जीवणाच्या भावगर्दित मेहमान अस्तित्व माझे
बसू कसा पंक्तीत तुमच्या, बदनाम अस्तित्व माझे
निसर्गाच्या चक्रात अडकले सूर्य,चंद्र,तारे
भावनांच्या बाजारात, बंदिवान अस्तित्व माझे
घायाळ नजर शोधती, ओळखीच्या खानाखुना
आसवांच्या गावात, गुमनाम अस्तित्व माझे
माणसांच्या कल्लोळात हरविले मनाचे स्वैर बंध
भासांच्या ताटव्यात, सुनसान अस्तित्व माझे
सुगंधाच्या मायाजाळात अडकली फ़ुलपाखरे
झुगारले नभाला असे, बेगुमान अस्तित्व माझे
रात्रीस, सांजवेळी साद घालतो जख्मी सूर्य
झाकोळले अंधारात, दीपमान अस्तित्व माझे
छप्परविरहीत घरट्यात उभ्या असंख्य भिंती
नभांकणात विखुरले, बेभान अस्तित्व माझे
स्वरविरहीत शब्दांचे उठते निशब्द काहूर
विचारांच्या भोवर्यात अंतर्धान अस्तित्व माझे
-------- शब्दमेघ
प्रतिक्रिया
24 Feb 2011 - 8:07 pm | स्पंदना
गणेशा अतिशय छान जमलीय गझल. विषेशतः
छप्परविरहीत घरट्यात उभ्या असंख्य भिंती
नभांकणात विखुरले, बेभान अस्तित्व माझे
या ओळी आवडल्या
24 Feb 2011 - 8:31 pm | प्रकाश१११
गणेशा -मस्त गझल
घायाळ नजर शोधती, ओळखीच्या खानाखुना
आसवांच्या गावात, गुमनाम अस्तित्व माझे
माणसांच्या कल्लोळात हरविले मनाचे स्वैर बंध
भासांच्या ताटव्यात, सुनसान अस्तित्व माझे
आवडली भन्नाट ..!!
24 Feb 2011 - 10:27 pm | आत्मशून्य
या पध्दतीच्या रचना खरच अजून येऊद्यात. "शब्दमेघ" हे नाव खरोखर सार्थ केलेस.
25 Feb 2011 - 12:47 am | रमणरमा
सुंदर !!
25 Feb 2011 - 10:49 am | हरिप्रिया_
मस्त...
25 Feb 2011 - 12:09 pm | गणेशा
धन्यवाद
25 Feb 2011 - 4:11 pm | निनाव
मस्त रचना आहे. खूप आवड्ली.