आघात

ऋषिकेश's picture
ऋषिकेश in जनातलं, मनातलं
3 Jan 2011 - 9:31 am

नवीन वर्षातील चित्रपटांची सुरवात सुरवात यंदा (बरेच वर्षांनी) मराठी चित्रपट पहाण्याने झाली. काल विक्रम गोखले दिग्दर्शित "आघात" पाहिला. एका शब्दात सांगायचे तर चित्रपट "आवडला".

टिपः यापुढे चित्रपटाची सुरवात दिली आहे. अंशतः रसभंग होऊ शकतो

चित्रपट सुरू होतो तो डॉक्टरांच्या प्रतिज्ञा/शपथ ऐकत. कुठल्याही प्रकारच्या नमनात वेळ न घालवता मुळ विषय वेग घेतो. एक २२ वर्षांची मुलगी जिचे लग्न महिन्याभरावर आले आहे तिच्या ओटीपोटात एक गाठ डिटेक्ट झाली आहे. पुण्यातले प्रतिथयश व नामवंत डॉक्टर खुराणा (विक्रम गोखले) सांगतात की एका ऑपरेशनने ती गाठ काढावी लागेल, व तपासावी लागेल, जर गाठ कँन्सरची निघाली तर मग इतर उपचार करावे लागतील. ह्या पेशंटच्या आठमुठेपणासोबत डॉ. देखमुख (मुक्ता बर्वे) ही एक एम एस करण्यासाठी असलेली सिनीयर रेसिडंन्ट डॉक्टर आपल्या समोर येते. ती पेशंटशी गोड, प्रसंगी स्पष्ट बोलून आवश्यक ती माहिती मिळवते, मात्र पेशंट कंसेट फॉर्म वर सही करण्यास नकार देते. ह्या मुलीचा (पेशंटचा) भाऊ अ‍ॅपेंडिक्सच्या साध्या ऑपरेशनमधे गेला असल्याने ती ऑपरेशनला घाबरत असते. डॉ. देखमुखचा सायकॅट्रीस्ट प्रियकर तीची समजूत काढतो आणि ती ऑपरेशनला तयार होते.

ऐन ऑपरेशनमधे ओव्हरी (मराठी?) "बॉर्डरलाईन" असल्याचे पॅथोऑजिस्ट सांगतात. एक ओव्हरी बॉर्डलाईन असली तरी दुसर्‍या ऑवरीबद्दल काहिच रोपोर्ट नसतो. तरीही डॉक्टर खुराणा ती ओव्हरी काढण्याचा निर्णय घेतात व हे करण्यस डॉ. देखमुख नकार देते. नुसता नकार देऊन थांबत नाही तर पेशंटच्या परगानगीविना तिच्या मातृत्त्वाचा हक्क हिराऊन घेऊ शकत नाही अशी विधायक भुमिका मांडते. खुराणा एका रेसिडन्टने शिकवलेल्या शहाणपणाने संतप्त होऊन दुसर्‍या रेसिडन्टकडून ओव्हरी काढून घेतात.

आणि इथे सुरू होतो डॉ. खुराणा आणि डॉ.देखमुख यांच्यातील लढा. या लढ्याची ही कहाणी म्हणजे का चित्रपट आघात. ह्या लढयाचे पुढे काय होते? डॉ. देखमुख इन्फॉर्म्ड उपचार करण्याच्या आग्रहावर ठाम रहाते का? दोन्ही ओव्हरी काढल्याने प्रधान हिला (पेशंट) कशाकशाला सामोरे जावे लागते? या लढ्यात खुराणांचा कोणता इतिहास समोर येतो? हॉस्पिटल्सचे आर्थिक घटक "योग्य" उपचरांच्या आड कसे येतात? या लढ्याचा शेवट कसा होतो? वगैरे अनेक गोष्टीसाठी चित्रपट पहाण्यासारखा आहे.

सशक्त - फ्रेश कथा आणि विक्रम गोखले व मुक्ता बर्वे या दोघांचाही अभिनय ह्या चित्रपटाच्या सर्वात जमेच्या बाजू. उत्तम ध्वनी, स्पष्ट संवाद, प्रेक्षकाला समजतील अश्या भाषेत समजावलेले वैद्यकीय शब्द/रोग/प्रक्रिया, योग्य संकलन वगैरे गोष्टींमुळे २ तास ५ मिनिटे लांबीचा हा चित्रपट उठावदार झाला आहे. गाण्याची गैरहजेरी ही देखील एक वैशिष्ट्यपूर्ण बाब. अर्थपूर्ण गाणी चालली असती (पण असेही वाटते की त्यामुळे चित्रपट जरा संथ झाला असता). टु द पॉइंट असलेला हा प्रभावशाली चित्रपट जरूर बघा अशी शिफारस.

माझ्या चांदण्या: ४ १/२

चित्रपटशिफारसआस्वाद

प्रतिक्रिया

नेत्रेश's picture

3 Jan 2011 - 10:57 am | नेत्रेश

ऋषिकेश,

परीक्षण छान लिहीले आहे.

पण चित्रपटाची कथा अर्धीच सांगीतलीत. पण बरेचदा (परदेशात, वगैरे) चित्रपट पहाणे शक्य होत नाही आणी तू-नळी वर येईपर्यंत विसरायला होते. तेव्हा कथेचा ऊत्तरार्ध प्रतिसादात लिहुन पुर्ण करावा ही विनंती. किंवा दुसरा धागा उत्तरार्धासाठी काढा म्हणजे ज्यांना चित्रपटाचा शेवट जाणुन घ्यायचा नाही त्यांचीही सोय होईल, व आम्हालाही हुरहुर लागुन रहाणार नाही.

धन्यवाद,
नेत्रेश

ऋषिकेश's picture

3 Jan 2011 - 12:30 pm | ऋषिकेश

धन्यवाद!
आता घाईत आहे पण एक दोन दिवसांत तुला चित्रपटाचा शेवट व्यनी करतो. :)

मुक्ता बर्वे ही एक महा मुर्ख आणि आघाऊ बाई आहे. एका डॉक्टरने असा बिण्डोकपणा करणे म्हणजे क ह र आहे.

असो , चित्रपट परिक्षण छाण आहे .. एकदम साडेचार चंद्र दिल्यामुळे लै अपेक्षा आहेत. आजंच डाऊनलोडवायला लावतो.

चित्रपट चांगला निघला नाही तर ऋष्याच्या पुढच्या लेखात एक खडुस प्रतिक्रीया देऊ.

- डॉ. उपक्रम खोकले

नेत्रेश's picture

5 Jan 2011 - 5:06 am | नेत्रेश

साडेचार चंद्र नाही साडेचार चांदण्या दिल्या आहेत :)

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Jan 2011 - 10:58 am | बिपिन कार्यकर्ते

बघावा लागेल हा चित्रपट.

ह्या चित्रपटाविषयी वाचले आहे. मुक्ता आणि विक्रम गोखले म्हणजे अभिनयाची बाजू भक्कम असणार. पहायचा आहे.
अजून कोण कलाकार आहेत ह्या चित्रपटात?

फारएन्ड's picture

3 Jan 2011 - 11:06 am | फारएन्ड

चांगला रिव्यू आहे. चांगला दिसतोय चित्रपट. बघायला पाहिजे.

मी_ओंकार's picture

3 Jan 2011 - 12:33 pm | मी_ओंकार

दिग्दर्शन विक्रम गोखले यांचे आहे. त्यांचा पहिलाच प्रयत्न.

- ओंकार.

मुलूखावेगळी's picture

3 Jan 2011 - 1:14 pm | मुलूखावेगळी

वाचले होते
आता बघावा लागेल.
परीक्षण छान लिहीले आहे.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

3 Jan 2011 - 2:28 pm | निनाद मुक्काम प...

हा सिनेमा पाहून महागुरू काही तरी शिकतील अशी अशा करू या .
त्यांच्या अप्सरा पर्वात ते म्हणाले कि आयुष्यभर माणसाने विद्यार्थी असावेत .

"आघात" लवकरच पाहायचा आहेच, तुमच्या परिक्शणामुळे नक्कीच पाहावा असेच मत झाले आहे.

स्वाती दिनेश's picture

3 Jan 2011 - 4:48 pm | स्वाती दिनेश

चांगले परीक्षण ऋ,
बघेन हा सिनेमा.. (ऑनलाइन मिळाला की..)
स्वाती

ऋषिकेश - परीक्षणासाठी अनेक धन्यवाद. नेमके आणि छान लिहले आहेस, अजुन वाचायला आवडेल. वेगळ्या विषयावरचा असा चित्रपट संधी मिळाली तर बघायला नक्कीच आवडेल.
कालच एका मैत्रिणीने तुनळीवरची विक्रम गोखलेंची काहीशी दीर्घ मुलाखत पाठविली होती, ती पाहील्यावर माझे मत खरं तर या विक्रम गोखलेंविषयी फार चांगले झाले नाही. गोखलेंनी स्वतःची फारच स्तुती करुन घेतली आहे, बाकीचे सगळे दिग्दर्शक म्हणजे कोणीच नाहीत आणि ते आणि त्यांचेच कलाकार कसे ग्रेट आहेत हे ते परत परत सांगत बसले आहेत. त्यांच्या ब-याचश्या गोष्टींमध्ये खर तर तथ्य असले तरी त्यांचे एकंदरीत बोलणे फारच गर्विष्टपणाचे वाटले, अर्थात हे माझे स्वतःचे मत झाले.

ऋषिकेश's picture

4 Jan 2011 - 8:56 am | ऋषिकेश

गोखले प्रत्यक्षात कसे आहेत हे मला माहित नाहि मात्र तुमचे जर निगेटिव्ह मत झाले असेल तर हा चित्रपट नक्की बघा.. गोखले निगेटिव्ह रोल मधे आहेत.. :) ;)

आमोद शिंदे's picture

4 Jan 2011 - 10:02 am | आमोद शिंदे

कालच एका मैत्रिणीने तुनळीवरची विक्रम गोखलेंची काहीशी दीर्घ मुलाखत पाठविली होती

अरे वा! ह्याचा दुवा मिळेल का?

सखी's picture

4 Jan 2011 - 6:56 pm | सखी

ऋषिकेश - गोखल्यांबद्दलच मत खरचं अजुन खराब झालं. अर्थात व्यक्तिगत त्यांनी कसं वागाव हा त्यांचा प्रश्न आहे. आणि सुदैवाने मला इतकी मॅच्युरीटी आली आहे की मी त्यावरुन चित्रपटाबद्दल मत वाईट करुन घेणार नव्हते. पेपरात वेगळा चित्रपट आहे असे वाचले तेव्हाच ठरवले की हा बघायला पाहीजे, तुझ्या लेखाने ते अजुन अधोरेखित केले आणि वेळ व पैसा वाया जाणार नाही ही खात्री मिळाली :)

आ.शिं. - खाली तुनळीचे दुवे आहेत.

http://www.youtube.com/watch?v=CWTN-IAaGjg
http://www.youtube.com/watch?v=Ch4m3l6Q2MY
http://www.youtube.com/watch?v=wnVjb7d-FTw

शेखर काळे's picture

5 Jan 2011 - 4:53 am | शेखर काळे

फारच छान.

पण त्यात ते वाईट काय बोलले ते कळले नाही.

त्यांनी आपली मते स्पष्टपणे मांडलेली आहेत. त्यांचा आत्मविश्वासाला काही लोक गर्व म्हणू शकतात.
आणि त्यांनी आपल्या चमूमधल्या कलाकारांचे, नट नट्यांचे कौतुक केले तर त्यात वाईट काय ?
मला ही मुलाखत आवडली. मुलाखतकाराने चांगले प्रश्न विचारल्यावर नीट दाद दिलीच की.
गोखलेंची स्वतःची काही ठाम मते आहेत असे मुलाखतीवरून दिसते. ती त्यांनी आरडाओरडा न करता मांडली आहेत.
त्यांच्या बहुतांश मतांशी मी सहमत आहे - खासकरून मराठी चित्रपटांविषयी.

मलातरी त्यांचे बरेचसे बोलणे गर्विष्टपणाचेच वाटले. तुम्हाला तो आत्मविश्वास वाटु शकतो. काही मुख्य गोष्टी जाणवल्या खालिलप्रमाणे

  1. मला हे पूर्ण मान्य आहे की आजकाल मार्केटिंगचा जमाना आहे. कलाकारांना, दिग्दर्शकांना त्यांची निर्मिती लोकांपुढे आणायला मिडियाची मदत घ्यावी लागते. त्यातच नाताळच्या आठवड्यात ५ नविन मराठी चित्रपट एकदम प्रदर्शित झाले, मला वाटते आघात सोडुन. त्यामुळे स्पर्धा अजुन वाढली, प्रेक्षक नक्कीच दुभागले गेले असणार. फक्त गोखले थोडेजरी विनयी असले असते त्यांच्या टोनमध्ये तर सुसह्य झाले असते.
  2. मुलाखत घेणा-याचं शिक्षण, त्याला डिग्री घेताना किती मार्क मिळाले ९८%, ९९% का, हे विचारुन त्याला अडचणीत आणल्यासारखे वाटले. त्याने जो प्रश्न यावेळेस विचारला त्यांच्या बॅरिस्टर नाटकाबद्दल, तो भलतीकडेच नेला असे वाटले.
  3. एकही गाणं नसणं हा माझ्यामते काही प्लस होऊ शकत नाही , तसेच जर कथेची गरज नसेल तर गाणं असायलाच पाहीजे असही नाही. त्यांचा एकंदर अविर्भाव याबाबतीत असा होता की आजकाल प्रत्येक मराठी चित्रपटात फक्त आयटम साँगच असतात. खरतरं गेल्या ३-४ वर्षांत बरीच वेगळ्या प्रकारची गाणी येऊन गेली /लिहीली गेली.
  4. शेवटच्या भागात त्यांनी प्रत्येक कलाकाराबद्दल/सहकलाकराबद्दलही 'काय काम केले आहे त्याने/तिने' ही टिपण्णी केली आहे. म्हणजे मला वाटले की सगळेच नटसम्राट झाले की काय. असे असु शकते की एखाद्या चित्रपटाची भट्टी खूप चांगली जमुन येते, सगळ्यांचीच कामं सुरेख होतात, दिग्दर्शन, नेपथ्य सगळे जागच्या-जागी असते. पण हे मला वाटते प्रेक्षकांकडुन आले पाहीजे. तुम्हीच तुमचे सारखे-सारखे कौतुक करुन काय फायदा. (मागे कोणीतरी महागुरुंबद्दल म्हंटले होते की हे म्हणजे गणपतीनेच स्वत:ची आरास करुन मग मखरात जाउन बसल्यासारखे आहे, तसेच काहीसे हे ही.)
  5. आता त्यांच्या लायब्ररीबद्दल - मला खरतरं चांगले वाटले की त्यांच्याकडे चांगला संग्रह आहे. पण पुढे जाऊन असे म्हणणे की भारतात असा कोणाकडे आहे का माहीती नाही - अपवाद बच्चन, कदाचित शाहरुख आणि आमिर. मला 'माहीती नाही' हे शब्द इथे महत्वाचे वाटतात. माहीती नाही तर असे बोलणे घमेंडीपणाचे नाही का?

असो. माझ्या मुळच्या प्रतिसादात म्हंटल्याप्रमाणे ही माझी स्वतःची मते झाली आहेत, तुम्हाला किंवा आणि कोणाला ती पटतीलच असे नाही आणि तसा आग्रहही नाही.
तसेच त्यांच्या ब-याचशा बोलण्यात तथ्य आहे, जसे की तेच तेच चित्रपट परत परत करणे (हा सचिन+महेश कोठारेला शालजोडीतला आहे का :))
आणि मुख्य म्हणजे त्यांनी त्यांच्या चित्रपटाचे जे कौतुक केले आहे ते आजकालच्या सगळ्या नाही तरी ब-याच चित्रपटांना लागु होईल.

प्राजु's picture

3 Jan 2011 - 8:43 pm | प्राजु

चित्रपट बघावा लागेल.

रेवती's picture

3 Jan 2011 - 8:47 pm | रेवती

मलाही हा सिनेमा बघायचा आहे.
परिक्षण छोटं पण छान आहे.

आमोद शिंदे's picture

4 Jan 2011 - 2:19 am | आमोद शिंदे

छान परिक्षण. सिनेमा नक्की बघणार!

नंदन's picture

4 Jan 2011 - 5:30 am | नंदन

परीक्षण, चित्रपट पाहण्याची उत्सुकता आहे.
(ओव्हरी = अंडाशय)

धनंजय's picture

4 Jan 2011 - 11:52 pm | धनंजय

+१
आतुरता वाटावी पण रसभंग होऊ नये इतपत कथा सांगण्याचा समतोलही साधला आहे.

शिल्पा ब's picture

4 Jan 2011 - 5:44 am | शिल्पा ब

छान परिक्षण आहे... चित्रपट मिळाला तर जरुर बघेन. बाकी सखीच्या गोखलेंबद्द्लच्या मताशी सहमत.

परिकथेतील राजकुमार's picture

4 Jan 2011 - 11:41 am | परिकथेतील राजकुमार

ऋ मस्त ओळख करुन दिली आहेस. मुख्य म्हणजे चित्रपटाची कथा पुर्ण उलगडली नाहीस त्याबद्दल धन्यवाद.

हॉस्पिटलपेक्षा मोठा झालेला डॉक्टर हा त्याचे नाव म्हणजे हॉस्पिटलचे गुडवील बनल्यावर किती उन्मत्तपणे वागु शकतो हे फार छान रंगवले आहे. मात्र शेवटी शेवटी गोखलेसाहेबांनी स्वतःला असे अमरिश पुरी, शक्ती कपुरच्या लायनीत नेउन का बसवले आहे कळले नाही.

ऋषिकेश's picture

4 Jan 2011 - 2:37 pm | ऋषिकेश

>> मात्र शेवटी शेवटी गोखलेसाहेबांनी स्वतःला असे अमरिश पुरी, शक्ती कपुरच्या लायनीत नेउन का बसवले आहे कळले नाही.
+१ मलाही असेच वाटले.. डॉ. खुराणांचीही काहि बाजु असेल असे वाटले होते पण पूर्वार्धात करडे वाट्णारे पात्र शेवट येईपर्यंत पूर्ण काळ्या रंगात रंगवले आहे :(