काही मस्ट वॉच सीन्स...

अंतु बर्वा's picture
अंतु बर्वा in जनातलं, मनातलं
15 Feb 2011 - 10:31 am

नमस्कार मिपाकर्स

आज चेपु वर आपल्या सनी पाजींचा जीत चित्रपटातला डान्स कुणीतरी अपलोड केला आणी ते पाहुन डोळ्याचं पारणं फिटलं. आणी आत्तापर्यंत पाहीलेले सर्व विडियोज आठवले... तर मंडळी, ही घ्या लिस्ट ऑफ मस्ट वॉच सीन्स ऑन तुनळी...

१. पहिला क्रमांक पटकावलेला आहे या पठ्ठ्याने. मोस्ट ऑफ दी मिपाकर्स नी या डान्सबद्दल मिपावर आधी चर्चा केलेली आहेच. तरी आमच्याकडुन या डान्सर ला, "क्या बात, क्या बात, क्या बात..."

२. दुसर्‍या क्रमांकावर आहेत श्री भारत कुमार. या चित्रपटाचे डाय्लॉक ऐकुन वाटतं की त्या वर्षाचं बेस्ट डाय्लॉक रायटिंगच बक्षीस यालाचं मिळालं असणार.

३. तिसरा क्रमांक आहे या रेपोर्टर महाशयांचा. ज्या पोटतिडिकेने तो ही न्युज कवर करायचा आटापिटा करतोय त्याला तोड नाही.

४. यानंतर नंबर आहे वीरुचा... कांती शाह नामक एका महान दिग्दर्शकाच्या हातुन घडलेल्या लोहा या चित्रपटातील हा सीन. हा बघुन आमच्या रजनीकांतलाही इन्फीरेऑरीटी कॉम्प्लेक्स यावा.

५. यानंतर हा सीन बघा. या सीनचा जो कुनी लेखक आहे त्याला कोपरापासुन सादर प्रणाम...

६. आता नंबर आहे कांती शाह च्या अजरामर कलाकृती चा. गुंडा... एखाद्या संध्याकाळी चार्-पाच टाळकी जमवावीत, २-३ पेग होउ द्यावेत आणी मग हा सिनेमा लावावा. काहींना अगदीच सोसवणार नाही हा सिनेमा, पण म्हणुनच २-३ पेग टाकुन टवाळ्या करण्यासाठी हा सिनेमा बेस्ट...

७. नेक्स्ट आहेत तुमचे आमचे आवडते मिथुनदा... यात ते नेमकं कराटे करतायत की ताय्क्वांदो मिक्स आहे की वेगळच काही आहे रामजाने..

बास आता इथे थाबतो... नाहीतर जास्तं पांचटपणा केला म्हणुन वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळायच्या... :-)

रामराम मंडळी...
-अंतु

विनोदमौजमजाआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

15 Feb 2011 - 11:03 am | स्पंदना

हसता हसता आपण स्वतःला इतक जोरात मारुन घेतो हे आज पहिल्यांदा समजल मला. किती वेळ हसतेय. पहिल गाण माहित होत ( टारझण कृपा) पण बाकिचे ही अगदी त्याच तोडीचे निघाले, मिथुनदाना मला वाटतय अस्सल नाग चावला असावा असा माझा एक कयास!!

मस्त आवडल. आण्खी भर घातली तर लय भारी!!

रंगासेठ's picture

15 Feb 2011 - 11:09 am | रंगासेठ

खतरनाक सीन्स..एकापेक्षा एक.. अफलातून. आत्ता 'गुंडा' चित्रपट पाहायलाच हवा. :-)

अविनाशकुलकर्णी's picture

15 Feb 2011 - 2:12 pm | अविनाशकुलकर्णी
मनराव's picture

15 Feb 2011 - 2:46 pm | मनराव

एक नंबर..............बोण्डांच्या जेम्सला पण फेफरं येइल हे पहिल्या वर............

मी-सौरभ's picture

28 Sep 2012 - 11:00 pm | मी-सौरभ

जनमनोरंजनार्थ

एकुजाधव's picture

23 Oct 2012 - 11:32 am | एकुजाधव

दिसत नाही.