माझ देवगड...
हे सर्व फोटो मी व आमच्या मित्रांनी काढलेले आहेत. स्थळ, वेळ, साधने(फोटो काढण्यासाठी) वेगवेगळी आहेत.
जाहीर आभार : मुलुखावेगळी ताई.....
१. मणचे धबधबा...
२. परत एकदा तांबळडेग......
३. वालुका शिल्प..बीच फेस्टीवल.
४. वाडे तर....
५. रांजण खळगे.....
६. दुर्गाधिपति विजयदुर्ग....
७. विजय दुर्ग चढाई......(फोटोत मी नाहीये.....फोटोग्राफर मी आहे.)
धन्यवाद मागील भागातील प्रतिक्रियांबद्दल....
प्रतिक्रिया
15 Jan 2011 - 1:33 pm | स्पा
सगळे फोटो कडक
वाडे तर चा फोटो तर अफलातून
17 Jan 2011 - 1:10 am | बबलु
असेच म्हणतो.
वाडेतर चा फोटो अफलातून.
(कोकण-प्रेमी) बबलु
15 Jan 2011 - 1:51 pm | प्रीत-मोहर
मस्त आहेत फटु ...माग्चा भागही आत्ताच पाय्ला त्ये बी लै भारी
15 Jan 2011 - 2:50 pm | ५० फक्त
नंदादीप,
या भागातले पण फोटो खुप छान आलेत.
१. वाळु शिल्प फेस्टिवल देवगड्ला कधी असतो त्याचि माहिती मिळेल काय ?
२. मणचे धबधबा फक्त पावसाळी आहे की वर्षभर असतं पाणि तिथं ?
३. रांजण खळगे जागेचं नाव आहे काय आणि त्याचा रांजणगाव जवळच्या रांजण खळग्यांसारखं काही आहे. ?
हर्षद.
15 Jan 2011 - 3:06 pm | नन्दादीप
>>वाळु शिल्प फेस्टिवल देवगड्ला कधी असतो त्याचि माहिती मिळेल काय ?
अस काही नसत...देवगडला बीच फेस्टीवल असत ना तेवा हौशी कलाकार करतात ते. बीच फेस्टीवल च आमंत्रण देईनच मागहून....मी पण मुंबई ला असल्याने पूर्ण वेळ देऊ शकत नाही बीच फेस्टीवल साठी..वाईट वाटत.
>>मणचे धबधबा फक्त पावसाळी आहे की वर्षभर असतं पाणि तिथं ?
पावसाळी...बाकी वर्षभर बारीक झरा असतो...स्वच्छ पाण्याचा...बाजूला महादेवाचे मंदीर पण आहे.
>>रांजण खळगे जागेचं नाव आहे काय आणि त्याचा रांजणगाव जवळच्या रांजण खळग्यांसारखं काही आहे. ?
रांजण खळगे म्हन्जे छोट्या खड्ड्यात दगड सापडून समुद्राचे पाणी त्याला गोल गोल फिरवते....त्यामुळे खड्डा मोठा होतो. त्याला रांजण खळगे म्हनतात. फोटोत ते पाण्याखाली गेले आहेत...(भरती मुळे)
पुढच्या वेळी सविस्तर फोटो टाकेन....
15 Jan 2011 - 2:55 pm | मुलूखावेगळी
सगळे फोटु १ नम्बर आहेत
अजुन टाक
15 Jan 2011 - 10:15 pm | आत्मशून्य
५. रांजण खळगे.....
भारताच्या नकाशातील जम्मू-कश्मीरमधील भारताचा "पाक व्याप्त काश्मीर" हा भूभाग सोडून दीसणार्या भागासारखे दीसतेय ते...
16 Jan 2011 - 11:10 am | पियुशा
लाय भारि !
:)
देवाक काळजि
16 Jan 2011 - 11:53 am | रमेश आठवले
हापूसच्या बागेचे एखादे चित्र असते तर !!
16 Jan 2011 - 12:24 pm | नन्दादीप
सूचनेची नोंद घेतली आहे....नक्कीच टाकेन..
17 Jan 2011 - 1:44 pm | पिंगू
मस्त जमून आलेत की फोटो..
- पिंगू