काय मग यंदा लाडु आहेत का
जे ते विचरु लागले
आई ला म्हंट्ले सगळ्यांनाच कसे
एकदम वेड लागले
आता कुठे अभ्यास संपला
डोके हलके झाले
इतक्यातच सगळ्यांना लाडुचे वेध लागले
आई फक्त हसली उत्तर नाहि काही मिळाले
एके दिवशी फोन आला मुलीला बघायला येतो
बाबांचे तयार होण्याचे फर्मान आले आणि डोकेच फिरले
तीथे कांदे पोहे तयार झाले इथे साडीत मि अवघडले
रागा रगात चहा पोहे घेउन बाहेर गेले
नजरानजर होताच जणु विरघळुनच गेले
ते काहितरि विचारत होते
पण माझे शब्द फुटत नव्ह्ते
बैठक संपली पाहुणे गेले पण मी काहि बोलले नाहि
म्हणुन बाबा मात्र रागवले
मात्र होकार नजरेतुनच समजले होते तरी मन हुरहुरत होते
दुसर्याच दिवशि फोन आला आणि हवेत उडाले
आज मात्र आईच्या हसण्याचे अर्थ उलगडले होते
नव्या उंबर्याचे वेध मलाहि लागले होते
प्रतिक्रिया
28 Feb 2011 - 3:58 pm | अवलिया
अभिनंदन !
1 Mar 2011 - 7:13 am | स्पंदना
लाडु द्या लाडु !
1 Mar 2011 - 1:49 pm | गुड्डु
प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद
1 Mar 2011 - 2:03 pm | टारझन
गुड्डी चा लाडाने गुड्डु झालाय का ? :) असो .. लग्नाला बोलवा , आणि (किमान आमच्यासाठी ) टिपाडभर गुलाबजामं ठेवा :)
माझे आशिर्वाद आहेतंच !
- बुंदीलाडू