हे कधी बदलणार?

उदय के'सागर's picture
उदय के'सागर in जे न देखे रवी...
29 Apr 2011 - 11:00 am

नमस्कार, मी पहिल्यान्दाच मिपा वर काहि प्रकाशीत करतोय, इथे प्रकाशीत होणारे साहित्य दर्जेदार आहे, त्यामानाने माझी ही कविता कादाचीत खुपच साधारण वाटेल किन्वा उगीच यमक जुळवण्याचा प्रयत्न वाटेल, पण I think this how I will learn from your comments.

हे कधी बदलणार?

एकविसाव्या शतकातही मुलींचं अस्तित्वं अत्याचाराने तडपलेलं असतं
कारण आजही नवं-तरुणांच मनं हुंडयाच्या वासनेत अडकलेलं असतं

देशाच्या संस्कृतीचा अभिमान मिरवताना वृद्धाश्रम मात्रं भरलेलं दिसतं
ही का त्यांचीच चुक, कमावलेलं सारचं त्यांनी मुलांमधेच पेरलेलं असतं ?

कुठेतरी पटतय नव्या पिढीला, जगण्यासाठी लागतो तो फक्तं श्वासचं नसतो
उपयोग काय? नविन नि वेगळ कही करण्यावर पालकांचा विश्वासच नसतो

सत्य आणि न्याय नेहमीच पैसा नि दादागिरिच्या आड़ लपलेलं असतं
धाव घेउन घेणार कुठे? जेंव्हा हे सरकारच भ्रष्टाचाराने करपलेलं असतं

आमच्या रोजच्याच समस्येंच मुळ नेहमी कुठलतरी पक्षच असतं
बस्स! एवढच बोलून मग मुळ समस्येकडे कोणाचं लक्षच नसतं

"हे कधी बदलणार?” सारखे प्रश्न नुसत्या संवादापलीकडे कधी वळतच नाही
बदल हवेत? मग आधी स्वतः बदल, ही साधी गोष्टं प्रश्न कर्त्याला कळतच नाही

करुणसमाज

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

29 Apr 2011 - 11:12 am | मिसळलेला काव्यप्रेमी

भरपूर वाचा! अजुन लिहा!!
पु.ले.शु.

चिगो's picture

29 Apr 2011 - 11:44 am | चिगो

चांगली आहे कविता...
पु.ले.शु.

गणेशा's picture

29 Apr 2011 - 2:52 pm | गणेशा

छान संदेश देत आहे कविता ...

लिहित रहा ... वाचत आहे...

पियुशा's picture

29 Apr 2011 - 3:31 pm | पियुशा

छान लिहिल हो तुम्हि :)

विदेश's picture

30 Apr 2011 - 11:46 am | विदेश

प्रयत्न स्तुत्य आहे. कवितेचा आशय चांगला आहे. लिहीत रहा.

अविनाशकुलकर्णी's picture

30 Apr 2011 - 11:50 am | अविनाशकुलकर्णी

बदलेल ...अण्णांच्या मागे उभे रहा ....

परिकथेतील राजकुमार's picture

30 Apr 2011 - 12:02 pm | परिकथेतील राजकुमार

बदलेल ...अण्णांच्या मागे उभे रहा ....

तुम्हाला पाठीशी म्हणायचे आहे का?

'मागे उभे रहा' जरा विचित्र वाटते ;)

पिवळा डांबिस's picture

1 May 2011 - 12:02 am | पिवळा डांबिस

बदल हवेत? मग आधी स्वतः बदल, ही साधी गोष्टं प्रश्न कर्त्याला कळतच नाही
क्या बात है!!
जियो!!!
पुढील लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा!!!

उदय के'सागर's picture

2 May 2011 - 4:27 pm | उदय के'सागर

मी खरच मनापासुन सर्वान्चे अभार मानतो :) मला खरच एकाही प्रतिक्रियेची अपेक्षा नव्हती, पण ८ प्रतिक्रिया पाहुन मला खुप सही वट्तय :)

Thanks you so much you all for such a motivation and inspiration. I will keep writing now and that is only because of you :)

आत्मशून्य's picture

3 May 2011 - 5:47 am | आत्मशून्य

कवीतेत काय तरी कमी हाय......

ajay wankhede's picture

4 May 2011 - 8:59 pm | ajay wankhede

उत्तम सुरवात ..
शब्द च क्रान्ति करतात. अजुन खुप लिहा.
मि पण नवाच आहे.