आयुष्याच्या गणितात मी नेहमीच चुकलो...
बघणं... तुला वजा केल्यावर स्वतासाठी सुद्धा नाही उरलो...
हे गणित मांडताना एक महत्वाची गोष्टच विसरलो...
साधे गोलाबेर्जेचे नियम लाऊन पुरता फसलो...
शेवटी “तू” उत्तर याव म्हणून प्रत्येक त्रैराशिक मांडून पाहिलं...
आणि उत्तर शोधता शोधता सुरवातच विसरलो...
आता हे कळून चुकलय की आयुष्य गणिताएवढ सोप्प नसत...
म्हणून शेवटी कितीही प्रयत्न करून हव ते उत्तर मिळतच अस नसत...
```पारिजात
प्रतिक्रिया
29 Apr 2011 - 10:23 am | निनाद
गणित हा तसा नावडताच विषय होता. त्यामुळे तुमच्या प्रेमाचे करुण गणित फार काही झेपले नाही.
29 Apr 2011 - 10:28 am | रामदास
गणित हा सरावाचा विषय आहे. गणितं मांडत रहा .सरासरीत बाजी मारून जाल.
29 Apr 2011 - 11:27 am | नरेशकुमार
जिवनाचे गनित पाहन्यापेक्शा त्याचा भुगोल पहावा, इतिहास neglect करावा. लगेच understand होतो आनि easy जातो. pass व्हाल.
29 Apr 2011 - 12:06 pm | झंम्प्या
प्रत्तेक प्रश्नाचा उत्तर हे कि सोप्प असत हे उत्तर मिळाल्यावरच का समजत... मग ते भूगोलाच, गणितच, असो कि इतिहासच