स्त्री

गणेशा's picture
गणेशा in जे न देखे रवी...
8 Mar 2011 - 1:45 pm

महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

मी गीत मी प्रीत
मी साद मी हाक
मी शब्द मी व्यक्त
अखंडीत !!

मी राधा मी मीरा
मी शक्ती मी भक्ती
मी अणु मी रेणू
समाजात!!

मी सल मी बळ
मी खोल मी पंख
मी धरा मी नभ
संभ्रमात !!

मी धुंद मी गंध
मी नशा मी फ़ुल
मी सुध मी शेज
जन्मजात !!

--- शब्दमेघ (स्त्री...भावनांचा प्रवास मधुन)

कविता

प्रतिक्रिया

ज्ञानराम's picture

8 Mar 2011 - 4:42 pm | ज्ञानराम

सुंदर..

ज्ञानराम's picture

8 Mar 2011 - 4:53 pm | ज्ञानराम

आणखी एक ओळ माझ्या कडून

मी स्त्री , मी माता
मी बहीण , मी कांता
मी प्रेम , मी ममता..
जन्मजात...

गणेशा's picture

8 Mar 2011 - 5:57 pm | गणेशा

सुंदर...

प्रकाश१११'s picture

9 Mar 2011 - 7:23 am | प्रकाश१११

गणेशा - छान नि सुंदर. मस्त सूर ,शब्द.
शुभेच्छा