फुलपाखरू

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in जे न देखे रवी...
27 Feb 2011 - 7:37 am

नानाविध रंगांनी भरला
पुष्पसुगंधे साज बहरला
दवबिंदूंना लेऊनी सजला
आसमंत अमृते नाहला

फ़ूलपाखरे अहा नाचती
कणाकणाने मधू प्राशती
पराग प्रेमे वाटत सुटती
पुष्पावरुनी पुष्पावरती

मउ रेशमी झाल खुणावे
नारींगी पंखात झुलावे
घटकेसाठी शांत बसावे
चंचल हे भ्रमण विसरावे

बसुन मजेने पंख हलविले
फ़ुलपाखरू तिथे थबकले
लावण्याला फ़ुलही भुलले
उराउरी भेटण्या विसरले

जरा बागडून उडून जाई
फ़ुल अचलसे भुलुनी राही
भ्रमर अवचिते तेथे येई
नारींगी पदरात विसावी

फ़ूल येतसे भानावरती
क्षुधा उफ़ाळे आतुन वरती
आनंदे भ्रमरा अलिंगती
शोषुन जीवन, भूक शमविती

कविता

प्रतिक्रिया

नगरीनिरंजन's picture

27 Feb 2011 - 8:18 am | नगरीनिरंजन

"हा हंत हंत नलिनींगजउज्जहार" यातही भुंग्याचा जीव गेला आणि तुमच्या कवितेतही भुंग्याचा जीव गेला. पण पहिल्या वेळी रोमांचित झालो आणि दुसर्‍यावेळी शहारलो.

कविता आवडली ..
येवुद्या आणखिन