केले अथक परिश्रम गाठाया पैलतीर ...
नाही ओलांडू शकलो सखे तुझ्या नयनीचे नीर
सोडून सगळे मागे चाललो नव्या देशात ...
गुंतले हात सखये मात्र तुझ्या मोकळ्या केसात
पुसले सारे संकेत पुसल्या त्या आठवणी ...
ओठावर पण अजून रेंगाळती तुझी मोहक गाणी
वाटले झालो मोकळा तोडले सगळे पाश
वाटले सरले धुके अन झाले मोकळे आकाश
पाऊले पुढे नेत होती ... मन म्हणत होते .... मागे फिर
नाही ओलांडू शकलो .... सखे तुझ्या नयनीचे नीर
प्रतिक्रिया
11 Mar 2011 - 12:52 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
सखे तुझ्या नयनीचे नीर
व्वाह!! क्या बात!!