मध्यपूर्व, ज्यू-क्श्रिश्चन- इस्लाम आणि जग

मन's picture
मन in काथ्याकूट
16 Mar 2011 - 6:31 pm
गाभा: 

बस. नीट लिहूयात ह्यावर म्हणून कित्येक दिवस थांबलो. पण तशी बांधणी/रचना करताच येत नाहीये.
जी काही रोचक माहिती मी मिळवलिये तीही विस्कळित. आता पुन्हा त्याचं कंपायलेशन करण्यापेक्षा जसं आहे तसच तुमच्यासमोर ठेवतोय. प्लीईईईज गोड मानून घ्या. आणि जमेल तशी भर घाला.
हे मी का लिहितोय?
ज्यू, ख्रिश्चन, इस्लाम हे तीन धर्म ह्या तीन संस्कृती पूर्णतः वेगळ्या नव्हेत. एका बद्दल वाचताना सहजच त्याचं दुसऱ्याबद्दलचं साम्य डोकावून जायचं. ह्याचं कारण त्यांच्या (जवळ जवळ) एक समान मूलभूत श्रद्धा (कट्टर एकेश्वरवाद वगैरे), त्यांची प्राचीन घटना वर्णने, त्यांच्या वेशभूषा वगैरे. मराठ्यांचा , आमच्या शिवरायांचा इतिहास वाचताना नेहमी प्रश्न पडायचा की हे
परकीय सुलतान आले कुठुन? एखादी मूर्ती, मंदीर दिसताच ह्यांच्यातले बहुतांश असे पिसाळल्यासारखे तोड्-फोड का करत सुटायचे? नक्की त्यांना ह्यापासुन काय प्रॉब्लेम होता? औरंगजेब संगीत द्वेष्टा का होता? का त्यानं जझिया लावला?
मराठ्यांना विरोध केवळ राजकिय कारणाकरता न राहता त्याला धार्मिक रंग कसा चढला?

किंवा उदा:- Ten Commandments चित्रपट बघताना बऱ्याचदा यहुद्यांच्या नेत्यांचे कपडे बघून आजच्या अरब पोषाखाची आठवण होई.
इब्राहिम-अब्राहम, दाउद-डेविड, सोलोमन-सुलेमान ही नावे पुनः पुनः त्यांच्या mythology मध्ये, धर्मग्रंथात येत.
म्हणजेच हे तीनही पूर्णतः वेगळे नव्हेत आणि अगदीच समानही नाहीत.
ते एकाच तत्त्वज्ञानाचा वारसा मात्र जरुर सांगतात -- वारसा अब्राहमाचा, वारसा मूसा(मोझेस), इसा(येशू) आणि प्रेषित महंमदाचा.
अब्राहम-इब्राहिम, दाउद-डेविड, सोलोमन-सुलेमान ह्या त्यांच्या पुराणपुरुषांच्या लोककथा थोड्याफार फरकानं तीनही धर्मात येतात.

O.O.P.S. च्या भाषेत Islam inherits Christian principles, Christanity inherits Jewish principles.
यहुदी धर्माचं extension आहे christanity आणि ख्रिश्चनांचं extension आहे इस्लाम.
हे आहेत Abrahamic धर्म. (आपण "इब्राहिमी " म्हणूयात. )

तर, कुतूहलापोटी एकातून दुसरी दुसरीतून तिसरी अशी लिंक लागत गेली आणि आता आहे ती माहिती मांडावीशी वाटतेय, विस्कळित का असेना. मराठी जालावर ह्याबद्दल फारसं काही दिसलं नाही. निदान माझी ही खर्डेघाशी काही जाणकारांना लिहायला उद्युक्त करेल, उचकावेल आणि प्रतिसादातून अधिक माहिती येत राहिल अशी आशा आहे.

१. मध्य पूर्व म्हणजे नक्की कुठे आहे बुवा? --मध्यपूर्वेचा भूगोल.
--जगाचा नकाशा तुमच्यासमोर आहे असं समजून सांगायचं म्हटलं तर भारताच्या...... पश्चिमेकडून बघत गेल्यास( थोडीशी उत्तर बाजूही पकडून ) हे देश दिसतात-
पाकिस्तान (पूर्वीचा वैदिककालीन आणि वैदिकपूर्व सप्त सिंधूचा प्रदेश ) त्याच्या पश्चिम-उत्तरेला अफगाण( पूर्वीचा "शकुनी"चा गांधार आणि आर्य प्रभावाखालील प्रथम अनार्य "पुश्तू" जमातीचा ), पाकच्या दक्षिण पश्चिमेला इराण ( आधीचा पर्शिया, आपले पारशी बांधव इस्लामिक आक्रमणानंतर इथूनच भारतात आश्रय घेते झाले. ), इराण च्या पश्चिमेला इराक आणि पर्शियन/अरेबिक खाडी, खाडी ओलांडताच आकारानं छोटेसे कुवैत, बहारीन, संयुक्त अरब अमिराती आणि त्यांना लागूनच आकारानं भला मोठा इस्लामची जन्म भूमी सौदी अरब.
ह्या सौदी च्या दक्षिणेला आहे ओमान आणि यमन हे देश आणि अरबी समुद्राची किनारपट्टी. हाच अरबी समुद्र ओलांडून अरब व्यापारी पश्चिम भारतच्या बंदरांवर येत(बहुदा सूरत, कालिकत वगैरे) आणि देबल बंदर( आजचं पाकिस्तानातील सिंध प्रांतातील कराची) तर आख्ख्या आशियातलं महत्त्वाचं व्यापारी बंदर होतं.

तर ह्या सौदीच्या पश्चिमेला थेट आफ्रिका खंडाचं उत्तर टोकच येतं. म्हणजे एका लायनीत(पूर्वेकडून पश्चिमेकडे) सौदी, इजिप्त, लिबिया, अल्जिरिया, मोरोक्को हे उत्तर आफ्रिकन देश येतात.

ह्यापैकी सौदी आणि इजिप्त हे एकमेकाला लागून असले तरी त्यांची भूसीमा अत्यल्प आहे.
त्या दोघांच्या मध्ये आहे तांबडा समुद्र.
ह्या दोन्ही देशांच्यावर(नकाशात) आहेत चिमुकले पण धगधगते देशः-
इस्त्राईल, पॅलेस्टाइन, जॉर्डन, लेबानॉन.
ह्या देशांच्या वर(उत्तरेला) आहे इतिहासप्रसिद्ध, ज्यावर अतिप्राचीन काळापासून ते दुसऱ्या महायुद्धापर्यंत अनेक भीषण लढाया लढल्या गेल्या तो Meditterian sea किंवा भूमध्य समुद्र.

२. असं काय खास आहे बुवा ह्या समुद्राच्या जागेत? ह्याच्या तर जवळ जवळ सर्वच बाजूनं जमीन आहे.
--म्हणून तर तो खास आहे. ह्या समुद्राच्या प्रत्येक काठावर जुन्या काळापासून अनेक विध संस्कृती नांदल्या आहेत.
भांडल्या आहेत. आणि बहुतांश नामशेष झाल्या आहेत. अहो जागतिक जल-मार्ग व्यापार जरा आठवून बघा म्हणजे ह्याचं माहात्म्य लक्षात येईल. ह्याच्या वरती/उत्तरेला युरोपिअन देश आहेत(पूर्वीचे ग्रीको-रोमन साम्राज्य (स्पेन, पोर्तुगाल, इटाली, ग्रीस वगैरे प्रमुख. ) ख्रिश्चनबहुल ), ह्याच्या दक्षिणेला आफ्रिकन देश आहेत (इजिप्त, लिबिया, अल्जिरिया, मोरोक्को-- मुस्लिम बहुल). ह्याच्या पूर्वेला आशियाई देश आहेत इस्राइल, पॅलेस्टाइन, टर्की/तुर्कस्थान (टर्की ह्या trans-continental देशाचा आशियातला भाग)

इथं उल्लेख केलेल्या प्रत्येक देशात स्वतःची अशी एक संस्कृती होती( काहींची आजही आहे), प्रत्येकाची खास अशी पोषाखाची पद्धती होती, खान-पान, भाषा, धार्मिक-संकल्पना ठासून भरल्या होत्या.
अवांतरः- ह्याच समुद्रात क्रीट बेटे आहेत ग्रीस जवळ, जी जिंकण्यासाठी हिटलरने जीवाचा आटापिटा केला आणि ती लढाई त्याला नंतर महागात पडली.

३. संस्कृती होती म्हणताय, मग कुठकुठल्या होत्या बरं ह्या संस्कृती?
४. ह्यांचा धर्मग्रंथ कुठला?
५. यांच्या देव-देवता, जीवन-मरण आणि नैतिकता ह्याबद्दल संकल्पना कुठल्या?
६. कुठल्या मोठ्या लढाया/घटना झाल्या मध्यपूर्वेत?
प्रश्न ३ ते ६ आपण पाहू पुढल्या भागात.

टीपः- पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे मध्य-पूर्वेत येतात की नाही नक्की सांगता येत नाही.
पाकिस्तान सरकारला मात्र ते स्वतः मध्य-पूर्वेतील महत्त्वाचे राष्ट्र आहे असं दाखवलेलं आवडतं. जुन्या संदर्भ ग्रंथात मात्र पाक-अफगाणचा उल्लेख मध्य-पूर्व म्हणून क्वचितच येतो.
क्रमशः.....

प्रतिक्रिया

मन१'s picture

16 Mar 2011 - 6:33 pm | मन१

हा इथे बघता येइलः-

http://www.google.co.in/imgres?imgurl=http://atlasshrugs2000.typepad.com...

आपलाच
मनोबा.

स्वानन्द's picture

16 Mar 2011 - 6:46 pm | स्वानन्द

रोचक माहिती. वाचतोय.

अवांतरः पश्चिम-उत्तर = वायव्य.

पुढचे भाग लवकर येऊ दे. तेव्हा कदाचित प्रतीसादांतून आणखी कानितीची भर पडेल.
पु.ले.शु. :)

ज्यु,हिंदु,मुस्लिम व ख्रिस्ती लोक एकसारखा पोशाख करतात व सर्वाच्या चालीरिती जवळ्जवळ एकसमान आहेत.

मन१'s picture

16 Mar 2011 - 9:41 pm | मन१

सामान्य व्यवहारात करत असतीलही.
पण ज्यु,मुस्लिम्,ख्रिस्ती ह्यांच्या

धार्मिक विधींच्या वेळेस कुठल्या भाषेत बुवा प्रार्थना केल्या जातात?
लग्नं कुठल्या भाषेत लावली जातात?
कुठले इमाम/पाद्री/रब्बी धोतर घालुन फिरतात(हिंदुंच्या पुजार्‍याप्रमाणे)?
कुठला धार्मिक मुस्लिम्/ख्रिस्ती/ज्यू जटा बांधून फिरतो(हिंदु संन्याशाप्रमाणे?)
चालीरिती म्हणाल तर काहिशा समान असुही शकतात, हिंदुंनी धर्मांतर केल्यावर ह्या धर्मात चालीरिती गेल्या असाव्यात.

हिंदुंच्या मूळ चालीरिती समान आहेत त्या बौद्ध्,जैन ,शीख आणि इतर इथल्या स्थानिक पंथांबरोबर.

बाकी, लेख वाचल्याबद्दल आभार.
नक्की काय म्हणताय ते कळलं नाही ब्वा.
अधिक चर्चा खरडीतुन केल्यास उत्तम.

आपलाच मनोबा.

sagarparadkar's picture

16 Mar 2011 - 6:58 pm | sagarparadkar

जोसेफ --> युसूफ
एश्मायेल --> ईस्माईल

मला प्रश्न पडे की इंग्लिशमधील जीझस आपल्या मराठीत येशू कसा झाला त्याचं उत्तर बर्‍याच वर्षांनी मिळालं. बर्‍याच पूर्व-युरोपियन भाषांमधे J चा उच्चार Y प्रमाणे होतो म्हणून Jesus चा उच्चार येशू झाला असावा.

स्वानन्द's picture

16 Mar 2011 - 7:03 pm | स्वानन्द

नव्यानेच कळलं. धन्यवाद. :)

धनंजय's picture

16 Mar 2011 - 9:08 pm | धनंजय

मूळ "य"चा "ज"झाला. लॅटिनपर्यंत उच्चार "य" होता.

मराठीत ख्रिस्ती धर्मशास्त्रातील आणि धर्मसंस्कृतीमधील बरेचसे शब्द पोर्तुगीजवाटे आले, इंग्रजीवाटे नव्हे. (पाद्री, माद्री, गिर्जा=चर्च.)

मराठीत पहिले बायबल भाषांतरित करणार्‍यांनी मूळ हिब्रू/आरामाइक मधून उच्चार घेतले - येशू, योहान, मत्तय वगैरे.

हिंदीमध्ये येशूचे नाव अरबीमार्फत आले, ते तसेच टिकले - "ईसा".

वपाडाव's picture

17 Mar 2011 - 4:14 pm | वपाडाव

'य' अन 'ज' ह्यांच्या उच्चारातील फरक फक्त आणी फक्त क्रिकेटच्या कृपेमुळे कळाली.
Hansie Cronje = हॅन्सि क्रोनिये.
Johan Botha = योहान बोथा.
Nicky Boje = निकी बोये.
ही काही उदाहरणे....
बाकी लेख वुत्तम.... येउ द्या...

मन१'s picture

16 Mar 2011 - 9:12 pm | मन१

अशी रुपांतरणं पुष्कळशी सापडतील.
त्यातली बरीचशी पुढील भागात येतीलही.
जसं याकूब चा जेकब झाला आणि आयझॅक चा इसहाक.
योहान्/यौहान चा झाला जॉन.

खाली तुम्ही म्हटल्याप्रमाणे भारतीय उपखंड आणि दक्षिण आशिया ह्या शब्दांबद्दलः-
जितके जुने दस्ताऐवज पहाल, तितका उल्लेख "भारतीय उपखंड" असाच दिसेल.
हल्ली मात्र " दक्षिण आशिया" हा शब्द जास्त वापरला जातो. "भारतीय उपखंड" ह्या शब्दातुन भारताचा "Regional Big brother" हा रोल अधोरेखित होतो, इतर शेजार्‍यांना (लंका,बांग्लादेश, भूतान, नेपाळ आणि हो, पाकिस्तान ह्यांना) तो कमीपणा आणणारा वाटत असावा, म्हणुन " दक्षिण आशिया" ला प्राधान्य मिळत असावं.

आपलाच मनोबा.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

16 Mar 2011 - 10:20 pm | निनाद मुक्काम प...

बर्‍याच पूर्व-युरोपियन भाषांमधे J चा उच्चार Y प्रमाणे होतो

ज चा उच्चार य हा जर्मन भाषेत होतो .
ते जपान हा शब्द इंग्रजीत लिहून त्याचा उच्चार यापान करतात .तेच ज्युलिया बाबतीत युलिया

विकास's picture

16 Mar 2011 - 7:24 pm | विकास

चांगली सुरवात. पुढचे भाग देखील लवकर येउंदेत...

मध्य पूर्व म्हणजे नक्की कुठे आहे बुवा? --मध्यपूर्वेचा भूगोल.

मध्यपूर्व ही ब्रिटीशांसाठी आहे, आपल्यासाठी "मध्य-पश्चिम" ;). पण त्यातील गमतीचा भाग सोडला तरी त्यास अमेरिकन्स बर्‍याचदा "Near East" असे म्हणतात.

(विकी)

इथल्या व्याख्येप्रमाणे, The Middle East (or West Asia) sits where Africa, Asia and Europe meet. The countries of the Middle East are all part of Asia, but for clarity reasons we geographically show them here as a separate landmass.

विकीवरील माहितीप्रमाणे, बूश सरकारने "Greater Middle East" हा नवीन शब्द तयार केला आणि त्यात पाकीस्तान, अफगाणिस्तान आणि काही इतर मध्यआशियाई (सेंट्रल एशिया) मुस्लीम राष्ट्रांची त्यात वर्गवारी केली.

मन१'s picture

16 Mar 2011 - 9:30 pm | मन१

खरच की. आख्खी दुनिया ब्रिटिशांच्या नजरेतुन पाहतोय का काय आम्ही?

"...The countries of the Middle East are all part of Asia, "
हे काही पटलं नाही बुवा. आख्खा इजिप्त आफ्रिका खंडात आहे. त्याचा एक लहानसा भूभाग आशियात आहे.
(निदान केमाल पाशाच्या काळापासुन )तुर्कस्थान स्वतःला युरोपिअन राष्ट्र म्हणुन मानते. अगदि तुर्की भाषेची सद्य लिपीसुद्धा रोमनच्या जास्त जवळ जाणारी आहे, अरेबिकच्या नव्हे.

"Greater Middle East" पहिल्यांदाच ऐकतोय, मुद्दाम पाकचा आग्रह पुरवण्यासाठी तयार केलेली संज्ञा वाटते.
central Asia माझ्या माहितीप्रमाणे पूर्वीच्या सोविएत युनिअन चा भाग होय.

इथे मी "मध्यपूर्व" हा शब्द सध्या "अरब जगत" ह्याला पर्यायी म्हणुन वर्तमानपत्रे वापरतात, तसाच वापरलाय.
ह्यात central asia चा फारसा सहभाग नसेल.(फक्त काही स्वार्‍यांमध्ये पर्शियन साम्राज्याचा भाग म्हणुन त्याचा उल्लेख आहे.)
मूळ इब्राहिमी धर्मांच्या जडणघडणीत, मध्यपूर्वेतल्या अतिप्राचीन ते अर्वाचीन संस्कृती संकरात किंवा क्रुसेड वगैरे मधल्या हाणामारित त्यांचा फारसा सहभाग नाही.

पाकिस्तान सरकारच्या अधिकृत संकेतस्थळातच आजचे पाक उमय्याद आणि अब्बासिद( इसवीसनाच्या ८व्या शतकाच्या मध्यापासुनच) घराण्यांच्या काळापासुनच कसे मध्य पूर्वेशी(च) जोडलेले होते(आणि उर्वरित भारताशी तितके नाही.) हे पुन्हा पुन्हा अधोरेखित केलय. त्यामुळं "greater" शब्द जरी काढुन टाकला तरी ते स्वत:ला "middle east state" मानतील हे नक्की.

आणि हो लग्गेच दिलेल्या प्रतिसादाबद्दल सर्वांचेच आभार.

आपलाच मनोबा.

विकास's picture

16 Mar 2011 - 9:57 pm | विकास

"...The countries of the Middle East are all part of Asia, "
हे काही पटलं नाही बुवा. आख्खा इजिप्त आफ्रिका खंडात आहे.

सहमत.

या उलट मग विकीवरील व्याख्या बरोबर असावी: The Middle East is a region that encompasses Western Asia and North Africa.

धन्यवाद.

sagarparadkar's picture

16 Mar 2011 - 8:43 pm | sagarparadkar

लहानपणी ह्या मध्य-पूर्वेचा एक गोंधळच होता ... म्हणायचं पूर्व पण ते सर्व देश तर भारताच्या उत्तर्-पश्चिमेला ...

नंतर कळलं कि ह्या दिशा / प्रभाग ह्यांना ब्रिटिश आणि अमेरीकनांनी ही नावे ठेवली आहेत. तर 'त्यांना' पूर्वेकडे जाताना हा भाग बर्‍यापैकी मध्यात येत असेल, म्हणून त्यांनी लगेच त्याचा मध्य-पूर्व करून टाकलं

अवांतरः अशाच प्रकारे 'भारतीय उपखंडा'चे 'दक्षिण आशिया' होताना आपण मात्र पूर्णपणे गाफील राहिलो का?

५० फक्त's picture

16 Mar 2011 - 9:27 pm | ५० फक्त

जबरदस्त माहिती येते आहे, माझ्यासारख्या अज्ञानी माणसाला फार मदत होईल या सगळयाची.

तुम्ही लिहित रहा, आम्ही वाचत राहु.

प्रचेतस's picture

16 Mar 2011 - 9:47 pm | प्रचेतस

पुढील भाग वाचण्यास प्रचंड उत्सुक.

आनंदयात्री's picture

16 Mar 2011 - 10:08 pm | आनंदयात्री

हेच म्हणतो.

अप्पा जोगळेकर's picture

16 Mar 2011 - 10:26 pm | अप्पा जोगळेकर

मस्तच लिहिलंय. वाचतो आहे.अजून येउद्यात.

अप्रतिम's picture

16 Mar 2011 - 11:59 pm | अप्रतिम

मला एक कळत नाही की तुर्कस्तान/टर्की एवढा उतावळा का आहे युरोपीय महासंघत जाण्यासाठी?
आणि फुटबोल्च्या युरो कप मधे पन कसा काय खेळतो?तो तर आशियाई देश आहे ना?

टारझन's picture

17 Mar 2011 - 6:13 pm | टारझन

मला एक कळत नाही की तुर्कस्तान/टर्की एवढा उतावळा का आहे युरोपीय महासंघत जाण्यासाठी?

टर्की लोकं फार ठर्की आहेत म्हणुन तर नसेल ?

- टारेशु मोझेसुद्दिन

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

17 Mar 2011 - 9:55 pm | निनाद मुक्काम प...

येथे अवांतर नको .
खव मध्ये प्रतिसाद दिला आहे .

पुष्करिणी's picture

17 Mar 2011 - 1:34 am | पुष्करिणी

झोराष्ट्रियन ( पारशी ) धर्माचा काही प्रमाणात प्रभाव या अब्राहमी धर्मांवर असावा का? कारण ख्रिस्तपूर्व १५००-१२०० काळी या धर्माचा उदय झाला असं म्हणतात आणि मध्यपूर्वेतला हा एक मुख्य धर्म होता. तसा हा ही monotheistic faith च आहे.
सर्वात मॉडर्न monotheistic faith म्हणजे बहाइ असावा, या बद्दल वाचायला आवडेल.

मध्यपूर्वेतला वेगळा देश अशी राजकीय मान्यता नसलेला पण स्वतःचं वेगळेपण जपणारा समुदाय म्हणजे कुर्दिश लोकं.
यांच्यावर माहिती वाचायला आवडेल.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

17 Mar 2011 - 1:42 am | निनाद मुक्काम प...

पुष्करणी
आमच्या हॉटेलात अनेक कुर्दिश लोक जे इराक इराण तुर्की ह्या देशातील निर्वासित म्हणून युरोपात आले आहेत .
त्यांच्या संधर्भात मी पंडीत गागा ..
ह्यांना वचन दिल्याप्रमाणे निर्वासितांवर एक लेख लिहीन तेव्हा सविस्तर माहिती देईन .
सध्या एवढेच
ह्या लोकांच्या हत्याकांडाबद्दल सद्दामला दोषी ठरवून फाशी दिली .
ब्लेक वोतर चे सदस्य इराक मध्ये कुर्दिश बंडखोरांना पैसे व शस्त्र पुरवण्याचा आरोप युरोपियन युनियन मध्ये झाला .

पुष्करिणी's picture

17 Mar 2011 - 1:46 am | पुष्करिणी

नक्की लिहा, वाचायला आवडेल

इंटरनेटस्नेही's picture

17 Mar 2011 - 2:45 am | इंटरनेटस्नेही

लेख चांगलाच आहे, पण थोडासा विस्कळीत पणा कमी करता आला तर, किंवा अ‍ॅट्लीस्ट विरामचिन्हे तरी योग्य ठिकाणी देता आली तर फार बरे होईल. मिपावरील एक संग्राह्य लेखमाला ठरु शकण्याचे सार्मथ्य आहे या विषयात.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा!

सहज's picture

17 Mar 2011 - 4:52 am | सहज

वाचत आहे.

अर्धवट's picture

17 Mar 2011 - 6:59 am | अर्धवट

वाचतोय.. काहि समजेल, सुचेल तशी माहिती पण टाकतोच

मराठी_माणूस's picture

17 Mar 2011 - 7:14 am | मराठी_माणूस

चांगली माहीतीपुर्ण लेख. पुढील भाग वाचण्यास उत्सुक .

तीनही धर्मा मधे प्रेषीत वगळे आहेत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Mar 2011 - 9:18 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेखन वाचतोय.

-दिलीप बिरुटे

व्वा बिरुटे सरांची एक अत्यंत बोलकी प्रतिक्रीया.
क्या ब्बात आहे!
बर्‍याच भारतीय भाषांमध्ये देखील ज आणि य चा गोंधळ आहे. "जादव- यादव" "जूग -यूग "
तसेच ह आणि स चा गोंधळ आहे. स आणि ह चा गोंधळ हा पर्शीयन भाषेमुळे आलेला आहे. "सिंधू- हिंदू"
"असुर -अहूर " अहुर ही एक पर्शियन देवता आहे

llपुण्याचे पेशवेll's picture

17 Mar 2011 - 11:04 am | llपुण्याचे पेशवेll

मनोबा चांगला लेख आहे. आवडला. अखेर लेखनविरामाला विराम देऊन लिहीते झालात. लेख चांगला उतरला आहे.

अवलिया's picture

17 Mar 2011 - 11:13 am | अवलिया

छान लेखन.

स्पंदना's picture

17 Mar 2011 - 12:01 pm | स्पंदना

रोचक लेख! लेखाची शैली जरी तुम्हाला विस्कळीत वाटत असली तरी मला ती माझ्याशी संवाद साधणारी वाटली.

आणखी एक महत्वाच- ज्युंचा धर्म ग्रंथ (नाव आठवत नाहे) बायबल अन कुराण यांचे सुरवातीचे अर्धे भाग हे एकसारखे म्हणण्या ऐवजी एकच आहेत. कारण तुम्ही वर सांगितलेलच आहे , हे तिन्ही धर्म एकमेका मधुन जन्माला आले अन तरीही एक मेकांचे इतके कट्टर शत्रु!
तिन्ही धर्मात देह स्वच्छ करुन पुरला जातो कारण जगाच्या शेवटच्या दिवशी न्याय निवाडा होताना परमेश्वराला सामोर जाताना स्वच्छ असावा, अन पुण्य मिळावे. ही एकच कन्सेप्ट तिन्ही ठिकाणी दिसते.

तुम्ही लिहित रहा. जे तुम्हाला स्पष्टीकरणा ला अवघड जाईल ते सुलभ करायला येथील अनेक जण अगदी हिरिरीने पुढे येतील. बघाच तुम्ही.

धुमकेतू's picture

17 Mar 2011 - 12:48 pm | धुमकेतू

मनोबा ,
मस्त लिहले आहेस !!! पुढच्या भागांची वाट बघतो आहे ....

एकाच अभ्यासमालिकेत
मनात कुठलेही पूर्वग्रह न ठेवता तौरात , बायबल , कुराण (कुठल्याही पवित्र धार्मिक ग्रंथांची छेडछाड न करता )
जर वाचायला मिळाले तर जरुर वाच
जेरुसलेम चा इतिहास अन महत्व ही वाच
जेरुसलेम शहर हे आम्हां मुस्लिम तसेच ख्रिश्चन , अन ज्यूं साठी अतिशय पवित्र भूमी आहे.
संधर्भ लगेच लक्षात येईल

वाहीदा's picture

17 Mar 2011 - 3:12 pm | वाहीदा

तौरात , बायबल , कुराण कुठल्याही UN-AUTHENTICATED साईटवर जाऊन वाचू नकोस
दुर्दैवाने त्यात खूप छेडछाड केली गेली आहे :-(
अन आप-आपल्या सोईनुसार वाट्टेल तो अर्थ लावला गेला आहे

मन१'s picture

17 Mar 2011 - 3:47 pm | मन१

आणि इतकं करुनही माहिती पूर्ण अचूक वाटली नाही तर आपण इथं जाहिर दुरुस्ती करु शकताच.
सूचना महत्वाच्या आहेत.

कुराण मधील किंवा बायबल मधील संपूर्ण उपदेश्/तत्वज्ञान मी इथे देउ शकणार नाही.
मी फक्त मला त्यामध्ये सापडलेली मुख्य तत्वे थोडक्यात सांगणार आहे.( एकेश्वरवाद, कलिमा, आणि इतर ठळक्,मूलभूत इब्राहिमी धर्मांच्या श्रद्धा . )
त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे ह्या ग्रंथात उल्लेखलेल्या ठळक घटना (DAvid and Goaliath, Crucification,Firewall,Mount sinai,promised land,people of caves, मक्केहून मदिनेला हिजरत वगैरे) , कथा आणि लोक कथा द्यायचा विचार आहे. कथा कुणालाही वाचताना(आणि लिहिताना) कंटाळवाण्या होणार नाहित व त्या निमित्तानं मध्य पूर्वेतील भूभागांच्या श्रद्धांबाबत थोडाफार प्रकाश पडेल अशी आशा आहे.

उदा:- महाभारत सीरियल बघत असताना बहुतांश लोकांना कंटाळवाणी होणार नाही. पण तेच जर श्रीमद् भगवत् गीतेतील तत्वज्ञानाबद्दल चर्चा केली तर (माझ्यासारख्या)काहींना निरस वाटु शकते. किंवा ती अधिक सोप्या भाषेत सांगण्यासाठी जास्त अभ्यास असणं आवश्यक आहे.

आपलाच मनोबा.

वाहीदा's picture

17 Mar 2011 - 4:53 pm | वाहीदा

infact तत्वज्ञानात अजिबात घुसुच नकोस, खुप बोअर होईल

निनाद's picture

18 Mar 2011 - 5:26 am | निनाद

मद् भगवत् गीतेतील तत्वज्ञानाबद्दल चर्चा केली तर (माझ्यासारख्या)काहींना निरस वाटु शकते. याच वेळी कदाचित काही लोक 'कथा बाजूला ठेवा नि मुद्द्याचे बोला' असे म्हणून गीते कडेच वळू शकतील.

sneharani's picture

17 Mar 2011 - 3:23 pm | sneharani

मस्त लेखन!

परिकथेतील राजकुमार's picture

17 Mar 2011 - 3:57 pm | परिकथेतील राजकुमार

जबर्‍या रे मनोबा.

लेखातुन आणि प्रतिक्रीयांमधुन अनेक नव्या आणि छान गोष्टींची माहिती होत आहे. येवढ्या छान शब्दात कोणी शाळेची पुस्तके लिहिली असती तर किती मजा आली असती :)

सर्वांचे धन्यवाद. पु.भा.प्र.

*आमच्या क्याफेत अनेक कातकरी, भिल्ल, अदिवासी, लमाणी लोक इतर क्याफेतील निर्वासित म्हणून आमच्या क्याफेत आले आहेत .
त्यांच्या संधर्भात मी महापंडीत टारझन ..
ह्यांना वचन दिल्याप्रमाणे निर्वासितांवर एक लेख लिहीन तेव्हा सविस्तर माहिती देईन .
सध्या एवढेच
ह्या लोकांच्या व्यसनांबद्दल विजय मल्ल्याला दारुश्री दिली .
रम व्होडक्या चे सदस्य बार मध्ये स्वदेशी बेवड्यांना पुडी व चकणा पुरवण्याचा आरोप दारुपियन युनियन मध्ये झाला. *

वाहीदा's picture

17 Mar 2011 - 4:56 pm | वाहीदा

आमच्या क्याफेत अनेक कातकरी, भिल्ल, अदिवासी, लमाणी लोक इतर क्याफेतील निर्वासित म्हणून आमच्या क्याफेत आले आहेत .
त्यांच्या संधर्भात मी महापंडीत टारझन ..
ह्यांना वचन दिल्याप्रमाणे निर्वासितांवर एक लेख लिहीन तेव्हा सविस्तर माहिती देईन .
सध्या एवढेच
ह्या लोकांच्या व्यसनांबद्दल विजय मल्ल्याला दारुश्री दिली .
रम व्होडक्या चे सदस्य बार मध्ये स्वदेशी बेवड्यांना पुडी व चकणा पुरवण्याचा आरोप दारुपियन युनियन मध्ये झाला

अरे व्वा ! सौंदर्य फ़ुफ़ाट्याचे स्वरुप बदलले वाटते.. ;-)

टारझन's picture

17 Mar 2011 - 6:17 pm | टारझन

नक्की लिहा, वाचायला आवडेल

-पुल्करिनी

धमाल मुलगा's picture

17 Mar 2011 - 5:58 pm | धमाल मुलगा

एका माहितीपुर्ण लेखमालेची यशस्वी सुरुवात असंच म्हणेन मी. :)

अब्राहमी धर्म (ह्याबाबत धर्म म्हणावे की पंथ हा प्रश्न मला नेहमी पडत आला आहे .) इतके एकसारखे असून किंबहुना पाळंमुळं सारखी असूनही त्यांच्यात इतकं टोकाचं वितुष्ट का? असाही प्रश्न नेहमी पडतो. पण ते असो. बहुधा ह्या लेखमालेचा त्यावर चर्चा करण्याचा उद्देश नसावा.

सविस्तर चर्चा करायला एकदा भेटायचंय तुम्हाला. ;)
-( सार्वजनिक पुणेकर) ध.

रमताराम's picture

17 Mar 2011 - 8:41 pm | रमताराम

इतके एकसारखे असून किंबहुना पाळंमुळं सारखी असूनही त्यांच्यात इतकं टोकाचं वितुष्ट का?
आपल्यासारख्या ज्येष्ठ नि श्रेष्ठ व्यक्तिला असा प्रश्न पडावा अं? अहो भाऊबंदकी ही भावा-भावातच असायची की, म्हणून तर तिला भाऊबंदकी म्हणतात. शेवटी मालमत्तेचे भांडण वारसांमधेच होणार ना? इतकं सोपं तर आहे. आता बघा, सिंडिकेट काँग्रेस खरी कि इंडिकेट काँग्रेस खरी यावर कायदेशीर काथ्याकूट किती झाला, शेवट काय? बाईंच्या काँग्रेसने जुन्या खोंडाना संख्येत धोबिपछाड मारले नि झाले, काँग्रेस(इं) मूळ काँग्रेस ठरली. झगडा तोच आहे बघा, नि उपायही तोच, बहुसंख्या निर्माण करून त्यायोगे वर्चस्व निर्माण करण्याचा नि आपणच खरे वारस हे सिद्ध करण्याचा. आता बहुसंख्या निर्माण करताना स्वतःची संख्या वाढवण्याबरोबरच विरोधकांची 'कमी करणे' हा नामी उपाय एखाद्या वाळवंटी विद्वानाला सापडला असावा, नि त्याने तो अंमलात आणला. परिणाम म्हणजे क्रूसेड्स. हा उपाय अधिक परिणामकारक आहे बघा. एक मूल जन्माला घालायला नऊ महिने लागतात, तेवढ्या वेळात समोरचे किती कमी करता येतात विचार करा. हल्ली आपल्याकडेही हा परिणामकारक उपाय वापरू लागले आहेत असे दिसते.

पैसा's picture

17 Mar 2011 - 8:47 pm | पैसा

खूप नवी माहिती लेखातून आणि प्रतिसादातून मिळते आहे. वाचनखूण म्हणून साठवण्यासारखा लेख.

प्राजु's picture

17 Mar 2011 - 10:25 pm | प्राजु

वा वा!
वाचतेय.. खूप इंटरेस्टींग आहे हे.. येऊदे अजून.
खूप नव्या नव्या गोष्टी समजतील यातून.

निनाद's picture

18 Mar 2011 - 5:27 am | निनाद

उत्तम लिखाण, वाचतो आहे अजून येऊ द्या.

अभिज्ञ's picture

18 Mar 2011 - 9:23 am | अभिज्ञ

उत्तम विषय व उत्तम लिखाण.
वाचतो आहेच,पुढील भाग लवकर येउ द्यात.

अभिज्ञ.