माणुसकीचा झरा ..!!

प्रकाश१११'s picture
प्रकाश१११ in जे न देखे रवी...
11 Dec 2010 - 5:21 am

माणुसकीचा झरा

तो शोधात असतो
माणसातल्या माणुसकीचा झरा
त्याला भेटतात छान अशी माणसे
प्रेमाने पाठीवरून हात फिरवणारी माणसे
कारण तो एकटा आहे ह्या जगात
एखादा भेटतो कपटी
नाही असे नाही
स्वार्थी .!
मतलबी ..!!
पण तो माफ करतो
नि शोधत बसतो त्यांच्यातील चांगुलपणाला
त्यांना पण देतो आपल्या मैत्रीचा सुगंध
नि माफ करतो मनापासून त्यांच्यातील स्वार्थीपणाला
कुणास ठाऊक कोठून आला हा त्याच्यात गुण
कसा फुटला त्याच्या मनात ह्या माणुसकीचा झरा
अशे त्याला खूप झरे सापडले
डाक्टरच्या रूपाने
मैत्रीच्या रूपाने
ज्यांनी महारोग्यांना सुद्धा जवळ केले
लाखो अंधासाठी आपले कसब लावले
नि दिले दृष्टी
हिरवी हिरवी सृष्टी त्याने त्यांना दाखवली
माणसात असतो माणुसकीचा झरा
शोधां म्हणजे सापडेल
ह्यावर त्याची आहे नितांत श्रद्धा
ज्यांना सापडतात असली झरे
त्यांना देव दाखवतो प्रकाश ...

करुणकविता