लहानपणी ज्या ज्या लोकांनी आम्हाला मारहाण केली त्या सार्यांना सप्रेम सादर :
प्रेरणा अर्थात ही
पाठीखालच्या भागावर
बसलेले अनेक रट्टे
दात लहानपणी गोट्या खेळतांना पाडलेले,
क्रिकेटच्या स्टंपने फोडताना कधी,
तर कधी उगाचच.
बापाचे बाहु बुकलण्यासाठी आतुर झालेले.
चुकार आयशी मधूनंच ,
मार देत फुकणी परजत,
आणि
झाडणीने अंगभर सडकत
मारताना वेळेचे भान नसे.
अकलेचा कांदा असल्याच्या
सबबीवर मुस्काट फोडताना
पोटात मारलेल्या बुक्क्या अन
हाताला लागलेला
खडू अंगभर पसरत असे.
आता स्वतः बाप झाल्यावर
पोरासोरांना बुकलताना
उगाचच पाय कुठेतरी पाय मुरगळतो,
बोट-बीट सुजतं
आणि
मूव्ह लावल्याचा वास
जाता जात नाही.
प्रतिक्रिया
16 Feb 2011 - 4:11 am | Nile
ख्यॅ ख्यॅ ख्यॅ, ह्या तीनही मध्ये ही सर्वात जवळची वाटली. पण चौथं कडवं मात्र असंबंध वाटलं. ;-)
-कोडगा.
16 Feb 2011 - 4:51 am | गणपा
ये धत्तड तत्तड धत्तड तत्तड..........
बरेच दिवसांनी विडंबनाची माळ फुटलेली पाहुन मजा आली.
अडगळांनी ही आपले हात चांगलेच धुवुन घेतलेत. :)
16 Feb 2011 - 6:24 am | गुंडोपंत
अडगळ पुनरागमानाने अत्यानंद झाला आहे!
अशीच विडंबने येत राहोत.
या विडंबनाची ढब वेगळी आहे. अवलियांचे काव्य जसे भूतकाळात नेते आणि रमवते तसे हे विडंबन काहीसे अंतर्मुख करायला लावणारे आहे.
आवडले!
16 Feb 2011 - 8:14 am | अवलिया
कडक !
16 Feb 2011 - 1:54 pm | लवंगी
फक्कड
16 Feb 2011 - 9:21 am | राजेश घासकडवी
या कवितेच्या आशयाच्या एकतानतेमुळे एखाद्या काकतेलीय कृतीपेक्षा नीटशा व्हिस्कीचा आस्वाद येतो. तीही एकमाल्टिय, दगडावर ओतलेली. पहिल्या तीन कडव्यांत पद्यपेगांनी आलेली धुंदी चौथ्यात काहीशा आठवणीच्या उमाळ्यांप्रमाणे बाहेर येते.
16 Feb 2011 - 9:35 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
झकास ('अंदाज अपना अपना'मधला आमिर म्हणतो तसं!)
बाकी आमच्या अटेंशन सिकींगमुळे तुमच्या आयडीवर उगाच हल्ला झाला.
16 Feb 2011 - 7:26 pm | पैसा
अदितीच्या अडगळीच्या उल्लेखामुळे आठवण झालीच होती, की अवलियांचं पुढचं सावज अडगळ ही असू शकतात, तेवढ्यात "एका समृद्ध अडगळीतून आलेलं" "नाट्यमय" विडंबन पाहून अत्यानंद जाहला! शेवटच्या कडव्यात दिलेली कलाटणी तर लाजवाब!
16 Feb 2011 - 8:55 pm | श्रावण मोडक
बाप आहात!!!