<पेयनिष्ठ पेताडाचा कर्मदरिद्री बाटलीभंग>

Primary tabs

लंबूटांग's picture
लंबूटांग in जे न देखे रवी...
7 Apr 2011 - 8:03 pm

प्रेरणा

बसे उकिडवा बाटली उघडून
चखणा खातो कर्रम कुर्रम
प्रचंडकुंथी वायूप्रदूषण
धडाम धुडूम्म धडाम धुडूम्म

शेव न चकली उडतो फन्ना
पेला भरीतो आणिक एक
आता जगाची सोडून चिंता
फाड फाडतो इंग्लिश भेदक

ग्लेन्मोरेन्जी यथेच्च ढोसून
निरर्थ काही बर बर बरळीत
शिग्रेट बीडी ओढून ओढून
वूक्खु विक्खी खोकत खोकत

खरडत खुरडत सावरि धोत्रा
त्रेधा तिरपिट विचित्र मुद्रा
बाथरूमचा कडाकोयंडा
जाईजाईस्तो घडे अभद्रा

आकाशातील सप्तढगावर
ह्याला फाट्यावर त्याला फाट्यावर
मग खंबा तो संपेस्तोवर
टांगा पलटी घोडे फरार


Disclaimer: मूळ कवितेप्रमाणे एकमेकांशी संबंध नसलेली कडवी लिहीण्याइतकी माझी दांडगी प्रतिभा नाही.

भयानकहास्यबिभत्सअद्भुतरसरौद्ररसकविता

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

7 Apr 2011 - 8:08 pm | प्रकाश घाटपांडे

यकदा टाकली आख्ख जग.. मधे जातं.
असो
(आता उरलो शास्त्रापुरता)

गणपा's picture

7 Apr 2011 - 8:10 pm | गणपा

हा हा हा मस्त रे लंबु.

नंदू's picture

7 Apr 2011 - 8:13 pm | नंदू

तैंच्या कवितेच्या विडंबनाचं शिवधनुष्य तुम्ही चांगलंच पेललंय. मिपा ला एक नविन विडंबनकार मिळाला तर!
जियो....

शेवटच्या कडव्यापर्यंत दारूचा असर व्यवस्थित झालेला दिसत आहे!

मान गये ग्रु! बौ वधिया! मूळ कवितेइतकीच जब्बर आहे!

सुहास..'s picture

7 Apr 2011 - 8:18 pm | सुहास..

लंबिदिनी ...आपल हे...लंबुटांग.... ;)

मस्त रे !!

शेव न चकली उडतो फन्ना
पेला भरीतो आणिक एक
आता जगाची सोडून चिंता
फाड फाडतो इंग्लिश भेदक >>>

क्षमस्व , या कडव्यात आपल्या एका मित्रा ची आठवण कशी झाली नाही ??

घोडे फरार , हले डुले आणि ...बरेच काही असलेला

पैसा's picture

7 Apr 2011 - 8:28 pm | पैसा

"लंबूटांग(णी) भयंकर", तुमची नवी कविता मूळ कवितेप्रमाणेच अद्भुत आहे! आता एका कडव्याचा दुसर्‍याशी संबंध नसलेली कविता कशी 'पाडावी' याचं पेश्शल ट्रेनिंग घ्या. म्हणजे आणखी काव्यालंकार तयार करता येतील!

रेवती's picture

7 Apr 2011 - 8:32 pm | रेवती

आजकाल येगळाच मूड दिसतोय!
विडंबन जमले आहे.
लवकरच विडंबनाचार्य पदवीप्रदान समारंभ करण्यात येइल.
बाथरूमचा कडाकोयंडा
या जागी बाथरूमचा तो कडीकोयंडा असे असले तर?

धमाल मुलगा's picture

7 Apr 2011 - 8:43 pm | धमाल मुलगा

लंब्या, लेका बिघडलासच बघ आता.
आता तुला ह्यावर काही इलाजच नाही. :D

अवांतरः शरदिनीच्या कविता नीट पहा, पंचाक्षरी शब्दांचे नादमाधुर्य अभ्यासावेस असा माझा आपुलकीचा सल्ला. ;)

लंबूटांग's picture

7 Apr 2011 - 10:32 pm | लंबूटांग

शक्य तितका प्रयत्न केला पण इतके पंचाक्षरी शब्दच सापडेनात :P.

कडाडकडकड शब्द धरपकड!!
चालुद्या! :)

मुलूखावेगळी's picture

7 Apr 2011 - 8:45 pm | मुलूखावेगळी

लय भारी
रे

छ्छुंदरसिंग's picture

7 Apr 2011 - 9:01 pm | छ्छुंदरसिंग

ग्लेन्मोरेन्जी म्हन्जे काय रे,भाऊ?
-छ्छु

ग्लेन्मोरेन्जी हे मद्यान्नीला घ्यावयाचे एक तीर्थ आहे. एकाच प्रकारच्या धान्यापासून बनवलेले आणि प्रक्रिया करुन शुद्ध केलेले हे तीर्थ घेतल्यावर बर्‍याचजणांची मद्यानंदी टाळी (कॉरा: परा) लागते हा चक्षुचक्षुमेवसत्य: अनुभव आहे.
काही लोक यासोबत अनेक प्रकारचा प्रसादही सेवन करतात हे विशेष!!

अधिक माहीतीसाठी गणपा-नाटक्या या जगप्रसिद्ध जोडगोळीला भेटावे. ते सर्वांना शहाणे करुन सोडण्यात पटाईत आहेत.

--असुर

प्रीत-मोहर's picture

7 Apr 2011 - 9:06 pm | प्रीत-मोहर

लंब्या सही रे !!!!

मस्त रे लंब्या, मस्त चालु दे.

भडकमकर मास्तर's picture

8 Apr 2011 - 1:23 am | भडकमकर मास्तर

जम्तंय जम्तंय...
अर्थपूर्ण वाटल्याने थोडी नशा कमी झाली इतकेच...

निशदे's picture

8 Apr 2011 - 3:15 am | निशदे

>
ही सुद्धा उत्तम जमली आहे. असाच प्रयत्न करत राहिलात तर मूळ कवितेएव्हढे उत्तम सुद्ध फाड्फाड लिहायला लागाल......
"खरडत खुरडत सावरि धोत्रा
त्रेधा तिरपिट विचित्र मुद्रा
बाथरूमचा कडाकोयंडा
जाईजाईस्तो घडे अभद्रा"
अनेक आठवणी जाग्या झाल्या.....असो........;)

टुकुल's picture

8 Apr 2011 - 7:30 am | टुकुल

मस्त रे...

--टुकुल

नगरीनिरंजन's picture

8 Apr 2011 - 8:44 am | नगरीनिरंजन

छ्या हे फारच अर्थसंगत आहे. अर्थसंगतीतून विडंबन असेल तर गोष्ट वेगळी. त्यामुळे चान चान असे म्हणतो.

प्यारे१'s picture

8 Apr 2011 - 9:29 am | प्यारे१

पहिल्या धारेचं विडंबन.

अजून अनाकलनियता वाढविण्यासाठी मास्तरांचा (भडकमकर) क्लास लावा ही सूचना.

ह्याला म्हणतात 'हलवायाच्या घरावर तुळशीपत्र.' ( टार्‍याएवढी आमची नाहीये...प्रतिभा हो)

नरेशकुमार's picture

8 Apr 2011 - 9:39 am | नरेशकुमार

खत्रुड !

टारझन's picture

8 Apr 2011 - 11:17 am | टारझन

शेवटी ......... फॉककन् टाकुन मोकळा झालास तर :)