त्याने फेस बुकावर त्याचे नाव दाखल केले आहे
पण फोटो नाही टाकला
पासपोर्ट साईझ ..!!
एकतर त्याच्याकडे फोटोच नाही
असला तरी तो खूप जून वाटतोय
खराब चेहरा
थोडासा चकणा डोळा
डोक्यावरचे उडालेले केस
मस्त टक्कल
पण तरीही नेटवर एक आकृती छापलीय गेलीय
एक नकाशा उमटलाय
शरीर अववयाचां ...!!
बिन चेहर्याचा
तो खूष आहे त्या फोटोवर
बिन चेहर्याचा फोटो
त्याला खरेच मस्त वाटतोय
त्याचे सुख
त्याचे दुख
तो शब्दातून मांडू लागलाय
एक निरागस कोवळेपण
आभाळातील उधळलेल्या मुठभर चांदण्या
नि चंद्राचा पिवळा प्रकाश
मनात काहूर माजवतात
तुमचे नाव पण नाही, नि फोटोचां नकाशा ..?
नकाशाचा फोटो बघायला बरे वाटते बघा
त्याने असाच नकाशाचा फोटो
टांगून ठेवायला लिहून ठेवलय
त्याच्या पश्चात
त्याच्या पोराना
नकाशा बघून मित्र म्हणतील
हे तुमचे बाबा कां ..?
बाबाचे चित्र तुम्ही रंगवू शकता
तुम्हाला हवे तसे
तशी सवलत
दिलीय तुम्हाला ....!!
प्रतिक्रिया
24 Feb 2011 - 8:00 am | नरेशकुमार
व्वा, नविन अकाउंट ओपन केले कि काय चेपु वर ?
कविता आवडली बरंका !
सवलतीचा किति बच्चे वापर करतील, अशी शंका आहे.
24 Feb 2011 - 8:23 am | नगरीनिरंजन
बिन चेहर्याचा
तो खूष आहे त्या फोटोवर
बिन चेहर्याचा फोटो
त्याला खरेच मस्त वाटतोय
छान कविता. पण यात करूण काहीही नाही असे वाटते. उलट या अफाट रेतीसारख्या पसरलेल्या विश्वात आपल्या टिचभर फोटोने आणि थेंबभर कर्तृत्वाने वाळूवर टिकाऊ रेघोट्या मारण्याचा प्रयत्न करणारे करूण वाटतात.
24 Feb 2011 - 8:28 am | निवांत पोपट
कविता एकदम मस्त! आवडली.
24 Feb 2011 - 8:32 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छान कविता...!
-दिलीप बिरुटे
24 Feb 2011 - 9:54 am | अमोल केळकर
मस्त :)
अमोल केळकर
24 Feb 2011 - 11:45 am | कच्ची कैरी
मस्त नकाशा आहे आय मीन मस्त कविता आहे
24 Feb 2011 - 7:11 pm | गणेशा
मस्त कविता
28 Feb 2011 - 1:47 pm | अशोक७०७
प्रकाशजी,
तुमचा फोटो बघू की. तरूण पणचा .
28 Feb 2011 - 2:14 pm | ५० फक्त
छान आहे कविता, आवडली. आता तुमच्या आधीच्या कविता काढुन त्या पण वाचतो.