दाटलेले
काळवंडलेलं
भरून आलेले .... आभाळ
आसुसलेली
दाहलेली
रुक्ष झालेली .... धरणी
प्रतीक्षा करते आहे ती एखाद्या तरुणीसारखी
येईन 'तो'
सर्वांग चुंबेल 'तो'
दाह शमवेल 'तो'
सौंदर्य माझे टवटवीत खुलवेन 'तोच'
शेवटी आलाच 'तो'
सरसरत आला
अवखळपणा त्याच्या अंगातचं होता
हळुवार पणे बिलगला
मादक स्पर्शाने सौंदर्य न्याहाळले
मिठीत मोहर खुलवला
उन्मादात तिला बुडवून टाकले
'ती' शहारली...
बहरून गेली...
मोर होऊन नाचली
कोकिळेसारखी गायिली
लहान मुल होऊन बागडली
तारुण्याच्या आनंदात चिंब भिजली
दिवसांमागून दिवस लोटली
युगांमागून युगे
अव्याहत प्रेमाचा हा वर्षाव अजून असाच आहे
.... निरंतर....
प्रतिक्रिया
17 Feb 2011 - 2:14 pm | गणेशा
अतिशय सुंदर कविता ..
मनापासुन आवडली.
लिहित रहा.. वाचत आहे
25 Apr 2011 - 8:24 am | अभिषेक९
धन्यवाद...