झाड आठवणींचे

निनाव's picture
निनाव in जे न देखे रवी...
26 Apr 2011 - 12:19 am

तुझ्या आठवणींचे झाड आज,
अजुन एका वर्षांनी मोठे झाले!
- अभिनंदन तुला.
आपल्याला भेटून आज
पुर्ण एक दशक झाले!

दहा वर्षात ह्यां ॠतु
सगळेच गेले गं येऊन
अन पायाखालची मातीही गेले भिजवून
जाणवले का तुला मात्र मनी?
वियोगाचे मुळ कसे
अधिकच घट्ट गेले होऊन!!

असे कोठे ठरविले होते आपण?
- मग असे का झाले?
- सांगशील का मला?
आपण लावलेले रोप्ट्याचे नकळत झाड कधी झाले!

रोज आभाळाकडे बघत वाढतांना
ह्या झाडाच्या फांद्या
पसरल्या आहेत आता अधिकच रुंद
हल्ली काळजी घेतो मी
खाऊ नये कुणी कधी चुकून
मोहक दिसणारी
ह्या झाडाची विषारी फळे

हे झाड जरी असले हिरवे
- कापता येईल का ह्यास?
- तुझ्या येण्यानं मात्र.
अन्यथा नशीबी सावलीत ह्याच्या जगणे झाले!!

कविता

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

26 Apr 2011 - 1:43 am | पाषाणभेद

हं... कविच्या अन त्याच्या मैत्रीणीच्या काही गोष्टी त्या झाडाशी निगडीत आहेत पण आठवणींच्या झाडाची फळे (इतरांस) विषारी कशी?

पाभे, प्रश्न उत्तम.

प्रयत्न करतो:

आठवणींच्या झाडाची फळे हे केवळ ह्रदय विदारक आठवणींच असु शकतात.. ते किस्से, घटना ऐकतांना छान (फिल्मी) वाटत असल्या तरी वियोगी नायकाच्या त्या कटु आठवणीं ना उजाळा देऊन इतरांनी ही दुखी होऊ नये, हा तसे लिहिण्या मागचा हेतु.

अवांतरः नायक आणिक त्याची प्रेयसी ह्यांच्या वियोगा बद्दल लिहिलेली कविता आहे. :) कविचा ह्या प्रसंगात काडी मात्र चा संबध नाही :)

आहो पाभे, उगाच खेचु नका आता गरीबाची ;)

निनाव, अरे मला नायकच अभिप्रेत होते. न समजते तर प्रत्येक कवीतेगणीक आपल्याला भुमीका बदलाव्या लागतील. (अर्थात मला बोर्डावर साडी नेसून लावणीच्या तालावर नाचावे लागेल!) असो.

वियोगाचे झाड चांगलेच फोफावले हे सत्य आहे. पण ह्या झाडाला खतपाणी फक्त नायक नायिकेनेच दिले. अन त्यांच्याच अंगणात हे झाड वाढलेले आहे.
अशा दोघांच्या मधल्या झाडापर्यंत दुसर्‍यांना पोहोचणे दुरापास्त असावे. (कारण तो दोघांचा खाजगी मामला असण्याची शक्यता आहे. अर्थात 'दिवस गेले' नसतील तर.)
त्यामुळे 'विषारी फळे खावू न देण्याची' तसदी नायक का घेतो आहे? की तो कुणाला असल्या 'झाडे न लागवडीबद्दल' सल्ला देतो आहे?
अर्थात ते कविचे (आता 'नायक' नाही हं, कवीच म्हणतो) विचार असल्याने स्पष्टिकरण न दिले तरी चालेल. (कारण काही गोष्टी वाचकांवरच सोडायच्या असतात.)

निनाव's picture

26 Apr 2011 - 2:31 am | निनाव

पा भे :

१ नंबर !

:)

भन्नाट. पटले मला.

आठवणींचे झाड आवडले ...
कडु आठवणींची फळे .. आणि उगाच जगासाठी हिरवेपण ल्यालेले झाड छान सांगितले आहे.

खालील ओळी मात्र निट कळाल्या नाही

तुझ्या येण्यानं मात्र.
अन्यथा नशीबी सावलीत ह्याच्या जगणे झाले!!

अवांतर :

न समजते तर प्रत्येक कवीतेगणीक आपल्याला भुमीका बदलाव्या लागतील. (अर्थात मला बोर्डावर साडी नेसून लावणीच्या तालावर नाचावे लागेल!) असो.

वाचुन मज्जा आली...