जाग!!

निनाव's picture
निनाव in जे न देखे रवी...
25 Feb 2011 - 1:58 am

काळी जाड रग घेउन पसरलेली ती
म्हणते कशी, येशील का निजायला
निजलोच कुठे मी, मग एका कुशीवर
सावरत, मोजत बसलो त्या चुरघड्या

आंथरुण सरकले, पांघरुण निसट्ले
उघडाच मी मग उजेडास सापडलो
उठता धडकलो मग, चालता धडकलो
चोळता डोळे, कोण पुढे बघायला...

वाटा गेल्या कामावर, पाणी नळाला
प्रश्नच पड्त गेले अंतरी चे जगायला...
शोधत बसलो मग बंडी, शर्ट, झब्बा
अन विसरलोच आरसा बघायला...

ती दिसली पुन्हा मज मोहक, तरुण
सरसावली मज ती मिठीत घ्यायला
उशी खाली होती लज्जा, निडर मी
गुंतलो मग तिला उलगडायला...!!

कविता

प्रतिक्रिया

प्रकाश१११'s picture

25 Feb 2011 - 10:11 am | प्रकाश१११

निनाद -

काळी जाड रग घेउन पसरलेली ती
म्हणते कशी, येशील का निजायला
निजलोच कुठे मी, मग एका कुशीवर
सावरत, मोजत बसलो त्या चुरघड्या

छान लिहिलेय. आवडले