कालच एका जुन्या मित्राचा फोन आला.
"काय अॅड्या कसा आहेस? मी सुद्धा तुमच्या बैठकीतलाच होतो. पण फक्त चखणा खायचो.
बर्यापैकी ओळखीचा आवाज वाटत होता.
"बरं. बोला साहेब..."
"अॅड्या तुझ्या घराची खरी शोभा काय सांग पाहू?"
"वेळी अवेळी पडिक असणारे माझे मित्र" मी.
"छ्छे.. ते झालंच रे. पण खरी शोभा काय ते सांग ना साल्या!"
अचानक हा शिव्यांवर आलेला पासून माझं टाळकंच सटकलं.
"अरे म्हणजे तुझ्या घरी लोकं का येतात? असं विचारतोय मी. छ्छे! साल्या तुझंच घर आणि तुलाच घराची खरी शोभा काय हे माहीत नाही?" छ्छे छ्छे छ्छे!
"हम्म... घरून हाकललेले, नाईट शिफ्टमुळे नाईलाज म्हणून माझ्या घराचा लॉज सारखा वापर करणारे माझे मित्र" पुन्हा मी.
"छ्छे.. ते झालंच रे. अरे पण मी घराच्या खर्या शोभेबद्दल विचारतोय रे! हां, भिंतीवर लावलेले कामिनी, शलिनी चे फोटो हीच खरी शोभा!' असं उत्तर नको देऊस बाबा!"
असं म्हणून तो जोरात हसला.
त्याचं ते छ ला छ जोडणं आता मला आवडू लागलं होतं!
"बाय द वे, बि ग्रेड सिनेमांच्या नट्यांच्या बाबतीत बाकी तुझी डॉक्टरेट हो! अरे मला तर कित्येक नट्या तुझ्यामुळे माहीत झाल्या. शालिनी काय फक्कड आहे रे! कुठे शोधलीस बाबा?"
दोस्त आता हळूहळू रंगात येऊ लागला होता!
"बरं ते जाऊ दे. माझ्या प्रश्नाचं उत्तर दे..!"
मित्र पुन्हा पूर्वपदावर. मला वाटलं होतं शालिनी च्या पुढे संभाषण करण्यासारखं आहेच काय?
"नाय माहीत! भाड्या, आता तूच उत्तर दे!"
आणि एकदम भाड्याचा आवाज सिरीयस झाला..
"अॅड्या, नो डाऊट, तुझं घर छानच आहे. इथे मित्रांसाठी जागा आहे, फुकट खायची सोय आहे, वेळी अवेळी पसरायला चादर आहे. पण शोभा कशामुळे आहे?"
भाड्या जास्तच गम्भीर!
"नाही माहीत. सांगून टाक भाड्या!"
"छ्छे! छ्छे! छ्छे!"
पुन्हा मला आवडणारा छ ला छ.
"अरे, तुझ्या शोकेसमधे ती जी जोडगोळी आहे ना? त्यामुळेच केवळ आज तुला इतके मित्र आहेत. अरे ज्या दिमाखात तू तिथे शिवास रिगल आणि जॅक डॅनियलचे खंबे ठेवले आहेस ना म्हणूनच तुझं घर इतकं लोकप्रीय आहे रे!"
आता मित्र झिंगल्यासारखा बरळत होता, मनापासून बोलत होता.
"तुला खरं सांगू? अरे पिणारा नसूनही मी जितक्या वेळेला त्या बाटल्या बघतो ना तितक्या वेळा चढल्याचा भास होतो. अरे एका रात्री मी जेव्हा तुझ्या घरी एकटाच झोपलो होतो तेव्हा त्याच दोन बाटल्या मूकपणे मला सोबत करत होत्या!"
"जो पर्यंत त्या दोन बाटल्या तुझ्या शोकेसमधे आहेत तोवर तुला मित्रांचा तुटवडा नाही. बरं चल, ठेवतो फोन. पुन्हा बोलू!"
सुरवतीस केवळ डोकं खाणार की काय असं वाटणारा मित्र कुठलंही कुठलंही प्रवचन न देता इतक्या साध्या रितीने, साध्या शब्दात मला खूप मोठी गोष्ट सांगून गेला होता. मी नुसता बाटल्यांकडे बघत होतो. न पिता एक वार बारच्या बारीचं पुण्य मिळून गेलं होतं.
टिप - हे पूर्णपणे काल्पनीक लेखन आहे. कल्पनाविलास सत्याच्या नावाखाली खपवण्याचा प्रयत्न आहे.
प्रतिक्रिया
28 Dec 2010 - 12:22 pm | अवलिया
हा हा हा
आम्ही हॉस्टेलला रहात असतांना दोन फोटो लावले होते भिंतीवर.. अनेकजण ते फोटो पहाण्यासाठी आमच्या खोलीत यायचे आणि त्याला बारीचे पुण्य म्हणायचे...
एक फटु होता दिक्षितांच्या माधुरीचा नववधूच्या वेषातला आणि
दुसरा समता कोल्हे (तीच ती... ) तो फटु कसा होता हे जाणकारांना सांगण्याची गरज नाही.
28 Dec 2010 - 12:49 pm | टारझन
झकास रे अॅडि :)
28 Dec 2010 - 12:51 pm | सुहास..
हा हा हा !!
सावन के अंधे को ...
28 Dec 2010 - 1:02 pm | बिपिन कार्यकर्ते
साल्या, तुझ्या बंगळूरातल्या घरात अशीच माझी नुसतीच वारी झाली. नुसते दर्शन घेऊन बाहेर पडलो. आता साग्रसंगित होऊन जाऊ द्या एकदा. काय धम्या गिम्या, डान्या गिन्या बोलवायचे ते बोलवू....
28 Dec 2010 - 5:17 pm | छोटा डॉन
ह्यावेळी आपण ही बिकांची प्यार्टी समजु ;)
ते एवढे उत्साहाने म्हणत आहेत तर कशाला उगाच त्यांचे मन मोडतोस रे अॅड्या.
- छोटा डॉन
28 Dec 2010 - 6:04 pm | आदिजोशी
पण दिलेली वचनं पाळायचा तुम्हा दोघांचा रेकॉर्ड बघता ह्या पार्टीला मी एकटाच असेन
ख्यॅ ख्यॅ ख्यॅ ख्यॅ ख्यॅ ख्यॅ ख्यॅ ख्यॅ ख्यॅ
28 Dec 2010 - 6:08 pm | धमाल मुलगा
बालाऽऽ मी हाय ना रं हिकरं...
तिकरुन अभ्या भिरभिर्याला झे बोलवून.. :)
28 Dec 2010 - 1:09 pm | परिकथेतील राजकुमार
हे शिवास रिगल आणि जॅक डॅनियलचे खंबे डावीकडे दिसत असताना "शिक्षण", आणि "विचार" असे उजवीकडे लिहिणे म्हणजे खरेच बारीचे पुण्य मिळवणे!
धन्य आड्या ! आणि धन्य तो अनाम मित्र !
28 Dec 2010 - 1:14 pm | आदिजोशी
अच्रत ब्व्ल्त
28 Dec 2010 - 2:20 pm | गणपा
काल्पनीक काय???
वरील प्रतिसादांवरुन कल्पनाविलासाची खात्रीच जमा झाली. ;)
28 Dec 2010 - 4:54 pm | विजुभाऊ
अॅड्या.....
बारी आणि वारी यात सूक्ष्म फरक आहे.
वारी आणि बारी दोन्हीसाठी घराबाहेर पडावे लागते हेच काय ते साम्य आहे दोन्हीत.
28 Dec 2010 - 5:01 pm | धमाल मुलगा
पावलंही तालात पडतात हे दुसरं साम्य.
एकात ताल असतो, दुसर्यात बेताल इतकंच.
एकात इठूरायाला..माऊलीला भेटायची नशा-झिंग तर दुसरी 'अहं ब्रम्हास्मि'त दंग.
अशी 'फरकांची साम्यस्थळं' बरीच सापडू शकतील की. :)