कैद होतो मी माझ्यातचं
बंदिस्त केले होते मीचं मला
गुदमरलो
दम कोंडला
मन-मेंदूने साद घातली मुक्ततेसाठी
स्वतःच स्वतःविरुद्ध बंड !!
पण ध्येयाने तुतारी फुंकली
मांड टाकली
उधळला घोडा
सिम्मोलंघन करायला!!
मीच माझ्यावर यल्गार केला
रक्त सांडले
जख्मा झाल्या
आणि मारला गेलो
मला बंदिस्त करणारा मी संपलो
आता उरलोय फक्त
मुक्त,
स्वच्छंद मी
घोडा परत उधळून लावायचा आहे
सूर्यास गिळायला
पृथ्वीची प्रदक्षिणा घालायला
हिमालय सर करायला
सौंदर्याचा आस्वाद घ्यायला
आणि माझ्यातला मी प्रगल्भ करायला...
प्रतिक्रिया
18 Feb 2011 - 7:20 am | मदनबाण
छान...