एकच प्याला आज रिता झाला-भाग ४

मनराव's picture
मनराव in जे न देखे रवी...
16 Feb 2011 - 6:58 pm

एकच प्याला आज रिता झाला-भाग ३

तुझ्या आठवणीत आता ६ पेग झाले
तुझे गुण गान गायचेच राहिले
ह्यापुढील पेग तुझ्यासाठीच भरले
एकच प्याला आज रिता झाला॥२०॥

तुझा समजुतदारपणा मला आवडतो
मी स्वत: तसं व्हायचं ठरवतो
पण तुला पाहिल्यावर भान विसरतो
एकच प्याला आज रिता झाला॥२१॥

तुझी नातं जपण्याची कला भन्नाट आहे
तुला आपल्या नात्याची जाण आहे
तुझ्यात सद्गुणांची खाण आहे
एकच प्याला आज रिता झाला॥२२॥

तु आपल्या सहजिवनाची स्वप्न रंगवतेस
मला तुझ्या ह्र्दयात अढळ स्थानी बसवतेस
मुलांगत हट्ट करुन मला हसवतेस
एकच प्याला आज रिता झाला॥२३॥

वसे सरस्वती तुझ्या वाणीत
जसे खळखळे पाणी नदीत
नसे तुझ्यासम कुणी या भुमित
एकच प्याला आज रिता झाला॥२४॥

तुझा प्रेमावर विश्वास आहे
माझी तुझ्यावर श्रद्धा आहे
पण तुला दुनियेची फिकिर आहे
एकच प्याला आज रिता झाला॥२५॥

शाळा कॉलेजच्या गोष्टी ६-६ प्याल्यात सांगुन झाल्या
तुझ्या...अरे १२ झाले तरी अपुर्याच राहिल्या
म्हणुनच ह्यापुढील मधुसरिता तुझ्यासाठीच वाहिल्या
एकच प्याला आज रिता झाला॥२६॥

क्रमशः

मौजमजा

प्रतिक्रिया

प्रत्येक वेळेस कसा रिप्लाय द्यावा म्हणुन
एक आपले असेच लिहिले ... नाही आवडले तर पुन्हा संपादित करतो ...

एकांगी टेबलावरती
नशिल्या प्याल्यासंगे सख्या
आठवणींच्या घोटासहित कसा
एकच प्याला आज रिता झाला ... ?

विस्कटेल्या सैरभैर नात्याचा
शब्दांच्या बेभान थव्यांचा
कुस्करलेल्या ह्या जीवनाचा कसा
एकच प्याला आज रिता झाला ... ?

---------- तुझी सखी

प्रीत-मोहर's picture

17 Feb 2011 - 7:43 am | प्रीत-मोहर

मस्त कविता
मस्त रेप्ल्य :)