समजत नाही..

गवि's picture
गवि in जे न देखे रवी...
24 Feb 2011 - 7:58 pm

जांभुळ संध्या गडद निळाई..
कुपात बूर्ज्वा मंडूक राही..
वरील काही समजत नाही..

चक्षु मुमुक्षु आर्त प्रवाही..
सुके धुके परि वखवख काही..
वरील काही समजत नाही..

प्रसव वसव किती वेणा साही..
पार्थिव देही गांडीव वाही..
वरील काही समजत नाही..

जूनून बोसा इश्क तबाही..
शब्द घोळ अन काही बाही..
वरील काही समजत नाही..

कलाविनोदशब्दक्रीडा

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

24 Feb 2011 - 8:05 pm | स्पंदना

गवी गेले कामातुन.
तुम्ही विमानातच बरे होतात हो! खाली उतरल्या बरोबर जालंदर बाबांनी दिली ना दिक्षा?

अवांतरः शब्द बंबाळ काव्य अतिशय सुरेख जमलय.

धमाल मुलगा's picture

24 Feb 2011 - 8:33 pm | धमाल मुलगा

आयच्यान १००१% वेळा सहमत गं अपर्णा!

आता काही खरं नाही गविंचं! आता दिसला शब्द की फिरव चरकातून, दिसला शब्द की फिरव चरकातून.... नुसतं भुस्काट पाडणार हे सुध्दा!

अवांतरः शरदिनी, अगं आहेस कुठं? बघ तुला कांपिटिशन आली..आता तुझ्या व्यग्रतेतून थोडा वेळ काढून दर्शन दे भक्तांना. ;)

ओ नानबाऽऽ.. ह्या शरदिनीलाही घ्या बरं जरा डोक्यात तिडीक आणणारे मिपाकरमध्ये. :D

पैसा's picture

24 Feb 2011 - 8:11 pm | पैसा

शरदिनीबै सारखं एखादं फक्कड नाव तरी घ्यायचं होतं! गगनविहारिणी वगैरे....

बरेच शब्द खरेच कळत नाहिये ...
आता कवीनेच वरील कळत नाहि म्हंटल्यावर .. बिच्चार्‍या वाचकाने गप्पच बसावे ..

अवांतर : गगनविहारी यांची कविता म्हंटल्यावर पहिलीच की काय असे वाटुन आता पाहिले, क्लिक करते पर्यंत असे वाटत होते की ... विमान प्रवासावर तर नाहि ना

विमानाचे मनोगत : (असेच टाईमपास)

जांभुळ संध्या गडद निळाई.. (मस्त शब्द आहेत हे तुमचे )
विमानाची या मस्त सफारी ..
कुणा कसे हे समजत नाही

हवा निराळी मस्त प्रवाही
ढगांचे धुके मस्त लहरी
कुणा कसे हे समजत नाही

इकडुन तिकडे कीती उडावे
इंजीनाचा धुराडा होई
कुणा कसे हे समजत नाही

बसलेत सारे .. मस्त विमानी
धावपट्टीची वेगळीच कहाणी
कुणा कसे हे समजत नाही

--- गगनविहारींचे विमान

ओ हो!
गणेशा? विडंबनावर काव्य? उलटा प्रवास.

इमान किंवा हवाई अड्डा या पैकी नक्की काय गंडल ? ;)
कॄ.ह.घे. ;)

प्रकाश१११'s picture

24 Feb 2011 - 8:44 pm | प्रकाश१११

गगनविहारी -खूप मस्त वाटले .छान. खूप जुनी आठवण झाली .
लहान होतो.बाबा सरकारी कचेरीत त्यांचे ईंग्रजी अक्षर बघून
मी त्यांनीच आणलेल्या कागदाची छान वही करून तसेच काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न केला
काम करणारा रामाने ती वही बघितली .दादाचे कामाचे असेल म्हणून बाजूला ठेऊ लागला
मला मोठी गमत वाटली हमभी कुछ कामके
आपले वाचून जुनी आठवण चालवली. मजा आली. आपण मात्र खूप छान लिहिले. वाटले.
जुन्या आथ्व्निबद्दल खूप खूप आभार

शरदीनीतैंना घेउन गेल्ता का काय इमानातुन फिरवायला?

सुरेख शब्दखेळ ... शब्दकळा !!!

..... कविता थोडीफार समजते आहे असे वाटते .

क्रमशः आहे का ?