कुणा कुणाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवायचा ??

प्रकाश१११'s picture
प्रकाश१११ in जे न देखे रवी...
10 Dec 2010 - 10:35 am

कुणाकुणाचा आदर्श म्हणून डोळ्यासमोर ठेवायचा ?
अगदी लहानपणापासून डोक्यात होते
शिकवणारे ,सल्ला देणारे पोटभर होते
आमच्या आदर्शांचे बाबा जब्लिंग झाले ....!
कुठला आदर्श समोर ठेवायचा ..?
सगळे गणितच चुकीचे झाले ..!!
तुम्ही कुणाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला ?
कृपया सांगाल का मला ?

शाळेमध्ये गेलो नि मित्र आमचा आदर्श झाला
ओठाचे वर्तुळ करून शीळ घालणारा लखू आमचा हिरो झाला
कशी गिर गिर घालायचा मस्त शीळ
कोठल्यातरी सिनेमाचे गाणे मस्त सोडायचा
मस्त मस्त कसा स्वप्न बघायचा
मान असा झटकायचा आम्ही बघतच बसायचो
ओठ गोलगोल करून फक्त आम्ही हवाच सोडायचो
शीळ अशी कधी घालता आलीच नाही मला
मग तोंड पाडून आंम्ही अगदी गप्प बसायचो
ह्या आदर्शाचा मग आम्ही नादच सोडला
लखुचा आदर्श ? आम्ही हवेत सोडून दिला

आंम्ही शप्पत सभ्य नि सभ्य पोरे होतो .....[??]
क्रिकेट,भवरा नि विटी-दांडू मध्ये
कसे अगदी पक्के माहीर होतो
क्रिकेटमध्ये आमचे आदर्श होते चंद्रा नि बेदी
ब्याटींगमध्ये वाटायचा गावस्कर भारी
लेदरचा बॉल घेतला आयुष्यात एकदाच
शप्पत मग लेदर बॉल कसला... नि बुच बॉल आला ...!!

आमचे सगळे गणितच चुकून गेले
बेरजेच्या ठिकाणी भलते काही झाले !!
कुणाकुणाचा आदर्श म्हणून डोळ्यासमोर ठेवायचा?
तुम्ही कुणाचा ठेवला ?
सांगाल तुमचा आदर्श ..
तुम्ही कसे एवढे ढीगभर मोठे झालात ....?
बघा आमचा कसा घोळ झाला ...!!

अद्भुतरसकविता

प्रतिक्रिया

शाळेमध्ये गेलो नि मित्र आमचा आदर्श झाला
ओठाचे वर्तुळ करून शीळ घालणारा लखू आमचा हिरो झाला
कशी गिर गिर घालायचा मस्त शीळ
कोठल्यातरी सिनेमाचे गाणे मस्त सोडायचा
मस्त मस्त कसा स्वप्न बघायचा
मान असा झटकायचा आम्ही बघतच बसायचो
ओठ गोलगोल करून फक्त आम्ही हवाच सोडायचो
शीळ अशी कधी घालता आलीच नाही मला
मग तोंड पाडून आंम्ही अगदी गप्प बसायचो
ह्या आदर्शाचा मग आम्ही नादच सोडला
लखुचा आदर्श ? आम्ही हवेत सोडून दिला

मस्त एकदम ,,,
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला कोण ना कोण खुप भारी वाटत राहतात ... आणि आपण ही असल्या काही गोष्टी करु शकु म्हणुन प्रयत्न करतोच ..
मस्त वाटले ..अजुन थोडे "आदर्श" लिहा ना पुढचे