एक घर विकत घ्यायचे आहे ..!!

प्रकाश१११'s picture
प्रकाश१११ in जे न देखे रवी...
18 Feb 2011 - 7:54 am

खरेच एक घर विकत घ्यायचेय
एका कवीला
कोणी देईल का घर .?
छोटेशे चिमुकले सुंदर घर
कोठे मिळेल का घर?
उपनगरात देखील चालेल
कवीचे प्रेम जमलेय
नि तो लग्न करायचेय म्हणतोय
ती कबुल झाली आहे
तिने स्वीकार केलाय त्याचा
मनापासून
पण घर तर हवे आहे
कोठे मिळेल का घर ?

एका कवीला
घर हवे आहे
छोटेशे चिमुकले सुंदर घर
तो सजवणार आहे घराला
छोटीशी बेडरूम
एक स्टडी रूम
एक टेबल ,निळे कागद
नि एक मस्त पेन
एक आभाळ टांगून ठेवणार आहे छताला
खिडकीतून दिसावे एखादे झाड
नि मस्त आभाळ
पूर्ण चंद्र आंणी निव्वळ निवांतपण
असे मिळेल का घर त्याला
त्याचे छानसे स्वप्न आहे

पाउस पडताना तो तिलाच आठवतो
ती चक्क त्याला दिसू लागते
पावसाच्या थेम्बातून
ती अलगद उतरते
मस्त पावसासारखी झिम्म बरसते
छोटेशे चिमुकले सुंदर घर ...!!

त्याच्या मनात कसे स्वप्न फुलते
पाखरू होऊन कसे झुलते
पण घराची आठवण येताच ते चक्क फुटून जाते
एक साधेसे घर
त्याच्या शोधात तो
तो शोधतोय घर
कोठे असेल तर सांगा ..?
त्याला लग्न करायचेय
फुलासारखे तिला जपायचेय
पण त्यासाठी त्याला घर हवेय
सांगा कोठे स्वस्त मस्त मिळत असेल एखादे घर
तो आतुर झालाय
कोणीतरी पाठीशी उभा राहील देवासारखा
नि घर मिळवून देईल
तो वाट बघतोय
त्याला हवंय एक
स्वप्न फुलवायला घर
छोटेशे चिमुकले सुंदर घर ...!!

करुणकविता

प्रतिक्रिया

कच्ची कैरी's picture

18 Feb 2011 - 11:32 am | कच्ची कैरी

ह्या कवीला घर कुठे हवय्?मुंबईत हव असेल तर जरा कठीण आहे ह!

गणेशा's picture

18 Feb 2011 - 1:29 pm | गणेशा

कविता छान

आजानुकर्ण's picture

18 Feb 2011 - 1:35 pm | आजानुकर्ण

कवीच्या शेजारी आम्हाला घर नको बॉ.

टारझन's picture

18 Feb 2011 - 1:35 pm | टारझन

भाड्याणे पण मिळणार नाही !!

मदनबाण's picture

18 Feb 2011 - 1:36 pm | मदनबाण

छान कविता...