कविता ...!!

प्रकाश१११'s picture
प्रकाश१११ in जे न देखे रवी...
21 Mar 2011 - 11:02 am

चला मस्त तारुण्य फुललेय
जरा मजेत जगूया
कसे जगायचे त्याचे स्वातत्र्य घेऊया
कशे प्रेम करायचे त्याचे गणित आपणच ठरवूया
कशाला करायची कुणाची कॉपी
आपण आपल्या पद्धतीने जगूया
चला जरा मस्त सूर लावूया

शोभादर्शक नि त्यात रंगीत काच तुकडे
कसे छान शोभादर्शक बनते
तसे काही तरी करुया
प्रेमाचे क्षण आपल्याला हवे तसे
आपल्या मनात मांडूया
जमेल [?]
खरेच जमेल ..!
प्रयत्न करुया ..!!
कशासाठी कुणाला लाजून
प्रेमाचे सूर लपवायचे
कुणावर असेल प्रेम तर कशासाठी दडवायचे ?

ती आली त्या दिवशी
कसे ढग भरून आले होते
निळ्या निळ्या साडीमध्ये
तिचे मन फुलत होते
काळेभोर डोळे नि मस्त चेहरा
तारुण्याचे एक निराळेच सौदर्य असते
कसे ते बांधून ठेवते
आई शप्पत शब्दांचे ताटवे मनात मस्त झुलत होते

तिला हलकेच तो म्हणाला
शब्दात तुला आता बाधून ठेवतो
शब्दांच्या पिंजर्यात कोंडून ठेवतो
हसून म्हणाली ती:-
कसा बांधणार शब्दात मलां ..?
शब्दात बांधताना स्वताच हरवून जाशील
शब्द शब्द करीत मी कधी निघून जाईल
मग शोधत बसशील ….??

खरेच होते का तिचे बोलणे ..?
खरेच होते का तिचे बहाणे ..??
आता तो निराळेच शब्द शोधून ठेवतोय
तिला बांधायचे कसे ....?
ह्याचा विचार करून ठेवतोय ....!!

शब्दात बांधताना ती खरेच निघून गेली
कधी .? का ..? कोठे ..?
कशी हरवून गेली ..
शोधतोय तो तिला
शब्दात तर नाही सापडली
"अर्थात "मिळतेय का
नाहीतर शब्दकोशात ...?
शब्दकोशात ....!
तरी शोधून बघुया ...!!

पण ती नाही सापडणार त्याला हव्या त्या ठिकाणी
ती झुलतेय फुलपाखरासारखी
फुलांच्या भोवती
ती झुळझुळ्तेय झाडापानातून
ती तरंगतेय स्वप्नामधून
नि तो शोधतोय तिला शब्दकोशात ...
कशी सापडणार ती ...??

शांतरसकविता

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

21 Mar 2011 - 11:51 am | मिसळलेला काव्यप्रेमी

मुक्तपणे आणि मोकळेपणाने मांडल्यामुळे मस्तच झालिये कविता... खुप आवडली.

पियुशा's picture

21 Mar 2011 - 12:51 pm | पियुशा

+१
:) :)

कच्ची कैरी's picture

21 Mar 2011 - 6:15 pm | कच्ची कैरी

छान !:)

पिनुपवार's picture

22 Mar 2011 - 12:07 am | पिनुपवार

छान आहे.

ती आली त्या दिवशी
कसे ढग भरून आले होते
निळ्या निळ्या साडीमध्ये
तिचे मन फुलत होते
काळेभोर डोळे नि मस्त चेहरा
तारुण्याचे एक निराळेच सौदर्य असते
कसे ते बांधून ठेवते
आई शप्पत शब्दांचे ताटवे मनात मस्त झुलत होते

तिला हलकेच तो म्हणाला
शब्दात तुला आता बाधून ठेवतो
शब्दांच्या पिंजर्यात कोंडून ठेवतो
हसून म्हणाली ती:-
कसा बांधणार शब्दात मलां ..?
शब्दात बांधताना स्वताच हरवून जाशील
शब्द शब्द करीत मी कधी निघून जाईल
मग शोधत बसशील ….??

खुपच आवडले हे मला ..
अप्रतिम