तेव्हाही तो पाऊस वेगळाच होता

माझीही शॅम्पेन's picture
माझीही शॅम्पेन in जे न देखे रवी...
6 Feb 2011 - 12:42 pm

तेव्हाही तो पाऊस वेगळाच होता
----------------------------------
त्या दिवशी धडधडत्या ह्रदयाने !
तिला आय लव यू बोलून गेलो
एक चॉकलेटी चुंबनने तीच होकार
तेव्हाही तो पाऊस वेगळाच होता......!

जुहु बीचवर तिचा हातात हात घेऊन
त्या बेधुंद मिठीत फिरताना विरघळतना
क्षितजीशी समांतर एकरूप झालो आपण
तेव्हाही तो पाऊस वेगळाच होता...........!

बाईकवरची माळ्शेज घाटावरची राईड
कानाशी रुन्ज्णारा तुझा उष्ण श्वास
ओली चिंब मिठी आणि ओला आसमंत
मस्त अनुभवलेली वाफाळ चहाची कटिंग
तेव्हाही तो पाऊस वेगळाच होता...........!

पुढे थंड पावसात कारगिल मधे
लढणारे जवान पाहिले !
तिरंगा लपेटलेली शहीद कलेवर
भर पावसात उचलणरे पाहिले
तेव्हाही तो पाऊस वेगळाच होता.

आता पावसाचे चटके बसू लागले
भर पावसात पोटच्या पोरबरोबर
भीक मागणारी असहाय्य बाई दिसली
तेव्हाही तो पाऊस वेगळाच होता.

महाराजांना पालखितून विशालगडावर
नेणारे नेणारे मावळे डोळ्यासमोर तरळले
तरुणाइची धुंदी खाडकन उतरली
कठोर करतव्या अनुभूती घेऊन तो आला
तेव्हाही तो पाऊस वेगळाच होता.
-----------------------------------------------------------
शॅम्पेन

शृंगारवीररसकविता

प्रतिक्रिया

लॉरी टांगटूंगकर's picture

6 Feb 2011 - 1:37 pm | लॉरी टांगटूंगकर

पुढे थंड पावसात कारगिल मधे
लढणारे जवान पाहिले !
तिरंगा लपेटलेली शहीद कलेवर
भर पावसात उचलणरे पाहिले
तेव्हाही तो पाऊस वेगळाच होता.

फार भारि !!!!!

ज्ञानराम's picture

7 Feb 2011 - 5:46 pm | ज्ञानराम

मस्त क्लाय मेक्स..

पुढे थंड पावसात कारगिल मधे
लढणारे जवान पाहिले !
तिरंगा लपेटलेली शहीद कलेवर
भर पावसात उचलणरे पाहिले
तेव्हाही तो पाऊस वेगळाच होता.

आता पावसाचे चटके बसू लागले
भर पावसात पोटच्या पोरबरोबर
भीक मागणारी असहाय्य बाई दिसली
तेव्हाही तो पाऊस वेगळाच होता.

महाराजांना पालखितून विशालगडावर
नेणारे नेणारे मावळे डोळ्यासमोर तरळले
तरुणाइची धुंदी खाडकन उतरली
कठोर करतव्या अनुभूती घेऊन तो आला
तेव्हाही तो पाऊस वेगळाच होता.

अतिशय सुंदर लिहिले आहे .. आवडले ...

माझीही शॅम्पेन's picture

8 Feb 2011 - 2:35 pm | माझीही शॅम्पेन

धन्यवाद !
:) मन्द्या , ज्ञानराम आणि गणेशा !!!