कांदे पोहे...

गणेशा's picture
गणेशा in जे न देखे रवी...
4 Jan 2011 - 7:00 pm

[संवाद... ]

आतुर नजरेचा... एकच कटाक्ष हलकासा...
हळुवार शिडकावा...अबोल शब्दांचा...
तरल स्वप्नांचा... उंच किनारा ...
अंगावर शहारा...थरथरत्या भावनांचा...

[गीत...]
मन हे बेधुंद झाले
बावरले .. हरवले ..
स्पर्श स्वप्नांचा घेवूनी
नयनात सामावले !!

क्षण हे गोंधळलेले
थोडेशे बावरलेले
अंगणात हृद्याच्या
नभ अवतरलेले !!

[संवाद...]
हवी हवीशी सळसळ... कातरलेल्या वेलीची ...
चंदेरी बरसात आज... नक्षत्राच्या चांदण्यांची...
सोनेरी किरणांची... आकाशी नक्षी...
अल्हाद मोहक निर्मळ... झळुक स्वप्नांची ...

[गीत]
शब्द अडखळलेले
ओठात हरवलेले
श्वासांच्या ठेक्यावरती
ह्रद्यगीत झुललेले !!

प्रीतफुल गंधाळलेले
सप्तसूर ओथंबलेले
प्रीतीची ज्योत घेवूनी
ह्रद्य धडधडलेले !!

मन हे बेधुंद झाले
बावरले .. हरवले ..
स्पर्श स्वप्नांचा घेवूनी
नयनात सामावले !!

--- शब्दमेघ ( ४/१/२०११)

शांतरसकविता

प्रतिक्रिया

पैसा's picture

4 Jan 2011 - 9:32 pm | पैसा

अवांतरः झाली का सुरुवात कांदे पोह्याना?

प्रकाश१११'s picture

4 Jan 2011 - 9:45 pm | प्रकाश१११

शब्द अडखळलेले
ओठात हरवलेले
श्वासांच्या ठेक्यावरती
ह्रद्यगीत झुललेले !!

प्रीतफुल गंधाळलेले
सप्तसूर ओथंबलेले
प्रीतीची ज्योत घेवूनी
ह्रद्य धडधडलेले !!

भन्नाट !!निव्वळ भन्नाट ..!!
छान ....!!

पाषाणभेद's picture

5 Jan 2011 - 2:26 pm | पाषाणभेद

लग्न जमेल अशाने

ज्ञानराम's picture

5 Jan 2011 - 5:18 pm | ज्ञानराम

एक गाण आठवलं

""गोरी गोरी पान फुला सारखी छान
दादा मला एक वहीनी आण..""

कविता छान आहे ...

कांदे पोहे खाऊ जाता
ओळख पटली गत आयुष्याची
गालावरी हाणली कोणी चप्पल उंचवट्याची
मेल्या टवाळा मवाल्या.... कडाडली विद्युलता
वडीलांकडे पाहून आई म्हणे चला....
कांदे पोहे नकोत आता.... झाले वांदे पोहे.

मस्त हो ... गतआयुष्य छान होते आमचे म्हणुन बरे ..

असो ..
एक ताजा किस्सा सांगतो ..

माझ्या मित्राने त्याच्या ओलखीच्या मुलीकडे त्याच्या काका ला मागणे घालायला लावले ( त्या अगोदर तीच्या साठी दोन स्थळे यानीच सुचवली होती हा ) तर काका त्या मुलीकडे (घरी) याचे स्थळ घेवुन गेले.. तर ती मुलगी पटकन बोलली अरे मी त्याला भाउ मानले आहे ..

काकांनी घरी येवुन विचारले मित्राला कारे तु बहिन माणले होते का .. बिच्चारा म्हणाला नाहि ..

ही गोष्ठ ऐकुन माझे मित्र अआणि मी हसुन हसुन पार गडागडा लोळायचेच बाकी होतो ..

ज्ञानराम's picture

5 Jan 2011 - 5:53 pm | ज्ञानराम

विजुभाऊ

ही ही,,,,,मस्त प्रतीसाद