वासांसि जीर्णानि यथा विहाय

अवलिया's picture
अवलिया in जनातलं, मनातलं
21 Mar 2011 - 10:47 am

वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि |
तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही ॥२- २२

ज्याप्रमाणे मनुष्य जुनी झालेली वस्त्रे टाकुन देऊन नवीन वस्त्रे धारण करतो त्याचप्रमाणे शरीराचा त्याग करुन आत्मा नवीन देह धारण करतो. सांख्यांनी मांडलेल्या तत्वज्ञानानुसार त्या तत्वज्ञानाचे स्वरुप विशद करुन सांगतांना भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जे संवादातुन सांगितले त्यातले एक महत्वाचे वाक्य असे या श्लोकाला म्हणता येईल.

जुन्या वस्त्रांच्या त्यागानंतर नवीन वस्त्रं धारण करणे हा दाखला आपल्या रोजच्या आयुष्यात आपण नेहमी पहात असतो असे म्हटले तर वावगे होणार नाही. अनेक गोष्टी असतात ज्या आपण आता जून्या झाल्या असे मानून सोडून देतो. कधी कधी तीच ती वस्तु वापरुन आपल्याला तिचा कंटाळा येतो. तेच ते काम करण्याचा आपल्याला कंटाळा येतो. मग त्यात बदल करावा वाटतो. कधी कामात बदल केला जातो तर कधी कामापासुन दूर जात मनाला पुन्हा ताजे केले जाते. कधी कधी मात्र नोकरी वा व्यवसायच बदलावा वाटतो. अनेक जण तसे केल्यावर बरे वाटले असा अनुभव घेत असल्याचे आपण पहातोच. कधी कधी रहात्या घराचा सुद्धा कंटाळा येतो अशा वेळेस नवे घर पाहिले जाते. थोडक्यात काय मनुष्य हा सतत बदल करत असतो कधी जाणतेपणाने कधी अजाणतेपणाने.

बदल होत रहावा.
बदल होत नसेल तर जीवन थांबते.
बदल अनेक मार्गांनी घडत असतो.
घडत नसेल तर घडवावा लागतो.
मनुष्याचे प्रयत्न, स्वतः मनुष्य, स्थान आणि उपलब्ध साधने या सर्वांचा परिपाक होऊन मनुष्याची कृती घडत असली तरी दैव नामक अदृश्य फल सोबत असतेच. बदलाचे परिणाम ठरवण्यात हे पाचही अवयव आपापली भुमिका बजावत असतात.

असाच एक बदल करण्याचे मनात योजून हा लेख लिहिला आहे. बदल कसा होईल, काय होईल, कधी होईल इत्यादी तपशील भविष्यकालात योग्य वेळ होताच ठरवू असा विचार करून जून्या गोष्टींचा त्याग हे पहिले पाऊल उचलले आहे. पूढे परमेश्वराची जशी मर्जी असेल तसे !!

अवलिया या सदस्य नामाने मी आजवर तुमच्यात होतो. अनेकांनी दिलेल्या सुचना, केलेले मार्गदर्शन यामुळे सुरवातीला मोडक्या तोडक्या एखाद दोन ओळींचे लेख लिहिणारा मी, आज किमान चार पाच ओळी सरळ लिहू शकतो हे तुम्हा सर्वांचे माझ्यावर असलेले ऋण आहे जे कधीही फिटणार नाही. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा मनापासुन आभारी आहे.

अनेकांना जाणते अजाणते लेखनातुन वा खरड्/व्यनीतुन दुखावले आहे/असेल त्यांची मनापासुन माफी मागतो.

केलेले लेखन अनेकांना पटले असेल त्यांचा आभारी आहे. अनेकांना पटले नसेल त्यांचा सुद्धा आभारी आहे. अनेकांना नीरस कंटाळवाणे वाटले असेल त्यांना झालेल्या त्रासाबद्दल दिलगीर आहे.

आमचे हितचिंतक (!) आणि टीकाकार अनेक आहेत. त्यांच्याबद्दल इतकेच म्हणतो -

ये नाम केचिदिह न प्रथयन्त्यवज्ञां
जानन्ति ते किमपि तान् प्रति नैष यत्नः।
उत्पत्स्यते तु मम कोऽपि समानधर्मा
कालो ह्मयं निरवधिः विपुला च पृथ्वी।।

अजुन काय बोलु?

येतो आता !

स्थिरचित्रप्रकटन

प्रतिक्रिया

मन१'s picture

21 Mar 2011 - 10:58 am | मन१

असे अचानक?

आप्लाच
मनोबा.

प्रचेतस's picture

21 Mar 2011 - 11:05 am | प्रचेतस

आधी गुंडोपंत, आता तुम्ही.....
पण नविन अवतार घेउन लवकरच या.

मृत्युन्जय's picture

21 Mar 2011 - 11:06 am | मृत्युन्जय

कुठे चाललात?

सुहास..'s picture

21 Mar 2011 - 11:08 am | सुहास..

नान्या , आता तिकडे येऊन लाथा घालु का ? असे म्हणावेसे वाटले .

आता इथे काही आयडीज ला उत येईल ' बर झाल पिडा गेली ' असे म्हणतील (पिडा असेच वाचावे पिडां असे नाही )

अरुण मनोहर's picture

21 Mar 2011 - 11:21 am | अरुण मनोहर

साथीचा रोग पसरतो आहे का?

स्पंदना's picture

21 Mar 2011 - 11:32 am | स्पंदना

अवलियाजी, पामराला विसरु नका.

खरतर या आयडी इतक तुमच वर्णन आणखी कोणताही शब्द नाही करु शकणार. न जाल तर उत्तम. जगायच असत (आय डी म्हणुन का असेना) ते अश्याच थोडक्या चार चाहत्यांसाठी असे म्हणेन मी. तशी फारशी कुणाच्या अध्यात मध्यात नसते मी, पण मनस्वी माणस मला फार आवडतात. अन अशी मनस्वी कधी मधीच भेटतात! अन अशी मनस्वी माणस सांभाळणही फार अवघड असत.

यशोधरा's picture

21 Mar 2011 - 11:25 am | यशोधरा

शुभेच्छा.

एप्रिल फुल चा प्रकार आहे का हा?

नसल्यास असा एकदम हा निर्णय?

पंगा's picture

21 Mar 2011 - 11:43 am | पंगा

तसा एक एप्रिलला अजूनही भरपूर वेळ आहेसे वाटते.

अर्थात, 'एप्रिल फूल'चा प्रकार एक एप्रिलला करण्यात काय मजा, असे काही असेल, तर गोष्ट वेगळी. (पण तसेच असेल, तर मग 'एप्रिल फूल'चा प्रकार भर नोव्हेंबरात करायला हवा.)

पर्नल नेने मराठे's picture

21 Mar 2011 - 11:25 am | पर्नल नेने मराठे

नाना..तुसी ना जावो :(

नितिन थत्ते's picture

21 Mar 2011 - 11:40 am | नितिन थत्ते

(आयडीचे) स्वर्गात स्वागत व्हावे अशा शुभेच्छा.

सदरचा लेख होळीनिमित्त सेवन केलेल्या पदार्थांच्या अंमलाखाली लिहिला असावा अशी आशा आहे. अवलिया यांनी यूथेनेशिया घेऊ नये अशी विनंती.

नगरीनिरंजन's picture

21 Mar 2011 - 8:16 pm | नगरीनिरंजन

अरेरे! ख्रिस्ती कबर आणि स्वर्ग यांची चित्रे पाहून ड्वाळे पाणावले. नानांच्या आयडीच्या अवतार कार्याची अशी विटंबना?

llपुण्याचे पेशवेll's picture

24 Mar 2011 - 11:10 am | llपुण्याचे पेशवेll

महापुरुषांचा पराभव हा लेख आठवून गेला. :-)

कुंदन's picture

21 Mar 2011 - 11:45 am | कुंदन

आणि आपला नवा व्यवसाय रे? ;-)

साला तुझ्या जीवावर आम्ही उड्या मारतो , अन तु असा चाल्लास होय ?

नानाच्या लेखांचा नियमित वाचक.
अवलिया हा आयडी गेला तरी त्यामागचा माणूस लिहिता राहिला म्हणजे झालं. शेवटी ते महत्वाचं... असं मला वाटतं.

बाकी काय बोलू ?

प्रकाश घाटपांडे's picture

21 Mar 2011 - 11:49 am | प्रकाश घाटपांडे

काय हा चेंगटपणा चाललाय!
अर्थात नानाविधरुपात येण्याचे सुतोवाच करुन ठेवले आहेच

शिल्पा ब's picture

21 Mar 2011 - 12:41 pm | शिल्पा ब

काय करायचं ते करावं, उगाच सगळ्या गोष्टींची जाहीरात कशाला हवी?

विंजिनेर's picture

23 Mar 2011 - 4:27 am | विंजिनेर

कुण्णाला म्हणून काऽही फरक पडत नाही. उगा सहानभूती गोळा करणे सोडून द्या.

अवांतरः ह्या निमित्ताने का होईना चतुरंग टुण्णकन उडी मारून लिहीते झालेल्या बघून डोळे अम्बळ पाणावाले ;)

अती अवांतरः @ नाईल्या -आयडी ब्रम्हचारी नायरे अविवाहीत आहे. अभ्यास कमी पडतोय तुझा ;)

नानासाहेब काही आगळीक झालीय काय पामरांकडून ?

नानासाहेब काही आगळीक झालीय काय पामरांकडून ?

परिकथेतील राजकुमार's picture

21 Mar 2011 - 2:09 pm | परिकथेतील राजकुमार

शेवटी मनाची तयारी झाली तर...

अज्ञातवासास शुभेच्छा. :)

मृगनयनी's picture

21 Mar 2011 - 4:16 pm | मृगनयनी

अवलिया'जी... तुम्ही मिपा सोडून जाताय... ही आमच्यासाठी दु:खाची आणि गम्भीरपणे विचार करण्याची गोष्ट आहे....
तुम्ही का सोडुन चालले आहात... हे आम्हास माहित नाही... पण त्यामागे नक्कीच काहीतरी जेन्युइन कारण असणार - हे नक्की! :|

तुम्ही गेलात.....आम्हाला तुमची खरंच खूप आठवण येइल.... एक भक्कम "मॉरल सपोर्ट" हरवल्याचा फील येइल...

तुम्ही गेलात... तर "रमण 'ला यमन गा... असं कोण म्हणणार ? " ;) जोक्स अपार्ट... पण तुमच्यामुळे आम्हाला
इथले "मुखवट्यामागचे चेहेरे" समजले... नाना... तुमच्यामुळे आम्हाला मिपावरचे "लाल, हिरवे, पिवळे सिग्नल कळायला लागलेत.... :) थॅक्स फॉर दॅट!!!... :)

त्यामुळे तुम्ही नाही गेलात... तर बहुतांश जणांना आनन्दच होईल...

सो.. रिअली नाना... तुस्सी ना जाओ! :)

ज्ञानेश...'s picture

21 Mar 2011 - 4:39 pm | ज्ञानेश...

लौकरच परताल, ही अपेक्षा.

एक खांदा तुटल्या सारखे वाटते आहे . परंतु नानांच्या निर्णयाचा आदर असुन त्यात ढवळाढवळ नाही.

रॉकफोर्ड सिणेमा मधले एक गाणे "प्यार के पल " , नाना ला डेडिकेट केल्या जावेसे वाटते.

अवांतर : नानांनी अलिकडे "पुयुशावतार " धारण केल्या आहे काय ?

पर्नल नेने मराठे's picture

21 Mar 2011 - 5:58 pm | पर्नल नेने मराठे

=)) मला पण हाच दाउट आहे

आनंद's picture

21 Mar 2011 - 5:35 pm | आनंद

नाना चाललेत कुठे?
जुनी वस्त्रे टाकुन , नवीन वस्त्रे परिधान करुन येतीलच की.

धमाल मुलगा's picture

21 Mar 2011 - 5:38 pm | धमाल मुलगा

नाना,
काही शेवटची इच्छा?

-धम्या डोंब.

आनंदयात्री's picture

21 Mar 2011 - 7:36 pm | आनंदयात्री

हेच म्हणतो !!
तुम्ही जातांना एखादा हवाहवासा बळी द्यावा का ?
;)

असाच एक लेख नविन आय्डि घेउन आल्यावर लिहा म्हणजे झालं.

आता काही दिवस नविन आयडिंवर लक्ष ठेवावं लागणार आहे, प्रत्येकाला काही ठेवणितले प्रश्न विचारायचे आणि उत्तर तपासुन पाहायचं म्हणजे कळेल नानाचं नवं रुप कोणतं ते.?

ज्याप्रमाणे मनुष्य जुनी झालेली वस्त्रे टाकुन देऊन नवीन वस्त्रे धारण करतो
या वाक्यातच सगळं आलं नाना!
पण आता तुमची इच्छाच असेल तर जावा.......
बाकी आम्ही तरी तुमच्या शिव्या फाट्यावर मारल्या आहेत.
अज्याबात किम्मत देत नाही असल्या गोष्टींना!
तुमचे माझ्या लेखनाला येणारे प्रतिसाद आता अवलिया या आयडीकडून यायचे नाहीत एवढेच!

पैसा's picture

21 Mar 2011 - 8:14 pm | पैसा

रेवतीने म्हटलं तसं, "ज्याप्रमाणे मनुष्य जुनी झालेली वस्त्रे टाकुन देऊन नवीन वस्त्रे धारण करतो या वाक्यातच सगळं आलं नाना!"

परत इथेच किंवा आंतरजालावर इतर कुठेही नवीन रुपात आलात तर नक्कीच आवडेल कारण तुमच्या "चार ओळीनी" खूप आनंद दिलाय.

चतुरंग's picture

21 Mar 2011 - 8:23 pm | चतुरंग

संपादकांना भरपूर शिवीगाळ करुनही शेवटी दैव बलवत्तर असल्यामुळे म्हणा किंवा अन्य काही कारणाने म्हणा आयडी काही उडत नाही असे पाहून स्वतःच आयडीला मूठमाती देण्याचा हा प्रकार वासांसि जीर्णानि..वगैरे वक्तव्ये करुन करणे अंमळ दांभिक वाटले. सौ गालियां दे के अवलिया चला हज को! ;)
असो. जशी आपली इच्छा.
(अन्य नावानी याल ह्याची खात्री आहेच! ;) )

-टवालिया

कीती दिवसांचं आमरण उपोषण म्हणायचं तुमच्या आयडीचं? नाही त्या हिशेबानं एखांदं मिनिट शांत उभं राहतो.

बाकी तुम्ही आजपर्यंत तरी ब्रह्मचारीच व्हता.. त्यात देवभोळे.. तुम्हाला कोणी.. ब्रह्मचारी आयडीनं वर गेल्यावर ७८ व्हर्जिन्स मिळतात असं सांगितलं म्हणुन तर समाधी नाय ना घेउन राह्यले? ते सगळं खोटं असतंय बरंका.. घ्या इथंच काय करुन घ्यायचं ते नाय तर तिकडं बी काय मिळायचं नाय अन इकडं तर... हॅ हॅ हॅ... असो...

द्या जरा आराम द्या आयडीला.. भेटु निवांत.. चौपाटीवर भेळ खायला.

शिल्पा ब's picture

21 Mar 2011 - 10:40 pm | शिल्पा ब

हो ना नाना...या अनुभवी कडुन शिकुन घ्या कसें हॅ हॅ हॅ

Nile's picture

24 Mar 2011 - 11:16 am | Nile

अरे चांगले होते ना रेऽऽऽऽ

असं एकदम काय झालंऽऽऽऽऽ

काल रात्री तर चौपाटीवर सिगरेत फूकत होतेऽऽऽऽ

नितिन थत्ते's picture

24 Mar 2011 - 12:00 pm | नितिन थत्ते

>>काल रात्री तर चौपाटीवर सिगरेत फूकत होतेऽऽऽऽ

काल तिसरा दिवस होता. आपल्याच अस्थी विसर्जित करायला चौपाटीवर आले असतील.

शुचि's picture

21 Mar 2011 - 9:59 pm | शुचि

नाना जाऊ नका :(

टारझन's picture

21 Mar 2011 - 10:11 pm | टारझन

जाऊ बाई जोरात :)

________________________________________
विजुभाऊ जास्ती, लिहुनि राहिला
नवा धडा गेला , टाकुनिया

निवांत पोपट's picture

22 Mar 2011 - 10:36 pm | निवांत पोपट

..............परत भेटूच.....

I आगे भी होगा जो उसका करम I
I ये दिन तो मनायेंगे, हम उम्र भर I

माझीही शॅम्पेन's picture

22 Mar 2011 - 11:00 pm | माझीही शॅम्पेन

नाना जाता जाता एक समस्त न्यू-कमर्स साठी एक संदेश देऊन जा !!!

एकदा तुम्हाला शॅम्पेन पाजण्याची विच्छा होती ती राहून गेली असो !!!

पुनर्जामसाठी अनेक शुभेच्छा !!!

कुंदन's picture

23 Mar 2011 - 5:31 pm | कुंदन

एकदा तुम्हाला परदेशवारी घडवावी अशीही एक विच्छा होती ती राहून गेली !!!
तिकिट कधीचेच तयार होते , पण पारपत्र काढले नाहीत आपण.

माझीही शॅम्पेन's picture

26 Mar 2011 - 11:20 pm | माझीही शॅम्पेन

:)

मराठमोळा's picture

22 Mar 2011 - 11:11 pm | मराठमोळा

नानाला हे शोभत नाही..
असो नानाला स्वतःच्या पर्सनल लाईफ बद्दल अतिआदर असल्याने आमच्यासारखे तुच्छ लोकं काय बोलणार? नाही का नाना?

पुष्करिणी's picture

23 Mar 2011 - 2:09 am | पुष्करिणी

शुभेच्छा

निनाद's picture

23 Mar 2011 - 4:53 am | निनाद

करुनी संस्कृतीच्या चिलिमा रोज ओढतो मी
असुन दारी देवाच्या, जगात देव शोधतो मी
घेवुनी कराल ज्ञानखड्ग अन् गीता, हातात मी
संस्कृती रक्षक आणि भंजक, असा मी असामी

असे म्हणणारे बिनधास्त व्यक्तीमत्व - आवडणारे!
तुमच्या कडून बरेच काही लिखाण अजून येणे बाकी आहे, असे वाटत असतांनाच असे?
असो, पुढील कार्यास मनापासून शुभेच्छा!
दिसामाजी लेखन घडत राहो...

अवलिया's picture

23 Mar 2011 - 6:55 pm | अवलिया

धन्यवाद मित्रांनो !! जय महाराष्ट्र !!

इंटरनेटस्नेही's picture

25 Mar 2011 - 12:40 am | इंटरनेटस्नेही

खरंच नाना चालले की काय? वाईट वाटले. नानांमुळे मिपाला एक अभ्यासु व ज्ञानी चेहरा लाभला होता.

आजानुकर्ण's picture

25 Mar 2011 - 10:28 am | आजानुकर्ण

धन्यवाद

विजुभाऊ's picture

25 Mar 2011 - 10:40 am | विजुभाऊ

रामदासा.... नाना नावे धारण करून येणे आता पुन्हा कधी होईल

अप्पा जोगळेकर's picture

26 Mar 2011 - 5:01 pm | अप्पा जोगळेकर

चालू द्या.

अभिज्ञ's picture

26 Mar 2011 - 8:04 pm | अभिज्ञ

आईच्यान..
नाना गेला होय ? ???
अरे तुझे ५०० रुपये द्यायचे होते रे....

असो,

अभिज्ञ.
;)

कुंदन's picture

26 Mar 2011 - 8:18 pm | कुंदन

इकडे दे , मी देईन त्याला.
मघाशी च निरोप आला त्याचा, मी टाकलेली पा कृ पाहुन तेला त्रास झाला तर इनो घेतोय बोल्ला.

कुंद्या तुझी आयड्या आवडली. ;)

नरेशकुमार's picture

19 Apr 2011 - 1:33 pm | नरेशकुमार

अवलीयाजी, स्वर्गात बरं वाटंतय का ?