घर छोटे झालेय
गाव छोटे झालेय
शहर ....
देश....
हे जग ...!!
सगळे वितभर खोक्यात सामावून गेलेय
अगदी खूप वर्षापूर्वीची जाहिरात
खूप खरी झालीय आता
हे घर ....!
छोटेशे ...
नवरा बायको नि एकुलता एक मुलगा
बाप बर्याच वेळा टूरवर
नि आई जाते कामावर
हे कितीतरी वर्षापासून असेच चालू आहे
टाईम टेबल कधीच बदलत नाही ह्यांचे
रविवारची सुट्टी सोडून हे कधीच घरात नसतात
त्यांचा छोटासा गोंडस मुलगा
मोठा कधी झाला हे त्यांचे त्याना कधीच कळले नाही
आजकाल
घरी कोणी नसले तर हा सायबर क्याफेत असतो
सध्याकाळी कट्ट्यावर
मित्रांच्या गराड्यात
स्वताला हरवून घेतो
घरी कधी एकटा
वाट बघत बसतो
काय करणार भूक लागली
काहीतरी चायनीज खाऊन येतो
आजकाल त्याचे आई बाबा त्याच्या मनात काय चाललेय
हे फेस बुकावर बघतात
आज दुपारी कुत्रा चावल्याचे आईला
त्याच्या फेस बुकावर दिसले
डाक्टरकडे जाऊन
इंजेक्शन घेतले
हेही फेसबुकवर दिसले
कौतुक वाटले तिला मुलाचे भरपूर ...!!
काही झाले तरी तो फेसबुकवर सांगतो
डोके दुखतेय
डोळे आलेत
मित्र भेटला
हे फेसबुकावर
त्याचा जन्मदिवस फेस-बुकावर
ईमेल द्वारे तुम्हाला जागे करतो
तुम्हीपण त्याला फेस बुकवर शुभेच्छा देता
आई बाबा कामावर
अन पोरगे फेसबुकावर
फेसबुकावर त्याला खूप मित्र मिळालेत
मैत्रिणी सुद्धा डझनभर
अगदी जीवाभावाचे झालेत सगळे
अगदी मनातले बोलतात
मनापासून प्रेम करतात ......!
आजकाल फेस बुक खरां मित्र बनलाय त्याचा
जिवाभावाचा सखा ..!
प्रतिक्रिया
25 Feb 2011 - 10:04 am | पियुशा
+१
सद्य स्थिति आहे हि!
25 Feb 2011 - 10:07 am | हरिप्रिया_
अगदी खर..
:(
25 Feb 2011 - 10:10 am | अमोल केळकर
खर आहे
अमोल
25 Feb 2011 - 10:58 am | कच्ची कैरी
मी तर अजुन फेसबूकचा फेसही बघितला नाहीये !बाकी कविता एकदम मस्त !
26 Feb 2011 - 4:27 pm | पर्नल नेने मराठे
ही नानाची बहिणच दिसतेय ;)
25 Feb 2011 - 11:28 am | गणेशा
नेहमीप्रमाणे कविता मस्त
28 Feb 2011 - 3:20 pm | टारझन
तुमचीच प्रतिक्रीया शोधत होतो +)
25 Feb 2011 - 3:42 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
असेच म्हणतो...
25 Feb 2011 - 4:13 pm | निनाव
सत्य स्तिथी. आज कल असेच झाले आहे. फेस बुक निजी जिवनात नको तितुकी शिरली आहे.
28 Feb 2011 - 3:08 pm | अशोक७०७
प्रतिक्रिया फेसबुकवर पहा