पाउलखुणा

गणेशा's picture
गणेशा in जे न देखे रवी...
3 Jan 2011 - 8:41 pm

प्रश्नचिन्ह .. ? आता उत्तरे ही रुसली आहेत..
सारखे सारखे तेच प्रश्न आणि तोच कंटाळलेपणा
आणि मागोवा .. कश्यासाठी ...? कोणासाठी...?
बहुदा एका प्रश्नमालिकेतून पुन्हा
दूसर्‍या प्रश्नमालिकेत जाण्यासाठीचा अखंड प्रवास

गुरफ़टलेली तर ही रात्र ही आहे ..
उदयस्ताच्या रंगात न्हाऊनही
कालवंडली आहे बिच्चारी
माझे काय मग त्यापुढे..

अता माझी सावली ही रुसली आहे माझ्यावर
माझ अस्तित्वच संपत चाललय ..
पण या रात्रीच्या सोबतीनेच
मी जगते आहे.. एकटीच
हे चक्रव्युव्ह नाही तोडता यायचे कदाचीत
पण नक्कीच अस्तित्वाच्या पाउलखुणा मागे ठेवून मी लढेन ...
अभिमन्यु प्रमाने अडकले ही आहे व्युव्हामध्ये
पण तशीच अमर ही होयील ..
पण जाता जाता पुन्हा मागोवा घेते आहे मी थोडासा ..
त्या विस्कटलेल्या पाउलखुणांचा..
अन पाहाते आहे वलयाच्या काही खुणा मागे आहेत
की त्यांचे ही अस्तित्व संपले आहे .. ?

- शब्दमेघ (स्त्री .. भावनांचा प्रवास मधुन)

कविता

प्रतिक्रिया

प्रकाश१११'s picture

4 Jan 2011 - 8:13 am | प्रकाश१११

अता माझी सावली ही रुसली आहे माझ्यावर
माझ अस्तित्वच संपत चाललय ..
पण या रात्रीच्या सोबतीनेच
मी जगते आहे.. एकटीच

छान पाऊल खुणा उमटल्या आहेत. लिहित राहा .

पाषाणभेद's picture

5 Jan 2011 - 2:27 pm | पाषाणभेद

छान आहे विचार