मूळ कविता : संदीप खरे
गाडी सुटली , हमाल हलले , काढा चाळीस पटकन बोले,
गाडी सुटली , पाकीट निघता , हमाल डोळे हसरे झाले,
गाडी सुटली नोट वीसाची , हातामधुनि तरी सुटेना ,
चार बोचकी चाळीस रुपडे , पटू दे म्हटले तरी पटेना,
का रे इतका जीव जाळुनी , नोट वीसाची हाती मिळते,
डोळ्यादेखत गायब होते , खुर्दा चिल्लर हाती उरते.
गाडी गेली फलाटावरी , लालपणाचा गलका झाला,
गाडी गेली , सोडा मारुन जीव तापला हलका झाला.
हे भलते अवजड असते , कुणी प्रचंडसे पेटारे , ते लांब लांब नेताना,
डोक्याच्या उप्पर आणि काहिसे खूप घेताना,
पायांनी झाडत लाथा , घुसवीत मुंडके माथा,
कुणी ढांगेखालुनि घुसतो, कुणी बगलेमधुनि घुसते.
हे भलते अवघड असते.
कधी टाकून कोठे टोपी , टाकून रुमाल गुलाबी ,
पटपटा शीटा हेराव्या , मोकळ्या नि सर्वाआधी ,
हे मागाहुन आलेले , पायरीत अडखळलेले,
ब्यागा नि जागा मोजून , का दोन हरवल्या म्हणती.
हे भलते अवघड असते.
तुम्ही मनात म्हणता आता , हिच्या कानाखाली देतू,
इतक्यात म्हणे ती , अय्या , मोजल्या बरोबर का तु ?
ती मोजत ब्यागा सुटते अन चप्पल हरवून येते,
नवर्याच्या चपला घालून , मग डबाच हरवून बसते.
हे भलते अवघड असते.
कळते की झाली वेळ, आता न पाहावी वाट ,
घेऊन हमाली आपली , बोळाची धरावी वाट,
पाकीट उघडण्यापूर्वी , चाळीस कशाचे म्हणते,
तुमचे ना माझे म्हणता , मग नोट वीसाची मिळते.
हे भलते अवघड असते.
परतीच्या वाटेवरती , वैतागून जड पायांनी ,
ओठावर शिवी पुराणी , कचकचीत अन ओघवती,
मग पायांना बोळाची ती वाट खुणावत असते,
सोड्याच्या घोटामध्ये हे दु:ख फस्फसत असते.
हे भलते अवघड असते.
प्रतिक्रिया
16 Dec 2010 - 11:46 am | प्रकाश१११
कधी टाकून कोठे टोपी , टाकून रुमाल गुलाबी ,
पटपटा शीटा हेराव्या , मोकळ्या नि सर्वाआधी ,
हे मागाहुन आलेले , पायरीत अडखळलेले,
ब्यागा नि जागा मोजून , का दोन हरवल्या म्हणती.
छान नि मस्त.!!
16 Dec 2010 - 2:10 pm | गणेशा
कविता एकदम छान झाली आहे .. आवडली ..
फक्त
कळते की झाली वेळ, आता न पाहावी वाट ,
घेऊन हमाली आपली , बोळाची धरावी वाट,
पाकीट उघडण्यापूर्वी , चाळीस कशाचे म्हणते,
तुमचे ना माझे म्हणता , मग नोट वीसाची मिळते.
हे भलते अवघड असते.
ह्या कडव्याचा संधर्भ लागत नाहिये मला .. सांगताल का ?
16 Dec 2010 - 2:25 pm | मेघवेडा
अग्गग्गग्गग्गं.. लै लै भारी! अडगळीतून निघालेलं आणि एक अत्युच्च विडंबन! प्रत्येक ओळीला टाळ्या नि हशा ग्यारंटीड! मस्तच!
16 Dec 2010 - 7:03 pm | पैसा
साफ घरापेक्षा अडगळच छान!
16 Dec 2010 - 8:06 pm | असुर
मस्त!
विडंबन आवडले, लै भारी!
--असुर
16 Dec 2010 - 8:13 pm | रेवती
विडंबन चांगले झाले आहे.
16 Dec 2010 - 11:58 pm | प्राजु
मस्त! झक्कास जमले आहे.. :)
19 Dec 2010 - 9:23 am | चन्द्रशेखर गोखले
एकदम "फन" टास्टिक ...!!!!!!
19 Dec 2010 - 9:45 am | राजेश घासकडवी
विडंबन झकास जमलं आहे. विशेषतः एवढ्या मोठ्या कवितेचं विडंबन करणं, लांबलचक सूत्र धरून ठेवून प्रतिकविता करणं हे सोपं काम नाही. हॅट्स ऑफ.
19 Dec 2010 - 10:02 am | मुक्तसुनीत
अडगळराव ! :-) एकदम झ्याक !
19 Dec 2010 - 10:46 am | ज्ञानेश...
एक नंबर ईडंबन अडगळराव. मजा आली.
19 Dec 2010 - 5:10 pm | इंटरनेटस्नेही
विडंबन आवडले!