मन उगाच धावतं..कशापाठी वेडावतं!
जसं लहानगं मूल प्रतिबिंबास धरतं..
मन उगाच उदास..सदा रुसल्याचा भास!
जशी कोकीळाची साद अन् नुसताच त्रास!!
मन उगाच निस्तब्ध..काळजाचा थरकाप..
जसा स्तब्ध पाण्यावर, उठे तरंग..अश्राप!
मन उगाच तत्वज्ञ, करी अनंत विचार..
जशी अळवाच्या पानी मोतियाची थरथर!
मन उगाच अल्लड..दोन अश्रुंची झिम्मड!
जशी पावसाची सर..अलगद..अलवार..
मनं जुळून येतात..हातांमधे दोन हात..
जशी रात्र दिवसाची उलगडते पहाट!!
राघव
प्रतिक्रिया
12 Jan 2011 - 7:02 pm | बिपिन कार्यकर्ते
आवडली!
12 Jan 2011 - 7:06 pm | अवलिया
मस्त !
12 Jan 2011 - 7:06 pm | यशोधरा
आवडली कविता.
हे मस्त!
12 Jan 2011 - 7:12 pm | मेघवेडा
असेच म्हणतो.
सुंदर रे राघवा! आवडली कविता!
12 Jan 2011 - 7:17 pm | नरेशकुमार
मला माझे लग्न झाल्यावर असाच अनुभव आला होता.
बायकोचा हात हातात घेतल्यावर जे वाटले तो आनंद काय वर्णु, आज त्याला आप्ल्यामुळे शब्दरुप सापडले.
13 Jan 2011 - 2:24 am | प्राजु
सुरेख!! एकदम तरल कविता. हळूवार!
14 Jan 2011 - 8:45 pm | मूकवाचक
+१
13 Jan 2011 - 7:19 am | मदनबाण
सुंदर... :)
13 Jan 2011 - 11:51 am | sneharani
मस्त कविता!!
13 Jan 2011 - 1:17 pm | ज्ञानराम
सुंदर !!
13 Jan 2011 - 7:46 pm | राजेश घासकडवी
हे विशेष आवडलं.
13 Jan 2011 - 9:46 pm | अनामिक
सुंदर कविता राघव. खूप आवडली!
14 Jan 2011 - 11:03 am | राघव
तुम्हा सगळ्यांचे प्रतिसाद बघून खूप आनंद झाला! :)
सगळ्यांचे मनःपूर्वक आभार.
राघव