणेला भेटलोय.
( मग कसली शहानिशा न करता ही अशी मुक्ताफळे का बरं उधळली??) (खोटरडे साले)
माझ्या मुले अंकिता बेनच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी बिनशर्त माफी मागतो, असे पुरोहित ने स्पष्ट केले. एवढेच नव्हे तर शक्य झाल्यास अंकिताची भेट घेऊन लेखी माफी मागण्याची आपली तयारी आहे,असेही सांगीतलेय.
मध्यंतरी काँग्रेसचे खासदार संजय निरुपम यांनी राजकारण करत पाणीपुरीवाल्यांसाठी कार्यशाळा आयोजित केली होती.(शेवटि एक भय्याच भय्याच्या मदतीला) त्यांनी असे केल्यानंतर भाजपने पण स्वत:ची वोट बँक वाचवण्यासाठी पाऊल उचलले आणि त्यांच्या पेक्षा काहीतरी वेगळं केलं हे दाखवण्यासाठि थेट अंकिता राणेच्या हिच्या चारित्र्यावरच हल्ला केला. भर सभेत राज पुरोहित यांनी वाजवलेल्या ढोल मुळे पाणीपुरीवाल्यांच्या भरपुर टाळ्या पडल्या असल्या तरी सदर प्रकरण त्याना चांगलच महाग पडणार आहे असं दिसतयं,
बाकी पुरोहित हे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या गटातील आहेत, अजुन यावर भाजपच्या जेष्ठ नेत्यानी
(गडकरी/ मुंडे/ अडवाणी) तोंड खोललेलं नाही.
व्हिडीयो इथे पहायला मिळेल.
(http://starmajha.starnews.in/videos/mumbai/5006-2011-05-05-12-38-51)
नेहमी स्वतःच भारतीय संस्कृती चे ढोल वाजवणाऱ्या भारतियजनतापार्टि च्या सु-संस्कृत पणाची ही
पहीलीच वेळ नाही, या अगोदर सुद्धा या पार्टी चे राष्ट्रीय प्रदेश अध्यक्ष मुक्तार अब्बास नक्वी यांनी २६/११ च्या हल्ल्यात मृतांना श्रध्दांजली देण्यासाठी आलेल्या स्त्रीयांना
"लिपस्टिक ओर पावडर लगानेवाली ओरतें मोमबत्ती लेके रस्ते पे उतरी है" असं वक्तव्य केलं होतं..
स्त्रीयांची विटंबना करणं हे कधी थांबवनार???
श्रध्दांजली वाहण्याचे तारतम्य तरी त्या स्त्रीयांनी दाखवले,पण भाजपच्या हाती सत्ता असताना त्यांनी शहीदांसाठी मेणबत्त्या तर लावल्या नाहीच पण दहशतवाद रोखण्यासाठी काय दिवे लावले ते साऱ्या देशाला माहित आहे शहिदांच्या शवपेट्यांच्या खरेदित भ्रष्टाचार करुन शहिदांच्या टाळु वरील लोणी खाण्याचा घ्रुणास्पद प्रकार यांनी केला आहे
बाकी सत्तेची नशाच न्यारी पक्षात टिकुन राहण्यासाठी आणी आपली खुर्ची वाचवण्यासाठी जनतापार्टी च्या पदाधिकाऱ्याना फारच कसरत करावी लागलीए...फक्त पक्ष श्रेष्ठींची आपल्यावर मर्जी रहावी म्हणुन एका स्त्री ची झालेली विटंबना याबद्दल त्यांना एक स्त्री असुन सुध्दा काहीच वाटत न्हवते..
पहा बिजेपीच्या महिला आघाडिच्या अध्यक्षा मिनाताई (आडनाव कळु शकले नाही) म्हणतायत आता हा विषय किती वाढवायचा? त्यांनी माफी मागीतली आहे..राजीनामा कशाला मला या वादात पडायच नाही..
भाजप प्रवक्त्या शायना एन सी : पुरोहितच मत हे त्याच वैयक्तीक मत आहे त्याचा पक्षा शी काही संबंध नाही..आणी मि त्या पक्षात असल्यामुळे त्यांचा राजीनामा मागण्याचा अधिकार मला नाही तो निर्णय पक्ष श्रेष्ठी घेतील यावर आपलं वैयक्तीक मत काय आपण जर सदर पक्षात नसता तर राजीनामा मागितला असता का? यावर ही त्यांनी भाष्य करायच टाळलं.
शिवसेनेच्या नेत्या निलम गो-हे यांनी तर कहरच केला त्यांच (पुरोहित) स्लिप ओफ टंग झालं आहे.
तसेच राजीनामा घ्यायचा का नाही हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे, आम्ही काय बोलनार??
यावर आपलं वैयक्तीक मत काय असेल आपण जर मित्र पक्षात नसता तर राजीनामा मागितला असता का? यावर त्यांनीही भाष्य करायच टाळलं.
आणी शेवटि राजीनाम्याची मागणी कुणीच केली नाही..
सत्ताधाऱ्या कडुन नेहमी उठसुठ राजीनाम्याची मागणी करणाऱ्या निलम गो-हे आज अशा एका एकीका बदलल्या?आपण ही एक स्त्री आहोत हे ही त्या विसरल्या?
बाकी हेच जर यांच्या विरोधकां पैकि कुणी केलं असतं तर यांनी रान उठवलं असतं .
एका स्त्री ची विटंबना करून तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून फक्त माफी मागायची म्हणजे सगळं संपल असं म्हणायच का?
( उद्या कुणी बलात्कार करुन माफीही मागेल sorry बोलेल त्याने प्रश्न मिटेल का?)
अवांतर : महालक्ष्मी मंदीर गाभ्याऱ्यात स्त्रीयांना प्रवेश नाकारावा यासाठी काही सनातनी स्त्रीयांही होत्या/ आणी सध्या उपोषण करत आहेत त्यांच्यात आणी वरील स्त्रीयांच्या वृत्तीत फारसा फरक नसावा
अतीअवांतर : महाराष्ट्रामध्ये राहून महाराष्ट्रीयन लोकांची त्यांच्या आई/ बहिनींची विटंबना हे उघडपणे करतातच कसे ????
पुरोहितच मत हे त्याच वैयक्तीक मत आहे त्याचा पक्षा शी काही संबंध नाही..असं बोलायची तर आता फैशनच झाली आहे,पुरोहिताने वक्तव्य करताना आपण कोण? कुठे काय बोलत आहोत याचे सुध्दा भान ठेवले नाही निर्लज्ज पणाचा अगदी कळसच गाठला बेशरम पणा कसा असु नये याचा हे उत्तम उदा. आहे..
नेहमी छत्रपतीं चे स्त्री दाक्षीण्याचे दाखले देणाऱ्या आणी राजकारण करणाऱ्या मित्र पक्षाची ही यावर काय भुमीका आहे ते अजुन समजलेले नाही
जाताजाता: सत्तेच हाडूक मिळविण्यासाठी सगळेच लाचार असतात याची पुन्हा एकदा जाणीव झाली.:)
प्रतिक्रिया
6 May 2011 - 11:43 pm | माझीही शॅम्पेन
मला वाटत राज पुरोहित अस बोलले म्हणून सपूर्ण बीजेपीला यात गोवण्याच काही कारण दिसत नाही.
जर अंकीताने खरोखर पोलिसात तक्रार केली असेल तर कायदा आपल काम करेलच (?) आपण काय बोलणार. तुमच्या मते राज पुरोहित ह्याच नक्की काय झाले पाहिजे हे स्पष्ट केल तर बर होईल
बाकी मनसे-नि हा मुद्दा अलगद उचलून धरला (नेहमीप्रमाणे) ते पाहून सुखावलो !
6 May 2011 - 11:49 pm | माझीही शॅम्पेन
खर तर कोण राज पुरोहित हीच प्रतिक्रिया लिहालाया आलो होतो :)
7 May 2011 - 9:34 pm | अजातशत्रु
@तुमच्या मते राज पुरोहित ह्याच नक्की काय झाले पाहिजे हे स्पष्ट केल तर बर होईल
माझ्या मते श्री.राज पुरोहित यांनी जी मुक्ताफळं उधळून जी मर्दानगी दाखवली आहे त्या बद्द्ल त्यांचा भारतीय जनता पार्टि अडवाणी/ मुंडे/ गडकरी आणि बिजेपीच्या महिला आघाडिच्या अध्यक्षा मिनाताई भाजप प्रवक्त्या शायना एन सी / शिवसेनेच्या नेत्या निलम गो-हे यांच्या तर्फे जाहीर सत्कार करावा आणी याबद्द्ल त्यांना पदोन्नती देऊन त्यांचा यथोचीत गौरव करावा..
आणी त्या सन्माननिय पाणी-पुरीवाल्याचा खोट्या सीडी बनवून प्रसिद्धी मिळववीण्याचा प्रयत्न केल्याबद्द्ल अंकीता राणे हिच्यावरच केस करावी..
मला वाटतं माझीही शॅम्पेन आपले समाधान झाले असेलच...
@मला वाटत राज पुरोहित अस बोलले म्हणून सपूर्ण बीजेपीला यात गोवण्याच काही कारण दिसत नाही.
हे तुम्ही स्वतः बोलत आहात की एक बीजेपी समर्थक???
नाही जो हलकट (माणुस) आपली छाती ठोकून सांगत असेल की मी भारतीय जनता पार्टिचा मुंबई प्रदेश अध्यक्ष या नात्याने बोलत आहे त्याचा आणी पार्टिचा काही संबंध नाही कसा?
हे त्याच वैयक्तिक मत आहे म्हणजे तो काय अपक्ष आहे?
उद्या अशि मुक्ताफळं उधळल्या वर जर तो निवडून आलाच तर ते श्रेय याला नाहीतर काय तुम्हाला मिळनार राव..?
पक्षाच्या अशा महत्वाच्या पदावर असणार्या व्यक्तिने त्याची जबाबदारी ओळखून वागायला नको?
(मनसे कार्यकरत्यांनी जेव्हा भय्यांना मारले तेव्हा नोटिसा मनसे पक्षालाच म्हणजेच राज ठाकरेंना पाठवल्या होत्या)
हे विसरता कसे..
@आपण काय बोलणार. तुमच्या मते राज पुरोहित ह्याच नक्की काय झाले पाहिजे हे स्पष्ट केल तर बर होईल..
तुम्ही काय बोलणार राव त्याला सहिष्णूता असावी लागते,
संवेदनशील मन असाव लागतं,
ती कुनाची का मुलगी/ बहीण असेना, जर कुणी माणूस कुणाच्या आई/ बहीनी (स्त्रि) बद्दल जर असे अश्लाघ्य अनुदार उद्गार काढत असेल तर ते आमच्या सारख्याच्या मस्तकात जाणारच..
स्त्रियांवर कसली मर्दानगी दाखवायची? हिच भाषा त्याने कुना आमदार/ खासदार कींवा इतरां बद्द्ल वापरली असती तर??
बाकी कसं असतं ना अशा गोष्टि जेव्हा आपल्या बाबतीत घडतात तेव्हाच त्याची किंमत कळते हो तेव्हाच आपलं रक्त सळसळतं आणी वाईट वाटतं Personally घेऊ नका हे सर्वांसाठी आहे.
आय मीन ज्यांना या बद्दल काही वाटत नाही त्यांच्या साठी..
अवांतर : माझी कोणत्याही पक्षा शी काहीही देणेघेणे बांधीलकी नाही :)
7 May 2011 - 11:01 pm | माझीही शॅम्पेन
चर्चा वैयक्तिक पातळीवर घसरत चालल्याने गप्प राहायचे ठरवेल आहे !
सामुदायिक शिवी-घाल कार्यक्रमाला शुभेच्छा !
9 May 2011 - 7:34 pm | अजातशत्रु
@मला वाटत राज पुरोहित अस बोलले म्हणून सपूर्ण बीजेपीला यात गोवण्याच काही कारण दिसत नाही.
जर अंकीताने खरोखर पोलिसात तक्रार केली असेल तर कायदा आपल काम करेलच (?)आपण काय बोलणार. तुमच्या मते राज पुरोहित ह्याच नक्की काय झाले पाहिजे हे स्पष्ट केल तर बर होईल
बाकी मनसे-नि हा मुद्दा अलगद उचलून धरला (नेहमीप्रमाणे) ते पाहून सुखावलो !@माझीही शॅम्पेन
...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
हा प्रतिसाद तुमचाच ना...??
मग...
चर्चा वैयक्तिक पातळीवर घसरत चालल्याने गप्प राहायचे ठरवेल आहे !
सामुदायिक शिवी-घाल कार्यक्रमाला शुभेच्छा !
हा कांगावा कशासाठी बुवा..
तुम्ही माझे वैयक्तिक मत विचारलेत.....मी तुम्हाला वैयक्तिक उत्तर दिले,हे चुकिचं आहे का?
मग "स्वतःच वैयक्तिक प्रश्न विचारुन" चर्चा वैयक्तिक पातळीवर घसरत चालली आहे असं म्हणनं गैर लागू आहे ना,
@सामुदायिक शिवी-घाल कार्यक्रमाला शुभेच्छा !
मिन तुम्हाला वरील प्रकारा मुळे राग आला नसून,
बिचार्या राज पुरोहिताला हे लोक उगाचच शिव्या घालत आहेत त्यामुळे दु:ख झाले असावे...
नाही तुमच्या प्रतिसादां वरुन तरी असेच प्रतित होत आहे.
(बाकि तुम्हाला राग का आला नाही/ किंवा आला असल्यास तो तुम्हि इथे व्यक्त का केला नाहि याबद्दल माझा काहिच आक्षेप नाहि)
अवांतर : काहींना नेहमी इतरां पेक्षा काही तरी वेगळा प्रतिसाद देण्याची खुमखुमी असते,
नेहमी वेगळे किंवा विरोधी मत देउन आपणच किति हुशार आहोत असे दाखविण्याची हौस असते,
पण ते त्यात नेहमीच यशस्वी होत नाहित.:)
अतीअवांतर: @खर तर कोण राज पुरोहित हीच प्रतिक्रिया लिहालाया आलो होतो@माझीही शॅम्पेन
त्यामुळे मला हि वैयक्तिक चर्चा पुढे वाढविण्याची इच्छा नाही...
पुढिल वाट चालीस तुम्हालाही शुभेच्छा !!!
धन्यवाद..
6 May 2011 - 11:55 pm | विचारी मना
आणि निलम गोर्हे सारखी नाटकी बाई पाहिली नाही.....नको तिथे जीभ चर चर चालते..
म न से ने याप्रकरनी राजपुरोहिताच्या अटकेच्या मागणीपेक्षा त्याला चोप दिला असता तर बर झाल असतं...
अंकिता राणेचे अभिनंदन..
7 May 2011 - 1:58 pm | चिगो
हरामखोर माणूस आहे साला... काय तर्क द्यावा हे पण कळत नाही मुर्खांना..
निरुपमनी पण पाणीपुरीवाले मुंबईची लाईफलाईन आहेत, वगैरे पुड्या सोडल्या. पण त्यात आक्षेपार्ह काही नव्हतं..
उद्या ह्यांच्या आई-बहीणींवर बलात्कार होत असला तरी हे वाचवायला जाणार नाहीत. असला उघडा-नागडा संभोग बघतात का सभ्य घरातली लोकं?
7 May 2011 - 8:51 pm | प्रदीप
कृपया जरा मराठीतून लिहा हो! 'तर्क देणे' म्हणजे नक्की काय म्हणायचंय आपल्याला ? ('मराठीतून लिहा' हे उद्वेगाने लिहीले आहे. पण खरोखरीच आपल्याला काय अभिप्रेत आहे , ते जाणण्यासाठी हा प्रश्न विचारतोय).
11 May 2011 - 5:40 pm | चिगो
कृपया जरा मराठीतून लिहा हो! 'तर्क देणे' म्हणजे नक्की काय म्हणायचंय आपल्याला ? <<
बरं ब्वॉ... मला हे म्हणायचं आहे की काही अतार्किक गोष्टीही हुशार माणसे त्यांना हव्या त्या पद्धतीने मांडू शकतात, मात्र ह्या मुर्खाजवळ ती पात्रता नाही..
('मराठीतून लिहा' हे उद्वेगाने लिहीले आहे. पण खरोखरीच आपल्याला काय अभिप्रेत आहे , ते जाणण्यासाठी हा प्रश्न विचारतोय).<<
ह्या उत्तराने तुमचा उद्वेग कमी झाला असावा, ही अपेक्षा.. नसल्यास मायमराठीचे धडे घ्यायला आम्ही कधीही तयार आहोत..
11 May 2011 - 8:45 pm | प्रदीप
हे अगदी व्यवस्थित, छान मांडले आहे.
नुसते कुणाचे मराठी लिहीतांना चुकले ह्यामुळे माझा उद्वेग नाही. हिंदाळलेले मराठी आजकाल इतके बोलले व लिहीलेही जात आहे, की ते अत्यंत उद्वेगजनक वाटावे. हे 'तर्क देणे' म्हणजे 'सतर्क हो गया/ तर्क दिया' असल्या शासकीय हिंदीतून आले की काय अशी भीति वाटली होती. बाकी, मायमराठीचे धडे देणारा मी कोण? प्रत्येक मराठी व्यक्तिने मराठी, शक्य तितक्या स्वच्छ मराठीतून (म्हणजे 'न हिंदाळलेल्या मराठीतून') लिहावी, इतकीच माफक अपेक्षा मी तरी करतो.
7 May 2011 - 2:28 pm | किसन शिंदे
स्टार माझाच्या न्यूजवर पाहिलं ते माकड(राज पुरोहित) भाषण करतं होतं आणि त्याच्या ह्या असल्या फडतूस भाषणबाजीला तिथलं ते महा बावळट पब्लिक टाळ्या वाजवत होत..... खूप हसू येत होत त्या माकडावर आणि त्या टाळ्या वाजवणारयांवर....
अवांतर : मनसेचे आमदार श्री. बाळा नांदगावकर बरोबरच बोलले.....समोर असता तर त्याच कानफाटचं फोडलं असतं.
अति अवांतर : कोण ओळखत पण नव्हतं त्या झंडुला आता फुकटची पब्लीसिटी भेटली.
7 May 2011 - 2:54 pm | प्यारे१
मिसळपाव वर वावरणार्या एका पंडिताची आठवण राज पुरोहित ने करुन दिली.
का राज पुरोहित आणि 'हे' एकच?
7 May 2011 - 3:24 pm | प.पु.
बहुतेक 'त्या' भैयाने राज पुरोहितांना भाषणाआधी "तांब्यातले अमृत" पाजले असावे,
म्हणून त्याच्याविषयी एवढे कळकळीने बोलताहेत............
आणि अंकिता राणेने सगळ्या मीडियासमोर त्या राज पुरोहितला चांगला चप्पलने धुतला पाहिजे मग कळेल त्याला "भारतीय नारी".
7 May 2011 - 7:14 pm | निखिलेश
असे कसे एवढे परप्रान्तीय महाराश्ट्रात घुसले आणि गब्बर आणि माजोर झालेत.
आपलीच व्रूत्ती तपासून पहायची वेळ आली आहे.
एकमेकान्कडे बोट दाखऊन काही ऊपयोग नाही.
8 May 2011 - 3:58 am | किशोरअहिरे
त्या भैया ची शिवांबुपाणी पुरी ह्याला खायला द्यावी... :)
ते सुध्दा स्टार माझा ने प्रसिध्द करावे .. ते सुध्दा लाईव्ह .. कसली मजा येईल नै??
9 May 2011 - 6:45 am | विजुभाऊ
मला वाटत राज पुरोहित अस बोलले म्हणून सपूर्ण बीजेपीला यात गोवण्याच काही कारण दिसत नाही.
वाटलच होते हे कोणीतरी असे बोलणार म्हणून.
पण मग मै राज पुरोहित, मै भारतीय जनता पार्टिका अध्यक्ष (छाती ठोकुन) मुंबे का प्रदेश अध्यक्ष यहा ये ऐलान करता हु की.. या वाक्याचे काय. की मग असे काही आहे की एक वाक्य त्याने अध्यक्ष म्हणून बोलले आणि दुसरे व्यक्ती म्हणून.
दुसरे हे की भाजपच्या एकाही नेत्याने त्या बेताल इसमाच्या वक्तव्यावर काहीही कॉमेन्ट केलेली नाहिय्ये.
दुसरे असे की हा नेहमीसारखी पळवात आहे. दुसर्या पक्षाच्या एखाद्या कोणी असे काही वक्य्तव्य केले असते तर यानी अगदी आकांडताम्डव केले असते.
चारचौघात जाहीर भाषणात शिवीगाळ करणे हे भाजपच्या संस्कृतीत नाही हे खरे. ती शिस्त खरेतर संघाकडून आलेली.
असो. भाजप ला काहिही करून प्रसिद्धी हवी आहे.
10 May 2011 - 11:05 pm | आनंदयात्री
>>चारचौघात जाहीर भाषणात शिवीगाळ करणे हे भाजपच्या संस्कृतीत नाही हे खरे. ती शिस्त खरेतर संघाकडून आलेली.
विजुभाउंना बहुतेक लहानपणी शाखेत कोणतरी जाम धुतला असावा .. कोणताही विषय ते संघाकडे आरामशीर वळवु शकतात.
11 May 2011 - 12:54 pm | मृगनयनी
जाताजाता: सत्तेच हाडूक मिळविण्यासाठी सगळेच लाचार असतात याची पुन्हा एकदा जाणीव झाली.
सहमत!!! त्रिवार सहमत!!! काँग्रेस आणि राष्ट्रवादी वाले हाडूक्'ही चघळायला देत नसल्याने 'रिपब्लिकन्'च्या आठवल्यांनी "शिवसेने"ने फेकलेल्या तुकड्यावर अधाश्यासारखी झडप घातली! ;) आणि सत्तेच हाडूक मिळविण्यासाठी सगळेच लाचार असतात याची पुन्हा एकदा जाणीव झाली.
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
12 May 2011 - 8:54 pm | अजातशत्रु
@'रिपब्लिकन्'च्या आठवल्यांनी "शिवसेने"ने फेकलेल्या तुकड्यावर अधाश्यासारखी झडप घातली!
त्यात नवल ते काय..
तिथेहि फेकलेल्या तुकड्या वर जगायचे इथेहि तेच करायचे आहे फक्त धनी बदलला. ;)
आठवले म्हणजे सारा दलित समाज असा जर शिवसेनेने समज करुन घेतला असेल तर तो चुकीचा आहे,
अशा स्वार्थी माणसा कडून दलित समाज केव्हाच लांब गेला आहे,
गेली ४० वर्षे राजकारण करनार्या शिवसेनेने मनसेला शह देण्यासाठी निवडलेला हा पर्याय म्हणजे मुर्खपणाच आहे ज्याची स्वतःच्या समाजात किंमत नाही असा माणूस निवडून तरी कसा येणार?
हे जाणल्या मूळे पवारांनीहि त्यांना शिर्डी मधे उभे करुन घरी बसवले =))
अवांतर: भेटि दरम्यान ठाकरे आजोबांनी पाकिस्तानात जाउन स्वतः दाउदला पकडून आणू असा ज्योक केला.ह.ह.पु.वा.झाली,
आणी दाउदचीच काळजी वाटली=))=))=))
(दाउदचा शत्रु)