रात काळी, झोप जाळी, काय भाळी उमगेना ...
नभ दाटले, भर सकाळी, काय भाळी उमगेना ...
मज काय भाळी उमगेना ...
विरली वाणी, सरली गाणी, सुकली रातराणी उमगेना ...
जाळत जाती, खोलवर मज, तुझ्या आठवणी उमगेना ...
मज काय भाळी उमगेना ...
जुनीच वाट, जुन्याच खुणा, का छळती पुन्हा उमगेना ...
फिरवी पाठ, ओळखीची लाट, वागणूक निराळी उमगेना ...
मज काय भाळी उमगेना ...
साठवले बळ, फाडले उर, पण का? न फुटले सूर उमगेना ...
फिरोनी आलो, त्याच समेवर, का? न पडली टाळी उमगेना ...
मज काय भाळी उमगेना ...
मज काय भाळी उमगेना ...
प्रतिक्रिया
1 Mar 2011 - 12:15 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
छानच आहे कविता....
1 Mar 2011 - 3:09 pm | गणेशा
मला कविता खुप खुप आवडली ..
२-३ दा वाचली विशेषता पहिले २ कडवी खुपच आवडली ..
२-३ दा वाचताना खालील प्रमाणे वाचली गेली ती कडवी .. देतो .. बदल आवडले नसल्यास क्षमस्व
रात काळी, झोप जाळी, काय भाळी उमगेना ...
नभ दाटे, भर पहाटे, काय भाळी उमगेना ...
मज काय भाळी उमगेना ...
विरली वाणी, सरली गाणी, सुकली रातराणी उमगेना ...
जाळत जाती, खोलवर रुतती, तुझी आठवण उमगेना ...
मज काय भाळी उमगेना ...