(कधी)

केशवसुमार's picture
केशवसुमार in जे न देखे रवी...
8 May 2008 - 1:55 am

मिलिंद फणसे यांची कधी  ही कविता वाचून आम्हाला आम्ही कधी कधी काय काय कारतो ते आठवलं "ही" कधी, तर "ती" कधी चालते "तीही" कधीकाय सांगावे तुम्हा शुद्धित असतो मी  कधी ?रोजचा माझाच मी ठरवला कोटा तिचाटाकतो सोडा कधी, टाकतो पाणी कधीसंपतो सोडा कधी ,संपते पाणी कधीचालते तेव्हा मला, वारुणी कोरी कधीती कधी नसलीच तर मार्ग मी हा काढतोखूप येतो वास पण चालते फेणी कधीहा निरागस चेहरा, हासता मनमोकळेवाटते चढली कुठे, वाटते  चढली कधीती जशी माझ्यामध्ये खोल दडुनी बैसतेफेर धरुनी नाचतो मी स्वतःभवती कधीलाज सोडावी अधी लागते "केश्या"जरापाडता येते विडंबन, असे सहजी कधी ?

विडंबन

प्रतिक्रिया

चतुरंग's picture

8 May 2008 - 2:17 am | चतुरंग

"ही" कधी, तर "ती" कधी चालते "तीही" कधी
काय सांगावे तुम्हा शुद्धित असतो मी कधी ?

ती कधी नसलीच तर मार्ग मी हा काढतो
खूप येतो वास पण चालते फेणी कधी

हे दोन्ही शेर एकदम 'टुन्न' जमलेत! ;)
चतुरंग

ब्रिटिश टिंग्या's picture

8 May 2008 - 2:29 am | ब्रिटिश टिंग्या

सही यार!

"ही" कधी, तर "ती" कधी चालते "तीही" कधी
काय सांगावे तुम्हा शुद्धित असतो मी कधी ?

खी खी खी!

संपतो सोडा कधी ,संपते पाणी कधी
चालते तेव्हा मला, वारुणी कोरी कधी

खरयं.....कोरी पिण्यात जी मजा आहे ती भेसळमिश्रितमध्ये नाही!

असो, विडंबन नेहेमीप्रमाणे जब्राट!

धमाल मुलगा's picture

8 May 2008 - 11:10 am | धमाल मुलगा

रोजचा माझाच मी ठरवला कोटा तिचा
टाकतो सोडा कधी, टाकतो पाणी कधी

अरे वा!

ती जशी माझ्यामध्ये खोल दडुनी बैसते
फेर धरुनी नाचतो मी स्वतःभवती कधी

:) तन डोले.. मेरा मन डोले...

लाज सोडावी अधी लागते "केश्या"जरा
पाडता येते विडंबन, असे सहजी कधी ?

:))
पण एक प्रश्न...हा मनुष्य स्वतः दारुच्या थेंबालाही स्पर्श करत नाही, आणि काव्यरचना मात्र दारु, तीचे निरनिराळे रंग, परिणाम, नशा इ.इ. गोष्टींगर मोठ्या अधिकाराने करतो ! हे कसे बॉ?
(आता, "मृत्यूचं वर्णन करायला स्वतः गचकायलाच पाहिजे का?" असं 'पुणे-३०' छापाचा प्रश्न करुन कोणी आम्हाला तोंडावर आपटू नये ही 'णम्र इनंती')

केशवसुमार's picture

8 May 2008 - 11:45 am | केशवसुमार

X( सिहगड चढून जाणारे...इतके बेवडे @) आहेत इथे..
त्या साठी आपण कशाला प्यायला हवी.. 8>
(दुसर्‍याच्या आणभवातून लिहणारा)केशवसुमार :B

ऋचा's picture

8 May 2008 - 11:17 am | ऋचा

संपतो सोडा कधी ,संपते पाणी कधी
चालते तेव्हा मला, वारुणी कोरी कधी

ती कधी नसलीच तर मार्ग मी हा काढतो
खूप येतो वास पण चालते फेणी कधी

तुम्ही खरच छान करता विडंबन पण असं वाट्ट की तुम्हाला फारच आवड्ते का ????

केशवसुमार's picture

8 May 2008 - 11:24 am | केशवसुमार

तुम्हाला फारच आवड्ते का ????
कोण?
(बुचकळ्यात) केशवसुमार

ऋचा's picture

8 May 2008 - 11:27 am | ऋचा

विडंबनाच्या विषयाची नायीका :)

केशवसुमार's picture

8 May 2008 - 11:41 am | केशवसुमार

शिव शिव..
काय बोलताय काय ऋचाताईईई.. :O छ्या छ्या...मी नाहि त्यातला... [(
(लिंबाच्या रसात पाणी घालून पिणारा) केशवसुमार :B

धमाल मुलगा's picture

8 May 2008 - 11:45 am | धमाल मुलगा

=))

लय भारी!

(बुचकळ्यात) हे मी 'बुचक' 'ळ्यात' असं वाचलं आणि हा काय नवा सबुद बॉ म्हणून मीच (बुचकळ्यात) पडलो :))

-(बुचक ळ्यात) ध मा ल.

सत्या's picture

8 May 2008 - 11:32 am | सत्या

मास्तर मस्तच कि राव!

धमाल मुलगा's picture

8 May 2008 - 11:46 am | धमाल मुलगा

मास्तर?

केसुशेठ..मास्तर? तद् माताय...ही काय भानगड आहे हो केसुशेठ?

केशवसुमार's picture

8 May 2008 - 11:56 am | केशवसुमार

मला काय विचारतो :W
त्या सत्या काम जबालीला विचार :-C .. मला कै ला मास्तर म्हणून राहिला बे? :?
(पुन्हा बुचकळ्यात) केशवसुमार :SS

कय नाय ल बाल्या.......!!! भानगड करायला तु कय बाय नाय....!!

सत्या's picture

8 May 2008 - 2:33 pm | सत्या

काय मास्तर बुच कळ्यात सर्खे पडु नका!
म्हण्जे मास्तर हा एक शब्द हाय. तो आपल्याकडे आसाच वापरला जातो.!!

सत्या's picture

8 May 2008 - 2:37 pm | सत्या

हात तेच्या....................
डाव विस्कटला...............

संपतो सोडा कधी ,संपते पाणी कधी
चालते तेव्हा मला, वारुणी कोरी कधी

लड बापू!!!!!!!!!!!!!!

नारदाचार्य's picture

8 May 2008 - 2:43 pm | नारदाचार्य

पार 'आऊट' झालो आम्ही. मूळ रचना (म्हणजे विडंबन, फणसे यांची नव्हे. ती अद्याप वाचलेली नाही) व्हिस्कीची आणि प्रतिसाद चाखण्यासारखे.