कठीण आहे कधी कधी लिहिणे शब्दांना
तुझ्या हृदयाची भाषा ओठांस कळतांना
आठवत नाहीत शब्द तु समोर असतांना
नेहमीच पडतात अपुरे मग तुला लिहितांना
लाजुन जे झुकतात नजरांचे प्रणय होतांना
शब्दात करू कसे परिमित अश्या तुझ्या डोळ्यांना
हरवतो मी तुझ्या ह्रदयाचे स्पंदन तीव्र ऐकतांना
सांग आता लावू कसे शब्द ह्या चालीस बसतांना
बांधु कसे शंब्दात अल्हड केश तुझे ते उडतांना
जीवच जाईल माझा तसा प्रयत्न देखील करतांना
कठीण आहे कधी कधी लिहिणे शब्दांना
तुझ्या हृदयाची भाषा ओठांस कळतांना
प्रतिक्रिया
18 Apr 2011 - 2:33 am | आत्मशून्य
हे मान्य.
18 Apr 2011 - 9:40 am | प्रकाश१११
निनाव -
कठीण आहे कधी कधी लिहिणे शब्दांना
तुझ्या हृदयाची भाषा ओठांस कळतांना
छानच लिहिले आहे.एकदम मस्त !!
18 Apr 2011 - 10:19 pm | गणेशा
असेच म्हणतो
18 Apr 2011 - 10:56 am | मिसळलेला काव्यप्रेमी
छान लिहीले आहे!!