कविता कराव्या लागत नाहीत,
त्या नकळतच होत असतात ।
मनातल्या भावनांना जसे,
शब्दांचे आधार मिळत असतात ।
जुळवायचीच म्हणून,
वाक्यांतील यमके जुळवायची नसतात ।
वरच्या ओळींची खालच्या ओळींशी,
ओढून ताणून नाती जोडायची नसतात ।
सरळ सोप्या शब्दात भावना मनातल्या,
कवीतेतून ह्या मांडायच्या असतात ।
शब्द असतात भावनांसाठी कवीतेत,
भावना शब्दां साठी नसतात ।
हर्षद प्रभुदेसाई.....(डोंबिवली)
प्रतिक्रिया
14 Mar 2011 - 11:14 am | नगरीनिरंजन
>>कविता कराव्या लागत नाहीत,
>>त्या नकळतच होत असतात ।
वा! ओळी मनाला भिडल्या.
(तुम्हाला एकदम चार-चार झालेल्या दिसताहेत. डायरेक्ट मिपावर करण्यापेक्षा आधी एकदा कागदावर का नाही करत?
)
- अलगद डायपरभाई.
14 Mar 2011 - 11:16 am | टारझन
किती दिवसांनी लिहीलंत हर्षद भाऊ. आहो तुमची कवीता पहायला डोळे आसुसलेले असतात हो आमचे.
जबरदस्त काव्य आहे हे .. तोडंच नाही . लाखात एक !
-हार्डिक प्रभुकेभाई
14 Mar 2011 - 12:49 pm | Nile
=)) =))
हाण तेज्यायल्या, इथुन पुढे हर्षदराव दहावेळा विचार करुन मगच करायला बसतील आणि नीट होत नसेल तर करणार नाहीत इतका हाणलाय! =))
-जोर लगारेभाई
14 Mar 2011 - 11:19 am | शिल्पा ब
तुम्ही काही या लोकांकडे लक्ष देऊ नका हो!!! लिहा वाटेल तेव्हढ...कलादालनात..(भले मग काव्य विभाग ओस का पडेना..)
14 Mar 2011 - 11:21 am | नन्दादीप
डोंबिवलीत सुनामी आली की काय?? तुम्ही एक्दम काव्यविभागातून कलादालनात येवून पडलात म्हणून बोल्लो.
14 Mar 2011 - 11:42 am | स्पंदना
नगरी टु नन्दादिप , वाचताना डोळ्यातुन पाणी गळायला लागल , एव्हढी हसतेय!
काय ओ नगरी...कागदावर?
14 Mar 2011 - 12:13 pm | नरेशकुमार
कोनी काहिहि म्हनो,
आपल्याला आवडले हे जे काय लिहिले आहे ते.
हे असमतेचे राजकारन सगळिकडेच थैमान घालते आहे