ते अलवार नाजूक,तरल क्षण.... !!

प्रकाश१११'s picture
प्रकाश१११ in जे न देखे रवी...
22 Feb 2011 - 7:46 am

कशे होते ते क्षण ..?
तरल अनुभव ..
नाजूक क्षण..!
फिरून फिरून डोकावून
हरवून जातेय माझे मन
ते अलवार नाजूक तरल क्षण

खूप छान
मस्त देखणी
डोळ्यात भरून हरवून गेली
एकदम मनात जाऊन बसली
विसरून गेले ते मी पण

छान साडी
नाजूक साधी
नाकी डोळी
सुंदर सुंदर
हरवून गेले माझे मन
विसरून गेले सारे मी पण

त्या नजरेचा
स्पर्श मुलायम ...
हलके हलके
बावरून मन
आभाळातील शुभ्र ढग
मनास पिंजून ...
मनावरून फिरून गेले
ते अलवार नाजूक तरल क्षण

किती काळ उलटून गेला
छान दिवस हरवून गेले
निळ्य निळ्या आठवणीचे
अजून मला स्वप्न पडते
अजून मन धुंदावून...
आठवून मन व्याकुळ ..होते .
ते अलवार नाजूक तरल क्षण .......!!

शृंगारकविता

प्रतिक्रिया

कच्ची कैरी's picture

22 Feb 2011 - 10:59 am | कच्ची कैरी

वा मस्त नाजुक ,अलवार कविता आहे .

गणेशा's picture

22 Feb 2011 - 1:17 pm | गणेशा

छान

पाषाणभेद's picture

22 Feb 2011 - 4:24 pm | पाषाणभेद

माझ्या मनातलेच कसे लिहीले हो तुम्ही?

प्रकाश जि तुम्चे काहि खर दिसत नाहि जुन्या आथवानि जास्ति येतात तुम्हाला(तुम्चि बाय्को वाचते का हे?)
बाकि कविता छान आहे

फ्रॅक्चर बंड्या's picture

23 Feb 2011 - 1:27 pm | फ्रॅक्चर बंड्या

छान कविता...

मदनबाण's picture

23 Feb 2011 - 7:21 pm | मदनबाण

छान...