जिद्द जगण्याची

निनाव's picture
निनाव in जे न देखे रवी...
2 Mar 2011 - 11:16 am

जुन्या चाळी च्या तिसर्‍या मजल्या वरची ती त्याची खोली!
लाकडी जिना जातो नं?..त्याला लागून असलेली..
दोन वयातल्या मुली त्याला..माय नसलेल्या
तारुण्याचा आवाज लपवत...
ओल्या भिंत्यांच्या मागे जगण्याचा प्रयत्नात....
तिन कोणात मिळून चौकोनी कुटुंब..

दिवसा वळते अगरबत्ती, होतात शिकवण्या
अन मेहंदी चे वर्ग
रात्र पिळते दोरा-फॉल-पिको वर
येता घरी मग,
त्याची हाडे वाजतात मधेच,
टेकताच त्या लुळ्या कॉट वर

जिद्द जगण्याची अधिकच स्पष्ट होते दर रात्री
'गीत-माला' -ऐकता रात्र मग होते लयबद्ध

त्या १०० वॉट च्या पिवळ्या प्रकाशातही मग..
तरूणाई कशी रंगीत स्वपन सारे बघते...
भरलेल्या बेड वरचा सामान सारुन बाजुला
दुमडलेल्या अंगाने
'त्याची 'वाट बघत तरुणाई निजते..

चार कोपरे असलेल्या खोलीत,
प्रत्येक कोपरा एका मनाचा - आपलासा
लाकडी जिन्याचा आवाज येऊनही...नाहीसा...
अन सवय अशी मग वेदना रोजची हरते...

कविता

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

2 Mar 2011 - 11:43 am | मिसळलेला काव्यप्रेमी

भन्नाट.....भन्नाट.....भन्नाट.....
सल दिसतेय.....

प्रकाश१११'s picture

2 Mar 2011 - 12:12 pm | प्रकाश१११

परीकथेतल्या राजाला अनुमोदन