दर्या किनारी फिरत होतो काल रात्री
किंचित सा चिंतितच होतो मी
कुणास ठाउक का?
एकटाच होतो मी..
न पुढे कोणी, न मागे
सावली होती सोबत न माझी
इतुका एकटा मी...
ऐकत होतो लाटांचे गीत
पायाखाली तारकांच्या वाटा
रात्री च्या अंधारात
असा काही बघत होतो लांब
जणु दिसत होते सगळे - लपलेले
नव्हे......हरवलेला मी !!!
खरं सांगु?
मज आठवता मी
तु ही आठविलीस मला
न आठविली असतीस तर
कुठे आदळल्या असत्या त्या लाटा?
आहोटी चा भरती नं धरला होता
हाथ जाता जाता...
त्या थंड-ओलसर हवे नं
नुसता गार पडलो होतो मी...
जरुरीचेच होते तसे म्हणा...
इतुके भाजले होते मनास
त्याचा गुन्हेगारच ठरलो होतो मी..
चालत होतो पुढे...
अन मागे पाउले उमटत होती
दूर वर दिप-स्तंभा ची
जोतही चमकत होती
दिसेनासे झाले मज अन
निघेनासे झाले तिथून
पुसत होते ठसे माझे
खोडकर लाटा जाता जाता...
प्रतिक्रिया
3 Mar 2011 - 10:34 am | कच्ची कैरी
तुम्ही त मस्त समुद्रकिनार्याची सैर करुन आणलीत .
3 Mar 2011 - 12:14 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
सर्व कडव्यांचा शेवट करतांना धक्कातंत्राचा वापर छान केला आहे.
विशेषतः
ही कल्पना तर अफलातुनच...
3 Mar 2011 - 1:28 pm | गणेशा
सुंदर कविता