मस्त थंडी घट्ट बर्फाळलेली ..!!

प्रकाश१११'s picture
प्रकाश१११ in जे न देखे रवी...
11 Jan 2011 - 3:51 pm

कशी मस्त थंडी
घट्ट बर्फाळलेली
पहाटे पहाटे धुक्यात कालवलेली
घरांचे फक्त आकार दिसत असतात
भुतासारखे
भुताचे कान
डोळे
तुटके हात
अर्धवट ..कसेबसे
तसे घरांचे अवशेष
भासत असतात
धुक्यात हरवलेले

स्वप्नात हरवून जातात
पाखरांचे थवे
पाखरांचे आवाज थिजून जातात
घट्ट मिटून बसतात
झाडापानात
मन त्यांचे कावरे बावरे ..

झाडे स्वतातच मग्न
ध्यान लावून बसतात
काही झाडे ओकीबोकी
पाने झडून टक्क बावरतात

कोणीतरी दूरवरून कवडसा पाडावा
तसा सूर्याचा गर्भ कोवळा प्रकाश
गुदगुल्या करीत अंगावर
उगाचच कुरवाळीत राहतो
थंडीच्या जाणीवेचा
उगाचच वाढत जातो अहंकार

शेकोट्या पेटल्या जातात
पेटवल्या जातात
हाताचे पंजे, मांड्या सगळे
शेकोटीजवळ
शेकोटीपाशी
तेवढीच थंडीची उब घेत
मस्त सुखात ..निवांत

थंडी कधी जाईल
नि कधी उब येईल ह्याची वाट बघत
सगळे आतुर
थंडीला शेकोटीत घालून
उबेची वाट बघत बसतात .....!!

शांतरसकविता

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

11 Jan 2011 - 5:51 pm | पाषाणभेद

व्वा, मुक्तक चांगलेच आहे.

गंगाधर मुटे's picture

11 Jan 2011 - 6:26 pm | गंगाधर मुटे

छान.

राजेश घासकडवी's picture

11 Jan 2011 - 9:21 pm | राजेश घासकडवी

मुक्तक आवडलं. निव्वळ एका वातावरणाचं, अवस्थेचं चित्रण आवडलं.

कवित खुपच छान आहे , पुन्हा पुन्हा वाचावी अशी

खालील कडवी तर मनात घर करुन गेली .. मस्त

स्वप्नात हरवून जातात
पाखरांचे थवे
पाखरांचे आवाज थिजून जातात
घट्ट मिटून बसतात
झाडापानात
मन त्यांचे कावरे बावरे ..

झाडे स्वतातच मग्न
ध्यान लावून बसतात
काही झाडे ओकीबोकी
पाने झडून टक्क बावरतात

कोणीतरी दूरवरून कवडसा पाडावा
तसा सूर्याचा गर्भ कोवळा प्रकाश
गुदगुल्या करीत अंगावर
उगाचच कुरवाळीत राहतो
थंडीच्या जाणीवेचा
उगाचच वाढत जातो अहंकार