तारकांच्या गर्दित हरविले किती तारे
अल्प, अगणित, असावेत किती सारे
एक तुटला आजही... कळाले?
मावळला तो..त्याच्याच कक्षेत...
न सांगता...बोलता न त्यास यावे!
न भय, न मोह, न सुख, न दुक्ख
पलीकडे तो..प्रवास सपंवून गेला
सुटला...? कि आडकला पुन्हा?
चमकेल का तो पुन्हा..चमकेलही
आम्हा आता त्याची उणीव छळे!!
प्रतिक्रिया
25 Feb 2011 - 11:15 am | प्रकाश१११
निनाद -छानच कविता !!
25 Feb 2011 - 11:17 am | कच्ची कैरी
मस्त आहे कविता !शॉर्ट अॅन्ड स्वीट !
25 Feb 2011 - 11:22 am | गणेशा
कविता मस्तच
"तारकांच्या गर्दित हरविले किती तारे
अल्प, अगणित, असावेत किती सारे"
या दोन ओळी सोडुन बाकी कविता म्हणजे आपल्या गृप मधील कोणासाठी तरी ही कविता आहे असे वाटले..
छान एकदम