काही गाणी अगदी कायम मनात रुंजी घालत रहातात, ती आपल्याला का आवडतात हे सहजासहजी सांगता येत नाही, पण कधीतरी अचानक काही भाव, काही शब्द मदतीला धावून येतात आणि त्या गाण्याचं आणि आपलं नातं उलगडून देतात. अशा या आगळ्यावेगळ्या कल्पनेला इथूनवेचलं आणि पहिला प्रयत्न केला.
जखमा फुलतील नव्याने,
थरथरेल मन तृणपाते,
भगव्याशा आभाळाचे
क्षितिजाशी धुरकट नाते
त्या कातरवेळी माझ्या
वेदनेस कंठ फुटावा
हुरहुरत्या सांजेला मी
माळून पूरिया द्यावा!
झाडांच्या पार तळाशी
घनदाट स्मृतींचा मेळा
काहूर जागवित याव्या
अन् सांजफुलांच्या वेळा
संध्येची गहिरी दु:खे
गात्रांत भरून उरावी,
मावळताना किरणांना
कविता आतून स्फुरावी
धूसरशा मेघांमधल्या
शिल्पातुन सूर झरावे,
मी ज्योतीसह थरथरता
हे एकच गीत स्मरावे,
"भय इथले संपत नाही,
मज तुझी आठवण येते,
मज तुझी आठवण येते!"
प्रतिक्रिया
26 Apr 2011 - 2:21 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
क्या बात!! क्या बात!
छानच प्रयत्न!!
सुंदर!!
26 Apr 2011 - 2:45 pm | नगरीनिरंजन
सुंदर रचना!
26 Apr 2011 - 4:07 pm | गणेशा
अप्रतिम ....
झाडांच्या पार तळाशी
घनदाट स्मृतींचा मेळा
काहूर जागवित याव्या
अन् सांजफुलांच्या वेळा
संध्येची गहिरी दु:खे
गात्रांत भरून उरावी,
मावळताना किरणांना
कविता आतून स्फुरावी
विशेष आवडले ....
26 Apr 2011 - 7:22 pm | प्राजु
खल्लास!! जियो क्रांती!!!
अफाट आहे कविता!
27 Apr 2011 - 10:40 am | स्पंदना
व्वाह!
28 Apr 2011 - 8:17 pm | श्रावण मोडक
दाद देण्याजोगाच प्रयत्न!
29 Apr 2011 - 3:37 pm | यशोधरा
वा क्रांती! सुरेख! खूप सुरेख लिहितेस तू.
1 May 2011 - 1:01 pm | मराठमोळा
क्रांतीतै,
खुप सुंदर कविता!!! आवडली.. :)
स्वगत : ( मिपावर आजकाल लोकं काव्य विभाग उघडुन बघत नाहीत याला जबाबदार कोण? )