विनोद.............

पियुशा's picture
पियुशा in जनातलं, मनातलं
9 Feb 2011 - 1:02 pm

एक मारवाडी माणूस आय. सी. यु .मध्ये शेवटचा श्वास घेत होता
श्वास घेताना त्याने बायकोला विचारलं तू माझ्याजवळ आहे का ?
ती म्हणाली ;- "होय स्वामी " नंतर त्याने आपल्या भावाला आवाज दिला "सोन्या तू माझ्याजवळ आहे का?
तो म्हणाल हो दादा मी तुझ्याजवळच आहे
नंतर त्याने आपल्या मुलाला आवाज दिला बिट्टू ......... तू पण माझ्याजवळ आहे का?

मुलगा म्हणाला हो पप्पा मी पण तुमच्याजवळ आहे
ते ऐकून मारवाडी चिडला आणि म्हणाला " हरामखोरानो तुम्ही सगळे इथे थांबला दुकानावर कोणाला बसवलं ?
:)

एकदा एका शेतकर्याने शेतात बुजगावण म्हणून रजनीकांतचा फोटो लावला आणि काय आश्चर्य झाले सर्व पक्ष्यांनी धान्य न्यायचे सोडून मागील वर्षी नेलेले धान्य परत आणून दिले
:)

एक टोपी बेचनेवाला पेड के नीचे आराम कर रहा था ,के अचानक कुछ बंदर उसकी टोपिया उठाकर ले गये, और अपने सर पर पेहन ली
टोपी वाले ने देखा ,अब क्या करे?
उस्से अचानक अपने दादा कि सुनाई कहाणी याद आयी, तो उसने अपनी टोपी उठाकर नीचे फेक दि ये देखकर एक मंकी नीचे उतरा.
टोपी उठाई और उसके कान के नीचे बजा कार बोला ,
"साले तुझे क्या लागता हे बे , ये कहाणी हमारे दाद्दू ने हमे नाही सुनाई ?"
:)

विनोदआस्वाद

प्रतिक्रिया

माझीही शॅम्पेन's picture

9 Feb 2011 - 1:07 pm | माझीही शॅम्पेन

:)

किती हळवे केलेस पियुषा ... धाय मोकुन रडतोय ऑफिस मधे :( :(
डोळे पाणावलेस !!

- पाणेषा

नन्दादीप's picture

9 Feb 2011 - 1:09 pm | नन्दादीप

एकदा टाटा मोटर्स चे काही अधिकारी "नॅनो" बद्दलचा प्रतिसाद पाहण्यासाठी पुण्यात सर्व्हे घेत असतात. फिरत फिरत ते सदाशिव पेठेत तात्यांच्या घरी येतात.

अधिकारी : नमस्कार ! आमच्या "नॅनो" बाबतीत आपले काय मत आहे ?
तात्या : मला तुमच्या ह्या "न्यानो" गाडीचं नाव अगदी सार्थ वाटतं..
अधिकारी : का बरं ?
तात्या : तुमचे सेल्समन म्हणतात " न्या ".. आणि आम्ही म्हणतो " नो " !

प्यारे१'s picture

9 Feb 2011 - 1:10 pm | प्यारे१

टारझन आणि पराच्या 'एक्स्क्लुझिव्ह' प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत.

- ( इ.१ली तु.फ तला) प्यारे

पियुशा's picture

9 Feb 2011 - 1:37 pm | पियुशा

टारझन आणि पराच्या 'एक्स्क्लुझिव्ह' प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत.

@प्यारे !

ते दोघे पन फार पोहचलेले आहेत (वर्च्या इयत्तेतले)
त्यान्चा नाद करायचा न्हाइ

(पियु, इयत्ता ,१ लि तुकडी फ)

नन्दादीप's picture

9 Feb 2011 - 1:11 pm | नन्दादीप

मल्लिकाकडे एक नवीन नोकर कामाला लागतो, त्याला सकाळी मल्लिका किचन मध्ये दिसते, ती मिक्सर चालवत असते,
नोकर : काय म्याडम काय बनवता आहात?
मल्लिका : काही नाही रे कपडे धुते आहे.

का? कधी? कशाला? केव्हा? कुठे?

llपुण्याचे पेशवेll's picture

9 Feb 2011 - 1:47 pm | llपुण्याचे पेशवेll

मारवाडी असा जातिवाचक उल्लेख मिपावर पाहून हृदय हेलावले. असो.

मारवाडी असा जातिवाचक उल्लेख मिपावर पाहून हृदय हेलावले. असो.

हलके घ्या :)

प्रचेतस's picture

9 Feb 2011 - 1:48 pm | प्रचेतस

एक पोरगं शाळेत जातं. त्याला मास्तर विचारतात
मास्तरः काय रे, काल शाळेत का आला नाहीस?
पोरगं : काल आमच्या कोंबडीने अंडे घातले.
मास्तर (रागावून): त्यात काय विशेष आहे?
पोरगं : तुम्ही घालून दाखवा.

आयचा घो,

पहिलि फ मधली पोरं - "'एक्स्क्लुझिव्ह' " हा शब्द वापरतात आणि तिसरी ड मधल्या पोरी मारवाडी, पक्षी रजनीकांत व माकडे यांचे विनोद सांगतात हे पाहुन आमच्या अघोर अंधकारमय अज्ञानाची जाणिव झाली.

तुमचा विनोद जरा सुधारुन -

"एक मारवाडी माणूस आय. सी. यु .मध्ये शेवटचा श्वास घेत होता
श्वास घेताना त्याने बायकोला विचारलं तू माझ्याजवळ आहे का ?
ती म्हणाली ;- "होय स्वामी " नंतर त्याने आपल्या भावाला आवाज दिला "सोन्या तू माझ्याजवळ आहे का?
तो म्हणाल हो दादा मी तुझ्याजवळच आहे .( खरा जोक इथंच आहे)
नंतर त्याने आपल्या मुलाला आवाज दिला बिट्टू ......... तू पण माझ्याजवळ आहे का?

मुलगा म्हणाला हो पप्पा मी पण तुमच्याजवळ आहे
ते ऐकून मारवाडी चिडला आणि म्हणाला " हरामखोरानो तुम्ही सगळे इथे थांबला दुकानावर कोणाला बसवलं ?

मुलगा म्हणाला, दुकानावर रजनिकांतचा फोटो लावला आहे. "

पियुशा's picture

9 Feb 2011 - 4:24 pm | पियुशा

गणपतीच्या घरी 10 दिवस रजनीकांतची स्थापना केली जाते.

धमाल मुलगा's picture

9 Feb 2011 - 4:28 pm | धमाल मुलगा

मुलगा म्हणाला, दुकानावर रजनिकांतचा फोटो लावला आहे. "

ही सुरुवात आहे

हे सगळ्यात हैट्ट आहे! :D

प्रकाश१११'s picture

9 Feb 2011 - 2:07 pm | प्रकाश१११

पियुषा म्याडम - मन हलके केलेत. टेन्शन खल्लास !!

अविनाशकुलकर्णी's picture

9 Feb 2011 - 2:13 pm | अविनाशकुलकर्णी

नवरा व् बायको बागेत बसले असताना एक् बाई येते व् बायकोस म्हणते..याच्या कडुन् आधि पैसे घे नंतर पैसे देताना हा फार् घासाघीस करतो...

अविनाशकुलकर्णी's picture

9 Feb 2011 - 2:17 pm | अविनाशकुलकर्णी

सुन= सासु बाई, हे आजुन आले नाहित, खुप वेळ झाला आहे.एखाद्या दुस~या मुलि बरोबर तर गेले नसतिल??
सासु=अग सटवे, तु नेहमी उलटा का विचार करते?अस पण होवु शकते,कि तो एखाद्या ट्रक खाली आला असेल..

परिकथेतील राजकुमार's picture

9 Feb 2011 - 2:17 pm | परिकथेतील राजकुमार

धन्यवाद पियुषा ह्या धाग्याबद्दल.

कालच आम्हा मित्रा मित्रांच्यात बालवाडीच्या आठवणींना उजाळा देणे चालु होते, आज पुन्हा एकदा तुझ्या लेखनाने त्या आठवणी जाग्या झाल्या.

असहकार's picture

10 Feb 2011 - 10:48 am | असहकार

+११+१११+

योगी९००'s picture

9 Feb 2011 - 2:52 pm | योगी९००

जंगलात वाघीण तिच्या बछडय़ांसोबत खेळत होती. बछडेही आता वयात येऊ लागले होते. शिकार वगैरे कळू लागली होती. पाण्यासाठी त्यांना गावाच्या जवळच्या भागात राहावे लागायचे. ते बसले होते. तिकडून एक माणूस जाताना बछडय़ांना दिसला. लहान-मोठय़ाला म्हणाला, ''दादा, हा माणूस बेअक्कल आहे. साला आपण इकडे असतो हे माहीत असूनही इकडून जातो आहे.’’
त्यावर मोठा बछडा म्हणाला, ''नालायकच असतात ही माणसं. येऊ दे त्याच्या नरडीचाच घोट घेतो. माणसाची जातच हरामी.’’ त्याचे बोलणे ऐकणारी आई वाघीण म्हणाली, ''अरे, अन्नाला अशी नावं ठेवू नये!’’

++++++++++++++++++

मुलगी- "आई, तू शाळेत शिकताना लैंगिक शिक्षण हा विषय अभ्यासाला होता का?’’
आई- ''नाही. का ग?’’
मुलगी- ''जाऊ दे, मग तुला त्याबद्दल काही माहितीच नसेल. तुला विचारून काय फायदा?’’

++++++++++++++++++

डॉक्टर (राजस)- काय रे, तुला न्युमोनियाचा त्रास कधी झाला होता का?
राजू- हो, एकदा.
डॉक्टर- कधी झाला होता?
राजू- त्याचे स्पेलिंग सरांनी विचारले तेव्हा.

++++++++++++++++++++

एक महिला आपल्या लहान मुलाला घेऊन एका समारंभाला गेली. तेथे एका गृहस्थाकडे बोट दाखवून तिचा मुलगा मोठय़ाने आईला म्हणाला. "आई, बघ या माणसाचे नाक किती फेंदरे आहे.’ ओशाळून ती महिला आपल्या मुलास म्हणाली, "बाळा, असे मोठय़ाने सर्वादेखत बोलू नये. अशा गोष्टी घरी गेल्यावर तू मला सांगू शकतोस, म्हणजे कोणीही तुझे बोलणे ऐकणार नाही आणि त्यामुळे ते दुखावणार नाहीत. थोडय़ा वेळाने एका स्थूल बाईकडे पाहून तो मुलगा आईला म्हणाला, "आई, घरी गेल्यावर हिच्याबद्दल आपण बोलणार आहोत मला आठवण कर.’

++++++++++++++++++++++

शाळेत डॉक्टरांनी विद्यार्थ्यांची उंची, छाती, पोट, कंबर, पाय वगैरे तपासल्यानंतर सर्वाना आपापल्या वर्गात जाण्याकरिता सांगितले. तरीही एक विद्यार्थी तेथेच उभा होता. डॉक्टरांनी त्याला जवळ बोलावून विचारले, "बाळ, तुला काही शंका आहे का?’
त्यावर मुलगा म्हणाला, "आता आम्हाला नवीन कपडे कधी शिवून देणार? ते सांगितलेच नाही.’

+++++++++++++++++++++++

माणिकराव शिंप्याच्या दुकानात शिरून म्हणाले, "ही माझी फूल पँट पाहा. तू सांगत होतास कपडा कमी पडेल म्हणून. त्या गल्लीतल्या शिंप्याने माझी फूल पँट शिवलीच, शिवाय त्याच्या तीन वर्षांच्या मुलाला सदराही शिवला.’’ शिंपी म्हणाला, "माझा मुलगा १२ वर्षांचा आहे.’’

++++++++++++++++++++++++++

एकदा एक शक्तिशाली महाराज मुंबईत दाखल झाले. त्यांच्यासमोर कुणाच्याही मनात पाप आले की तो भस्म होतो, असा बोलबाला होता. दर्शनाच्या पहिल्याच दिवशी दोघे भस्म झाले. त्याच रांगेत करिना कपूरही होती. तिचा नंबर आला. ती नमस्कार करायला वाकली आणि महाराज भस्म झाले!

+++++++++++++++++++++++++++

शामराव : बंडू कठोर श्रमास पर्याय नाही. प्रसिद्ध शास्त्रज्ञ एडिसन लहानपणी रात्री छोटय़ा दिवटीवर अभ्यास करायचा. वॅट म्युनिसिपालिटीच्या दिव्यावर अभ्यास करायचा लिंकन केरोसिनच्या दिव्यावर अभ्यास करायचा. नाही तर तू रात्रीचे १० नाही वाजले की ढाराढोर. काही बोध घे यांच्यापासून.
बंडू- बाबा ते ठीक आहे. पण मला एक सांगा, हे सगळे दिवसा काय गोटय़ा खेळायचे?

+++++++++++++++++++++++++++++

प्राणीसंग्रहालय पाहिल्यानंतर, त्या महिलेने तिथल्या मार्गदर्शकाला विचारले, ‘‘पण या बदकातली नर आणि मादी तुम्ही कसे ओळखता?’’
"आम्ही ओळखायची काय जरुरी आहे?’’ तो मार्गदर्शक म्हणाला, "त्या दोघांनी एकमेकांना ओळखलं की झालं!’’

+++++++++++++++++++++++

कच्ची कैरी's picture

9 Feb 2011 - 3:08 pm | कच्ची कैरी

हाहाहाहा..........................
मला फुसकुली,खसखस, बत्तीशी खो-खो ,खळखळाट सगळ काही एकदमच आल .

Pearl's picture

9 Feb 2011 - 3:17 pm | Pearl

माझी १ मैत्रिण US वरून सुट्टीला आली होती. मग १ दिवस चिक्कू आणायला फळवाल्याकडे गेली आणि bargain करण्याच्या गडबडीत तिने त्याला विचारले, "एका डझनात किती चिकू देणार?"
चिकूवाला तिच्याकडे पहातच राहिला :-) त्याला असा प्रश्न बहुदा पहिल्यांदाच कुणी विचारला असेल.

मनीषा's picture

9 Feb 2011 - 3:22 pm | मनीषा

एक टोपी बेचनेवाला पेड के नीचे आराम कर रहा था ,के अचानक कुछ बंदर उसकी टोपिया उठाकर ले गये, और अपने सर पर पेहन ली
टोपी वाले ने देखा ,अब क्या करे?
उस्से अचानक अपने दादा कि सुनाई कहाणी याद आयी, तो उसने अपनी टोपी उठाकर नीचे फेक दि ये देखकर एक मंकी नीचे उतरा.
टोपी उठाई और उसके कान के नीचे बजा कार बोला ,
"साले तुझे क्या लागता हे बे , ये कहाणी हमारे दाद्दू ने हमे नाही सुनाई ?"

हे जरा वेगळं वाटलं , कारण बहूतेक वेळा अशा बोध कथांमधला बोध विसरला जातो आणि कथा शिल्लक राहते ...

मी ऐकलेला एक विनोद ...

एका प्रसिद्ध शहरातील (बहूदा पुणे ) महिला मंडळाची सहल अमेरिकेतील नायगरा बघायला येते .. त्या धबधब्याचे सौन्दर्य , विशालता इ. बघून सगळ्या भाराऊन जातात.. त्यांचा गाईड त्यांना नायगरा विषयी माहीती देत असतो , सगळे वर्णन करून तो म्ह्णतो तुम्ही सगळ्या ५ मि शांत राहिलात तर पाणि खाली पडताना जो घनगंभीर आवाज होतो तो सुद्धा तुम्ही ऐकू शकाल ....

स्वैर परी's picture

9 Feb 2011 - 4:08 pm | स्वैर परी

वरील सारे विनोद वाचुन .. हसुन हसुन पोट दुखयला लागले आहे!
मज्जा आली!
अजुन एक जोकः

कॉलेजमध्ये सायकोलॉजीचा तास चालू होता. सरांनी प्रयोग दाखवण्यासाठी एका उंदिराच्या एका बाजूला केक आणि दुसऱ्या बाजुला उंदरीण ठेवली. उंदीर लगेच केककडे धावला...सरांनी केकच्या ऐवजी भाकरी ठेवली...उंदीर पुन्हा भाकरीकडे धावला... सरांनी अनेक पदार्थ बदलून बघितले...उंदीर प्रत्येकवेळी पदार्थाकडेच धावला.

सर : बघा, यावरून हे सिद्ध होतं की, काहीही झालं तरी या जगात भुकेपेक्षा महत्त्वाचं काहीही नाही.

बंड्या : पण सर...एवढे पदार्थ बदललेत तर एकदा ती उंदरीणही बदलून बघायची होतीत ना.
**********************************************************
गब्बर : कितने आदमी थे?

सांबा : दो सरकार!

गब्बर : मला गणित नाही येत.. २ म्हणजे किती?

सांबा : १ नंतर २ येतो.

गब्बर : मग २च्या आधी काय येतं?

सांबा : २च्या आधी १ येतो.

गब्बर : मग दोघं एकत्र का नाही येत?

सांबा : नाही..१ नंतर २ येतो, कारण १ पेक्षा २ मोठा आहे.

गब्बर : १ पेक्षा २ किती मोठा आहे?

सांबा : काय रे? गोळी मारायची तर मार एकदाची! तुम्हारा नमक खाया है, च्यवनप्राश नहीं!!

सविता's picture

10 Feb 2011 - 1:25 pm | सविता

>>>बंड्या : पण सर...एवढे पदार्थ बदललेत तर एकदा ती उंदरीणही बदलून बघायची होतीत न
>>>-----------------
>>>>सांबा : काय रे? गोळी मारायची तर मार एकदाची! तुम्हारा नमक खाया है, च्यवनप्राश नहीं!!

हे अफलातून होतं

नरेशकुमार's picture

10 Feb 2011 - 1:29 pm | नरेशकुमार

कॉलेजमध्ये सायकोलॉजीचा तास चालू होता. सरांनी प्रयोग दाखवण्यासाठी एका उंदिराच्या एका बाजूला केक आणि दुसऱ्या बाजुला उंदरीण ठेवली. उंदीर लगेच केककडे धावला...सरांनी केकच्या ऐवजी भाकरी ठेवली...उंदीर पुन्हा भाकरीकडे धावला... सरांनी अनेक पदार्थ बदलून बघितले...उंदीर प्रत्येकवेळी पदार्थाकडेच धावला.

सर : बघा, यावरून हे सिद्ध होतं की, काहीही झालं तरी या जगात भुकेपेक्षा महत्त्वाचं काहीही नाही.

बंड्या : पण सर...एवढे पदार्थ बदललेत तर एकदा ती उंदरीणही बदलून बघायची होतीत ना.

उंदराला जरा (माझ्या) मदतीची गरज आहे.

ब्रिटिश टिंग्या's picture

11 Feb 2011 - 8:42 am | ब्रिटिश टिंग्या

उंदरीणींचे एक्सपर्ट दिसता आपण! :)

गौरव व्यवहारे's picture

9 Feb 2011 - 4:42 pm | गौरव व्यवहारे

मस्तच..

प्राजु's picture

9 Feb 2011 - 11:07 pm | प्राजु

मस्त जोक्स आहेत. मजा आली.

मुलूखावेगळी's picture

10 Feb 2011 - 11:11 am | मुलूखावेगळी

SWOT BOOK filled by Santa.
1.Strength:My wife,Jeeto.
2.Weakness:Banta's wife, Preeto.
3.Oppurtunity: When Banta is on tour.
4.Threat: When I am on tour

एकदम मस्त आवडले
विशेषकरुन खाली जोक मला नविन होते खुप आवडले :

१. शाळेत डॉक्टरांनी विद्यार्थ्यांची उंची, छाती, पोट, कंबर, पाय वगैरे तपासल्यानंतर सर्वाना आपापल्या वर्गात जाण्याकरिता सांगितले. तरीही एक विद्यार्थी तेथेच उभा होता. डॉक्टरांनी त्याला जवळ बोलावून विचारले, "बाळ, तुला काही शंका आहे का?’
त्यावर मुलगा म्हणाला, "आता आम्हाला नवीन कपडे कधी शिवून देणार? ते सांगितलेच नाही.’

२. कॉलेजमध्ये सायकोलॉजीचा तास चालू होता. सरांनी प्रयोग दाखवण्यासाठी एका उंदिराच्या एका बाजूला केक आणि दुसऱ्या बाजुला उंदरीण ठेवली. उंदीर लगेच केककडे धावला...सरांनी केकच्या ऐवजी भाकरी ठेवली...उंदीर पुन्हा भाकरीकडे धावला... सरांनी अनेक पदार्थ बदलून बघितले...उंदीर प्रत्येकवेळी पदार्थाकडेच धावला.

सर : बघा, यावरून हे सिद्ध होतं की, काहीही झालं तरी या जगात भुकेपेक्षा महत्त्वाचं काहीही नाही.

बंड्या : पण सर...एवढे पदार्थ बदललेत तर एकदा ती उंदरीणही बदलून बघायची होतीत ना.

मदनबाण's picture

11 Feb 2011 - 7:29 am | मदनबाण

मस्त विनोद...:)

बाकी मला बंडू आणि त्याचे मास्तर लयं भारी वाटतात... ;)