जा हसत दूर जा
आसवांची अखंड धार नको
आशेचा एक आणखीन नविन किरण नको
जा हसत दूर जा
त्रासलेला तुझा होकार नको
घाव घातलेल्या ओंडक्यासम ह्रदयावर
प्रेमाचा पुन्हा नवा अंकुर नको
जा हसत दूर जा
सोडणार्या साथीचा आधार नको
परत परतण्याचा विचार नको
ह्रदयावर नवीन वार नको
जा हसत दूर जा
मनाशी आता कुठला ही धागा नको
तुटणार्या या नात्याला
आशेचा आणखीन एक बंध नको
जा हसत दूर जा
आसवांची अखंड धार नको
आशेचा एक आणखीन नविन किरण नको
---- शब्दमेघ
प्रतिक्रिया
5 Apr 2011 - 3:59 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
लय भारी ओ पावनं!!
जा हसत दूर जा
सोडणार्या साथीचा आधार नको
परत परतण्याचा विचार नको
ह्रदयावर नवीन वार नको
हे तर खासचं!!
5 Apr 2011 - 4:15 pm | प्रकाश१११
गणेशा - खूप भिडली खोलवर ..!!
काय बोलू ..?लिहू ..?
5 Apr 2011 - 4:50 pm | पूनम १
सहीच !
6 Apr 2011 - 11:40 am | हरिप्रिया_
अप्रतिम...
6 Apr 2011 - 6:20 pm | चित्रा
कविता आवडली.
6 Apr 2011 - 8:42 pm | प्राजु
आवडली.
7 Apr 2011 - 6:42 pm | अज्जुदादा
एक नंबर रे...खुप आवडली....